Skip to main content

कविता

सूर्य कुडकुडतोय आभाळात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 10/11/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्या परदेशात थंडी पडू लागलीय. काल सकाळी सूर्य होता आभाळात. म्हणून सहज ग्यालेरीत जाऊ लागलो नि ह्या भर सूर्य प्रकाशात मी गारठून गेलो. आभाळात एवढा प्रखर सूर्य नि खाली थंडीचा कल्लोळ.मी पटकन शटर बंद केले. नि सूर्याकडे बघून घेतले.अगदी केविलवाणा वाटला सूर्य. त्यावरून सुचले.] पहाटे पहाटे -१० तापमान मी घाबरून गेलो थंडीला नि म्हणालो सूर्याला नको येउस आज खूप थंडी पडलीय गारठून जाशील उगाच कशी होईल सहन तुला ही थंडी भीती वाटते तू असतो नागडा सतत खेळत बसशील अंगणात तुझ्या सोबत कोणी नाही तू अगदी एकटा एकटा कशी नाहीरे भीती वाटत..?
काव्यरस

ससे आणि जादुगार -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 10/11/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
छोटे छोटे ससे कसे टकमक इंद्रधनू बघती - बघता कोपऱ्यात ते रुसुनी मुकाट का बसती ! चुन्यात बुडुनी आलो वाटे, लाल ना कुणी निळे - रंग कुणाचे ना नारंगी कुणीच ना काळे पिवळे !

विसरता येत नाही

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 10/11/2011 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
विसरता येत नाही , असे नसतेच काही मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई.. किती जाती उन्हाळे , बदलतो चेहराही नव्या ह्या मोसमाची नवी मिळतेच ग्वाही चुकांना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही तिला वेटाळूनी मी प्राशिला गंध सारा तिला फोडुनी प्यावे असे उरतेच काही खरे ते शोधताना थके श्रद्धा मनाची भेटतो देव ही पण मनी गळतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले तरीही जरा उरतेच काही नदीपात्रामध्ये मी सोडतो दीपमाळा परि गंगा जळातुन निघे भलतेच काही मानतो कागदाला ... वंदितो लेखणीला परि शब्दात अंतिम असे नसतेच काही अरुण म्हात्रे

मैत्री……

लेखक विनीता देशपांडे यांनी बुधवार, 09/11/2011 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गुंतलेले,कधी गुंफलेले मनामधे खोल रुतलेले अधे मधे न उमगणारे.......मैत्रीचे नाते कधी अव्यक्त्,कधी अवास्तव तरीही शाश्वत अन विश्वस्त अधे मधे निशब्द...........मैत्रीचे नाते कधी बेभान्,कधी बेधुंद निसटलेला तोल सावरणारे अधे मधे अलिप्त..............मैत्रीचे नाते कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते ( विनीता देशपांडे)

शब्द ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 09/11/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये कधीही ,केव्हाही अचानक ....! तेव्हाच त्यांना बंदिस्त करावे लागते नाहीतर ते उडून जातात पाखरासारखे त्याना बघावे मनात पसरताना हलके हलके फुलताना शब्दाना अनेक अर्थ फुटत जातात तेव्हा ते काळीज कोरून जातात काळजात ते जपून ठेवावे लागतात नाहीतर ते हरवून जातात .... कसे रुमझुमत येतात शब्द ..... जेव्हा मन असते फक्त निशब्द शब्द शब्द झेलून घ्यावा जेव्हा वाटतो शब्द नवा तेव्हाच शब्दांच्या सरीत भिजून जावे जमले तर गाणे गावे गाता गाता एक होईल एखादी कविता गिरकी घेऊन गाणे गाईल .....!!
काव्यरस

ती वाट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/11/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरली
काव्यरस

हातपंप

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 07/11/2011 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
हातपंप
ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ|| घरचा नळ नाय कामाचा सार्वजनीक हाय नळ गर्दीचा वाही रातंदिस पानकाळ्याचा त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१|| खालीवर दांडा करावा बरं थोडं कष्टांचं काम हाय सारं पानी येतंयं हापसून न्यारं बाकी ठिकाणी माझी घागर रिकामी र्‍हाती ग बया मला हातपंपानं पानी दिलं ग बया ||२|| सार्‍या बायांनी याची चव घेतली एकजात सार्‍यांनी पसंती दिली हंडेगुंडेकळशांची रांग मोठी लागली त्यांनी हातपंपाचा ताबा घेतला ग बया मला हा

चारुकेशी

लेखक पेशवा यांनी सोमवार, 07/11/2011 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कसे सांग पाय थकले, वाटेतच रंग विटले श्वासातच माझ्या उतरले घन काळे हृदय मागते मागते मागते दे रे कान्हा उन्मळून टाकणारी लखलखती ज्वाला आर्त माझी हाक जीभ सोलून नटली हरेक उपकाराबरोबर रात्र-बेरात्र झोपली सोसण्याचे बळ खिळ्यासारखे ठोकताना कान्हा चोरशील का ह्या अस्तित्वाचा काला? हे काही स्वर डोळ्यांमध्ये राहिलेले स्वप्नांचे अनौरस क्षण त्यांच्यामागे वाढवलेले आशिषांच्या भोगतो घडाभर जखमा कान्हा माझ्या झोळीत एक सुदर्शनी शिवी घाला! ---- ह्या चारुकेशी बरोबर वाचा ------
काव्यरस