Skip to main content

कविता

तो क्षण

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक तो क्षण आठवे माझे श्वास स्तब्ध गोठवे दिवस अन रात ती एकमेकांसवे अवीट असे ते गावे गोडवे कालचक्र फिरुनी उलटे क्षणोक्षण वाटे हे माझे हवे वास्तवाची जाणीव होता अस्तित्वही मग चटकावे तुझे जाणे असे घडावे हूरहूर मनास सतावे कधी या पक्ष्याने पिंजऱ्यातून उडावे ?
काव्यरस

बालपणीचा गाव

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सहज वाटे धावत जावे गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे तो गाव मज आठवे सुर पारंब्या, मन जेथे झुलवे ती आंब्यांची न्याहारी त्या रात्रीच्या गप्पा धुंडाळला लपंडावात वाड्याचा हरेक कप्पा त्या संध्याकाळच्या वेळी गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या रसाळ रानमेवा तो रानातल्या झाडावरील साऱ्या लाडिक हट्टाने घेतलेल्या त्या वाण्याकडील गोळ्या नव्या कोऱ्या लोणच्यासोबत त्या धबाडक्या पोळ्या त्या भुताखेतांच्या गोष्टी ते गोधडीसाठीचे भांडणे मिळता पांघराया गोधडी भावंडांना चिडवून रडवणे सारे हरवले आता हे, सर्व आहे मज ठावे तरीही मन पुन्हा पुन्हा गावाकडेच धावे
काव्यरस

अखेर

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 22/11/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात
काव्यरस

माणूस

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/11/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला चला चला गाढव पहायला माराच ओझ घेऊन फुकटच राबतय माणूस शोधतय ? चला चला चला पाहू गोगलगाईला शिंग वर दाखवी नि पोटात पाय - माणसाचं काय ! चला चला चला बैल बघायला मानेवर जूं नाही हूं की चूं माणूस ना तू ? चला चला चला कुत्रा पाहू चला शेपूट ते वाकडे इमानदार किती माणसाला भीती ! चला चला चला सापाला पहायला दूध पाजले तरी सवय चावायची - जात माणसाची ! चला चला चला माणूस पाहू चला - निघाले की सगळे ! घाई घाई करून स्वत:लाच विसरून ?

कसं जगायचं असतं ?

लेखक महाबळ यांनी रविवार, 20/11/2011 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
कसं जगायचं असतं ? ------------------------------------------------------------------------------------------------------------ कष्टातूनच फळ मिळवायचं असतं, त्यागातूनच बळ कमवायचं असतं, असंच जगायचं असतं. निरागस बालकासारखं स्वच्छंद आयुष्य अनुभवायचं असतं, आणि मग त्याच कोमल चेहेऱ्यावरील हास्य बनण्याचा प्रयत्न करीत राहायचं असतं, असंच जगायचं असतं.

अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे -

लेखक विदेश यांनी रविवार, 20/11/2011 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- जीवनात ही घडी अशीच राहू दे) अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे पेट्रोलच्या टाकीवरी गंज वाढु दे ||धृ|| रंगविले गॅरेजात कितिक देखणे आवडले गाडीला खूप खर्चणे स्वप्नातही बंद ना कधीच वाटु दे |१| हळुच तिला पुसण्याचा छंद आगळा गाडीचा त्याविण का व्यर्थ हा लळा वर्षातुन छंद बंद कधि न होऊ दे |२| ...पाहु दे असेच तिला आता गंजता राहु दे पेट्रोल भाव नित्य वाढता महागाईत पायपीट सार्थ होऊ दे |३|

तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 20/11/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बरमुडा त्रिकोणा चे आकर्षण.... ........... तू आहेसच सागरा सारखी. अथांग,....गुढ निळेशार.. कधी खवळलेली.. उंच लाटा..कधी शांत.. वरवर.. आत खवळलेली... खूप खोल..खारट.... आवडत..तुझ्या लाटांवर स्वार व्हायला.. खवळलेल्या विशाल पात्रांत झोकून द्यायला.... अन तिथेच कुठेतरी आहे तो Bermuda triangle..... बरमुडा त्रिकोण... अदृश्य..अनाकलनीय, गूढ... जबरदस्त आकर्षण शक्ती असलेला... खेचतो मला गलबता सह..आत..आत विरून जातो मी, बनतो समुद्राचाच एक भाग... त्या त्रिकोणाचा...विसरतो देहभान..., मग डोळे उघडतो, अन स्वत:लाच पाहतो.. तुझ्या किना~यावर पडलेला...विवस्त्र..शांत..निपचीत अविनाश