Skip to main content

कविता

अगदी नेहमीसारखेच…..

लेखक फिझा यांनी सोमवार, 24/10/2011 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आजही तो तिथेच वाट बघत उभा होता अगदी नेहमीसारखेच….. मी मात्र ना थाबायचा निर्धार केला होता अगदी नेहमीसारखेच….. का असा आहेस रे तू….. इतका विश्वास तुझ्या डोळ्यात इतकी आर्तता तुझ्या हृदयात नजर फिरवून आणि काहीसा निर्धार करून मला जायचे होते खूप दूर निघून कशी उत्तर देऊ मी तुला रे…. विसरावे म्हटले तरी विसरता येत नाही, दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही, पाऊस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळ होत नाही, आठवण आली नाही असे कधी होताच नाही… नेहमीसारखेच …. अगदी नेहमीसारखेच ….. आठवायला विसरावे लागत, पण विसरता कधी येताच नाही, वाट संपून जाते पण प्रवास कधी संपतच नाही, वाटेत या तुझी साथ हवी आहे !! नेहमीस

चला छतावर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/10/2011 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
चला छतावर
पुनवची रात आज आली तुमी आला चला राया चला छतावरती झोपायला ||धृ|| चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू लुकलुक तार्‍यांनी शेज ती सजवू वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला चला राया चला छतावरती झोपायला ||१|| हातामधी सरळ धरा अत्तरदानी हळूच खाली सोडा मच्छरदानी इश्काच्या मैदानी उडवा तुमच्या जोरदार तोफेला चला राया चला छतावरती झोपायला ||२|| पाटंला थोडी थंडी गुलाबी पडल अंगावर पांघरून म्हणून तुमाला ओढल तुमीबी जवळ ओढा मला, होईल उबार्‍याला चला राया चला छतावरती झोपायला ||३|| गाठ चोळीची आत्ताच तटली साडी अंगाची क
काव्यरस

दोन बडबडगीते

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/10/2011 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बडबडगीते
१) ढग वाजले ढम ढम ढम ढग वाजले ढम ढम ढम विज चमकली चम चम चम पाऊस पडला छम छम छम नाच नाचूनी भिजले कोण? भिजले कोण? २) चिमणे चिमणे चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे ईकडे ये रे भु भु बाळाशी खेळतोस का तू? हम्मा हम्मा शेपूट हलव आमच्या बाळाला पाळण्यात झुलव - पाषाणभेद

अ आ आई

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 23/10/2011 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
बालकविता

अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अ‍ॅन्ड डी फॉर दादा

मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई

बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई

ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन करूया अभय प्रज्ञा
स्वत्व गुणाला करू कल्हई
     

आली आली हो दिवाळी-

लेखक विदेश यांनी रविवार, 23/10/2011 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली हो दिवाळी सांगे दारी ही रांगोळी स्वागतास सज्ज राहू प्रकाशात घरोघरी ! सुसंवादी भेटीत त्या काव्य शास्त्र विनोदाच्या - एकमेकांना देऊ या शुभकामना मनीच्या ! करू विना आवाजाने छान दिवाळी साजरी , ठेवू प्रदूषणमुक्त वसुंधरा ही गोजिरी ! गोडधोड चवदार खमंगशा फराळात- भूक गोरगरीबांची नित्य घेऊया ध्यानांत !

अंगणात एकदा हत्ती आला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 21/10/2011 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात एकदा हत्ती आला
अंगणात एकदा हत्ती आला पाठीवरती बस मला तो म्हणाला ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या मग झाली माझी मज्जाच मज्जा गल्लीतली मुले बघत राहीली खुप सगळी दिसत होती ठेंगणी ठूस ईकडून तिकडे फिर फिर फिरलो इतका की कंटाळ्याने मी थकलो तेव्हढ्यात काही माणसे आली हत्तीला सर्कशीत घेवून गेली - पाषाणभेद १२/१०/२०११

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 21/10/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा.

पोरका

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 21/10/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तेजाचा तो पुत्र पोरका उन्मुक्तीच्या रचतो गाथा त्या असूयेने असह्य होता विव्हळते मग जग आता -- युयुत्सु