Skip to main content

कविता

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/10/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ|| नका भानात वाहन चालवू नका जरा तेथे कधी थांबू दिसली नाही आगगाडी जरी जरा वेगात चलावं रुळावरी सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१|| लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता?

Father Complex

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 09/10/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
Father Complex ५०शी ला आलो होतो,...छंद म्हणुन C++ चा क्लास लावला ति पण यायची क्लासला....असेल १९-२० ची..... काळीसावळि..पण उफाड्याची...माझ्या बाजुलाच तिचा कॉम्प होता.. बघितले कि हसायची...क्लास सुटला कि माझी वाट खाली थांबायची. सारखी माझ्या कडे बघत रहायची..... मला जरा सार संकोचल्यागत होत होते...काहिस ठीक नव्हत.. कारखान्याच्या कामासाठी मी ३-४ दिवस बाहेरगावि होतो.. ३-४ दिवसानि क्लास ला गेलो तर ति खालीच वाट बघत होति.. डोळे रडुन सुजलेले...’सर तुम्हि कुठे होता? मला किति काळजी वाटत होति तुम्हि आला नाहि म्हणुन" माझा हात धरत ति म्हणाली...सारच अवघड होत चालल होत मी बोललो नाहि...ठरवल द्यायची तिला समज.. एकदा

कोण येथे गुरुवर्य ?

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 04/10/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित)
काव्यरस

जीर्णोद्धार

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 03/10/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्या आयुष्यास उरला ... तुझ्या आठवांचा आधार पुन्हा करतो आहे मीच ... जुन्या जखमांचा जीर्णोद्धार मन-मंदिरात गंधाळलेल्या ... विझल्या सगळ्याच वाती तुजविण झालेल्या अंधारात ... उरल्या भकास एकल्या राती केलास हिशेब सहज अन ... चुकले गणित जगण्याचे उरले गाठीशी सखये आता ... नुसते आभास आसवांचे आता अंधाराचे नाही सखये ... वाटते मज उजेडाचे भय अन श्वासाश्वसास माझ्या ... आता लागली भैरवीची लय अखेरचे हे गाणे (गाऱ्हाणे) माझे ... सखे फ़क़्त तुझ्याच साठी घेऊन जातो दुख्खे भरून ... सुखी रहा तू माझ्या पाठी सुखी रहा तू माझ्या पाठी - विश्वेश
काव्यरस

दगडाची गोष्ट

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 01/10/2011 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
दगडाची गोष्ट
(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)
प्रास्ताविक: निट बसा सगळे लक्ष द्या इकडे एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे आरंभ: एक खेडेगाव असते तिथे एक नदी वाहते विषयविवेचन: त्या नदीत असतो एक दगड मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड इतर दगड खुष असत हा मात्र असतो सतत रडत नायकाचे आत्मकथन: "मी काही कामाचा नाही कोणाच्या उपयोगाचा नाही देव करण्याइतका मोठा नाही वाळूत मावण्यासारखा छोटाही नाही कु
काव्यरस

भाव ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 30/09/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सप्रेंच्या कवितेकडून प्रेरणा मिळाली - "जगण्यास वाव नाही, मरणांस भाव नाही ..." असण्यास भाव नाही ... तुझ्या नसण्यास भाव आहे ... हसण्यास भाव नाही ... तुझ्या आसवांस भाव आहे ... नकळत वाहात आलास इथे, हे ओळखीचे गाव आहे ... बुडविले तुला जीवानिशी ... ती ओळखीची नाव आहे ... तू शोधतो ज्या सुखाला ... त्याचा कुणा ठाव आहे ... फसवू नकोस स्वताला ... इथे जगणेच साव आहे ... चढण्यास नवी शिखरे ... तू घालतो कुणावर घाव आहे ... वरच्या दरबारात मनुजा ... न रंक न कोणी राव आहे ... तू मोजतो आहेस वर्षे ... तुला जगण्याची हाव आहे ... इथे मरणास भाव नाही ... पण सरणास भाव आहे ... इथे सरणास भाव आहे ... - विश्वेश

....नाही !

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 30/09/2011 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
....नाही जगण्यास वाव नाही , मरणांस भाव नाही आम्ही भणंग सारे, आम्हां उठाव नाही ! ओथंबली कितीक पडद्यात आसवांच्या ही खुसखुशीत दु:खे यांना झराव नाही ! वणव्यांत आठवांच्या उरलो न मीच माझा तुझिया मनांत माझा तरिही पडाव नाही ! फुलतो अजून येथे हा मोगरा टपोरा केसांत माळण्याचा.....उरला सराव नाही ! ------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे, (१३ सप्टेंबर २०११)-----