Skip to main content

कविता

मी कागदावर सांडत गेलो

लेखक अविनाश खेडकर यांनी रविवार, 20/11/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
कवित्व नाही माझा बाणा मी नच असे थोर कवी तो लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन् समाज ज्यांना थोर मानतो कधी न केली कसली ईर्षा कुणी लिहिलेल्या काव्यत्वाची तुम्ही नभीचे सुर्य तळपते ना मज क्षमता काजव्याची आवडले जे जेंव्हा जेंव्हा शब्द सुमने उधळीत गेलो काळोखाच्या साम्राज्यावर मी शब्दाचा प्रकाश झालो मनात ऊठले वादळ तेंव्हा विचार माझे लिहिते झाले ना मात्रांशी सोयर माझे वृतांनी मज दूर लोटले अनुभवले जगण्यातून जे जे मनात सगळे मांडून घेतो कधी मनाला भरती येते अन् मी कागदावर सांडत जातो.

झाडे वाट बघत बसतात ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 19/11/2011 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी बघतोय ह्या देशातील सूर्य बर्फात गुंडाळून ठेवलेला शुभ्र वाटतोय खुपसा पण तोंडावर बोट गप्प गप्प मुकामुकासा जीव गुदमरून जातोय त्याचा बर्फाच्या अटकेतून सुटण्याची त्याची धडपड चिंब थंड होऊन निसटतात त्याची किरणे बाहेर निसटले की तेही गारठून जातात लंगडत लंगडत खुरडत हलकेच झाडावर रेंगाळत बसतात शुभ्र बर्फ झाडांच्या काष्ठ शिल्पावर पिवळ्या उन्हाचा तुकडा हलकासा स्पर्श नुसता कोरडा निर्जीव केविलवाणा...!!
काव्यरस

प्रेमाचा झुला

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 17/11/2011 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाचा झुला तू सोडून गेलीस तर जीवन एकाकी आहे तूच सांग मला तुझ्याशिवाय जीवन काय बाकी आहे तुला कसं वाटल की मी तुझ्यावाचून जगेन तुझी सोबत नसताना कशी भविष्याची स्वप्न बघेन दुनियेला नाही समझली तगमग आपल्या मनाची तुला तर कल्पना होती आपण पाहिलेल्या स्वप्नांची तू परत मागे वळ आयुष्य पुन्हा बहरेल तू पुन्हा साथ दे हे दुःख क्षणात सरेल शपथ आपल्या प्रेमाची मी देत आहे तुला ह्या मनातल्या प्रेमाचा परत एकदा झुलव तू झुला यशवंत

मिठीत कळी उमलली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/11/2011 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली तुमच्या मिठीत कळी उमलली वाट कितीक पाहीली थकलं डोळं आज उशीरा का येनं केलं? रुजूवात कराया मोहोर उठवा गाली तुमच्या मिठीत कळी उमलली सजवून माझी काया नखरा केला जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली तुमच्या मिठीत कळी उमलली कमरपट्टा उगा मला का रुतू लागला? शालू अवजड झाला आज का अंगाला? चोळी ऐन्याची नको तिथं उसवली तुमच्या मिठीत कळी उमलली - पाषाणभेद १६/११/२०११
काव्यरस

बिगारी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 16/11/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
बिगारी
रोज सकाळी बांधून भाकर कामावर निघतो सायकलीवर उचलूतो खडी रेती डबर माती शिमीटाची डोक्यावर पाटी उघडं डोकं तापून जातं उन्हातान्हानं सडकून निघतं रचतो मालात विटेवर विट भिंतीत चिणतो मलाच निट बांधले बांबू वासे लाकडी फळ्या जगतो झालंय लोखंडाच्या सळ्या कांक्रीट मिक्सर गोल फिरतं मातीधुळीतच आयुष्य जायचं बाकीचे एखादंच घर बांधतात गरीब बिगारी घरं बांधतो - पाषाणभेद

मी माझ्या छंदातच रमतो -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 15/11/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या छंदातच रमतो मी हा माझा छंदच म्हणतो ! शब्द वेचतो शब्द वाटतो आनंद लुटतो आनंद दाटतो जमेल त्याला भेटा म्हणतो स्वत:स बघतो इतरांना बघतो एकटा चालतो चाला म्हणतो झेपेल तेवढे खेटा म्हणतो आपण सुंदर जग हे सुंदर विचार जनांचे विचार मनाचे रुचेल त्याला मोठा म्हणतो मी माझ्या छंदातच रमतो मी हा माझा छंदच म्हणतो !

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 15/11/2011 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो शब्दांचे वार झेलूनी शब्दांचेच प्रहार करतो शब्द कधी गळ्यात पडती हार होवूनी खोटे सुखवती स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती नफा नुकसान व्यवहार जेव्हा नजरेसमोर जाणवतो केव्हा शब्द गिळतो शब्द फिरवीतो शब्द जोडतो शब्द पेरतो रूजवूनी त्यांना कागदावर शब्दांचीच शेती करतो शब्दांचा आधार बोलण्याला शब्दच साह्य करी भावनांना शब्द नसता बोलतो निशब्दांना - पाषाणभेद १४/११/२०११
काव्यरस

आपली तर काय.....

लेखक वपाडाव यांनी सोमवार, 14/11/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपली तर काय लायकीच नाय तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... .................तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय
काव्यरस

आग्निपरीक्षा

लेखक गार्गी_नचिकेत यांनी सोमवार, 14/11/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे, बाल्य, तारुण्य, वर्धक्य तीन अन्कन्चा हा खेळ, कोणा द्यावा किती वेळ हे तो ठरवतो काळ. देह सोडुन जाताना प्राण क्षणार्धात जातो, मागे राह्णारा मात्र दु:ख आजन्म भोगतो. का ही अग्निपरीक्षा चान्गल्याच्या माथी येई, तरण्याला आता देवा सीतेचेच बळ देई.
काव्यरस