Skip to main content

कविता

महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे
काव्यरस

तयार करा हिरवं पान

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 26/10/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
तयार करा हिरवं पान
दिवाळीचा फराळ खावून केलं जेवन काथ लावून तयार करा हिरवं पान ||धृ|| हिरव्या पानाच्या होsss हिरव्या पानाच्या शिरा हळूहळू खरडा देठ शेवटाला लागल तो पण खुडा तोंडानं म्हणा आपलं खुशीतलं गानं राया तुमी माजबी लावा की हो पान ||१|| पुढं ओढा जरा होsss पुढं ओढा डबा पानाचा तुम्हां जवळी त्यातच ठेवली पहा सुपारी चिकनी अडकित्यामधी फोडा तिला हाती धरून पानावर मग पसरा बारीक कतरून ||२|| प्रेमाचा गुलकंद लावा तुम्ही पानाला तयार झाल्यावर हातामधी द्या त्याला जवळी या आता खावून पान थांबून जा थोडं मन रिझवून ||३||
काव्यरस

मांगल्याचे औक्षण करूनी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 25/10/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली.. अलगद नाजूक, धरतीवरती चाहूल थरथरली.. जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी निळेजांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला आळसावल्या चराचराला सूरही गवसला लगबग झाली दहादिशांतुन तया पाहण्याला ओलेत्याने सज्ज जाहल्या जणू स्वागताला धरतीवरती शिंपण झाले सडा रांगोळ्यांचे मनी मानसी दीप उजळले नविन आशांचे काळोखाची संपून जाईल मुजोर बळजोरी आकांक्षांची किरणे येतील हसून सामोरी नविन आशा आकांक्षांनी भरु दे ही झोळी मांगल्याचे औक्षण करूनी हसेल दिवाळी.. - प्राजु
काव्यरस

तुझ्यविना आज.....!!!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 25/10/2011 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाही भेटले मी दिवसभर तर त्याने खूप बेचैन व्हावे , भेटण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी त्याने नेहमी आधी यावे ! रोज भेटण्याची ओढ नित्य नेमाची पण नवीन असावी , रोज काहीतरी नवीन बोलण्यासाठी शब्दांची घाई असावी ! डोळ्यांसमोर असावा सतत चेहरा त्याचा हसणारा , आकाश शुभ्र असले तरी, ढग ओढून बरसणारा ! ‘तुझ्याशिवाय मी ’ आता कल्पनेतही नसावी , कल्पनेतील तुझी साथ आता अस्तित्वात असावी ! ज्याची कल्पनाही केली नाही इतकी प्रेमाने भरलेली असावी , माझ्या आठवणीत त्यानेही अशीच कविता लिहिलेली असावी ! सत्य मात्र अबाधित पणे दोघांकडे पाहत असेल , तुम्ही थांबता कुठे कि मी थांबऊ म्हणत असेल ! गुंत

प्रवास .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 25/10/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते, कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात , आणि कधीचे दाटलेले पाणी डोळे भरून टाकतात , जड जड पायांनी परत आपण चालू लागतो वाट , अंधारातून चालता चालता होऊ लागते पहाट , ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा , निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा , मन सकाळीच तेवढे प्रसन्न , मग गहिवरून येते , वाऱ्यासंगे वाहता वाहता परत फुलापाशी थांबते , मेघ येतात दाटून मग ,बरसून जातात संध्याकाळी , तेव्हाच बहरतो निशिगंध आठवणींच्या वेळी , विसरव म्हणले तरी विसरता येत नाही , दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही , पाउस पडून गेल

गोष्ट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 25/10/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी ती गोष्ट शोधतोय बर्‍यासश्या हाताला लागतायत . . लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची, शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची, इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची, आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास, आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची, अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला . . पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची, पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी . . कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस, निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना....
काव्यरस

शप्पत तो देखील भिजला होता....!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 25/10/2011 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेता घेता उंच उडणारे विमान बघता बघता ती हलकेच डोळ्यातला थेंब पुसत म्हणाली आभार, परत कधी ..?
काव्यरस

आज चंद्र माझ्या कुशीत

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 24/10/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज चंद्र माझ्या कुशीत ,संगे तारकांचा थवा. तुही बोल माझ्या सवे,असा अबोला का हवा?. मी मिटले डोळे , अन लुब्ध झाले तारे.. माझ्या ओंजळीत पडले सोभाग्याचे मोती सारे... रात्र बोलावत आहे..रातराणीचा गंध नवा.. तुझं खुणावत आहे , हिरवा चुडा.. शालू नवा.. काही हितगुज करु , कधी छेडू सुर नवा.. सात जन्माच्याही पलीकडे तुच जोडीदार हवा....