लेखकविश्वेशयांनी शुक्रवार, 30/09/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी शोधतो आहे एक तो अन एक ती ...
बर्याच वर्षांपूर्वी ह्या इथेच दिसायचे ते
दिलखुलास एकत्र रडायचे अन हसायचे ते ...
न चुकता पहिल्या पावसात भिजायचे ते ...
गर्दीतहि स्वतापुरते वेगळे असायचे ते ...
मनाच्या खोल गाभार्यात
गर्भरेशमी भरजरी वातींच्या
सुवर्णदिपांची एक माळ जळतेय
.
त्या चांद्ररुपेरी प्रकाशाची धग देहाच्या
सर्व गात्रातून गरगरतेय
.
काही तुझ्यातील माझ्या स्मरणांच्या अन् काही
माझ्यातील तुझ्या स्मरणांच्या या वाती
.
.
या धगधगणार्या वातींवर
निळ्या सुरमयी वार्याचा सणसणता आघात
.
विद्ध मनाच्या दग्ध उंबरठ्यावर
एक अवघडलेला पाऊस उरलाय
.
सरता सरता ह्या पावसाने
फक्त दोन वाती जळत्या ठेवल्यात
.
.
जळता जळता जाळणा-या
जाळता जाळता जळणा-या
.
मनाच्या खोल गाभा-यात
खोल खोल खूप आत
दिपांची तमा न बाळगता
तमाशी झगडणार्या
ओंजळभर तेलाची लाज राखण्यास
.
मनाच्या खोल गाभा-यात
गर्भरेशमी भरजरी या वाती
|- मिसळ
लेखकपाषाणभेदयांनी बुधवार, 28/09/2011 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच तू मला पाहीलेले
हळूच तू मला पाहीलेले मी तुला पाहीले
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||धृ||
कधीतरी ओळखीचे हासू पाहीले तुझ्या ओठी
नकळत स्मित माझे आले त्याच्या उत्तररासाठी
कळले का रे तेव्हा हृदयात काही झाले?
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||१||
पुस्तके देता घेता थरथरती भेट झाली
अलवार स्पर्श होता काटा फुले शरीरी
प्रित पुष्पे अशी कितीतरी मी मनी माळले
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||२||
ठेवले वहीत मी पिंपळपान आठवांचे
बघ ते आता झाले बदलून जाळीचे
तेवढेच जून झाले प्रेम पहील
लेखकविकालयांनी मंगळवार, 27/09/2011 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे रिकामं घरं.....
तुझ्या असण्याची ओळख पटवत राहतं....
तुझ्या अस्तित्वाच्या न पुसल्या जाणार्या अमिट खुणा..
ती सोनचाफ्यासारखी पावलं...
अनं ओघळतं गेलेलं दरवाज्यापर्यंतच हसू....!!
तुझं नसणं पण कदाचित तुझ असणंच दाखवतं......!!
ओळखीच्या क्षणांनाही मी दिला नाही मागमूस....
तुझ्या या नसण्याचा...
बिलगत अनोखे ल्यात अपूर्व भान...
आहोत जवळी अजून असाच तो भाव....!!!
दारातला मोगरा अजूनही तसाच फुलतो..
समजावू का त्या निष्पाप कळ्यांनां...?
आता तू नसतेस इथे म्ह्णून...!!
पणं त्या फुललेल्या मोगर्यापरी तुझ येणं ते...?
पारिजातक ही फुलतो अजून...
निशिगंधाच्या सुवासाला वाट देत...!
त्यांना नाही माहितं..
लेखकपाषाणभेदयांनी मंगळवार, 27/09/2011 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
मै पिच्चर में जावू के नको
ये करू नको, वो करू नको सदा ऐसेच बोलतेय आप तो
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे को ||धृ||
देखने में मै हूं बडी देखनी; सब बोलतेय मेरकू चिकनी
नही कोई मुझमे कमी; मेरे बगैर पडती गली सूनी
कैसी हिरोईन एक नंबर बनती तुम अभी देखो
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरेको ||१||
मुंबई शहर है बडा मोटा; नाही पैसेका उधर तोटा
मत करो मेरेको बेटा बेटा; नाही होंगा अपनेको घाटा
अब्बी मेरी अम्मीभी राजी हो गयी देखो
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी सोमवार, 26/09/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
रुप बहरता हसणे, मजला महाग पडले.
तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले.
ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे.
अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले.
ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित
अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले.
नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी
नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले.
तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी
विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले.
फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो
देहात देह मीसळणे.मजला महाग पडले
अविनाश...
वितळवूनी दिशा ह्या सार्या
आभाळ हृदयात साचे
दाटून आल्या घनसावळ्या
विश्वास मन टिपून वेचे
मेघांना सावरलेल्या
त्या पापण्या सावलीच्या
आठवणी डोळ्यात फुललेल्या
विसरून पाकळ्या क्षणांच्या
तळ्याच्या पटलावरती
दिसे रांग बदकांची
आईच्या मागेपुढती
वसे झिंग पिल्लांची
मग सरून जाते सारे
उरे जीव उदास उदास
फाटक्या झोळीत तारे
सरे रात ह्या दिसास
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२६/०९/२०११)
लेखकअत्रुप्त आत्मायांनी सोमवार, 26/09/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...
पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?
लेखकप्रकाश१११यांनी सोमवार, 26/09/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
चला वेळ आता आली आहे
निघायला हवे एवढेच फक्त खरे आहे
होणारच होते
म्हणजे छातीत दाटून येणे
वगैरे वगैरे ..
थोडेशे ढग जमा झाले होते डोळ्यामध्ये
कधीपण पाउस पडू शकतो
फक्त ढगफुटी होऊ नये एवढेच बघत होता तो
तिच्या साठी तो घट्ट होता
कमी दाबाचां किंवा जास्त दाबाचा पट्टा
तयार झाल्यावरती हे असेच होणार
कधीपण कोसळणार नि मने चिंब होणार ....
निघालीच ती दोघे निरोप घेऊन
सकाळचे विमान होते
सोडले मुलाने त्याना विमानतळावर
आग्रह तसा करणार होता
करीत होता
पण व्हिसा संपला होता
थांबून घेणे हातात नव्हते
त्याना सोडणे भाग होते
निरोप देताना तो पण दाटून आला होता
हे तर होणारच होते ...!!
आतमध्ये गेले नि सगळेच