Skip to main content

कविता

अर्घ्य

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 14/12/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात मागे ठेवून जातात एक काळपट तवंग आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली. त्याच किना-यावर त्याच लहरींना आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.
काव्यरस

झाड

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/12/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ|| गेली कित्येक उन्हाळे सावली देत आहे उभा; कोरडे ठेवीले वाटसरूंस पावसाळ्यात सुध्दा; हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१|| खोड जुन वाढले फांद्या जुन्या झाल्या; त्या मुळी न मातीत नव्याने रूजल्या; नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२|| कधी गळते दुजे पान पहिल्यासारखे; मातीत मिळूनी होते ते मातीसारखे; त्या पानांसारखे माझेही पान होई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३|| - पाषा

जीवघेणा फास

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 13/12/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याश्या सावळीला, सावळ्याचा ध्यास आहे सांग कां तो सावळ्या रंगी, निळासा भास आहे भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे सावरुनी घे जिवाला, काय हा वेडेपणा गं लाजलाजूनी उरी हा, मोहणारा श्वास आहे मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/१२/२०११) मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा वृत्त: व्योमगंगा
काव्यरस

खेळ दैवाचा....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी सोमवार, 12/12/2011 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
कसा प्रसंग हा येतो पहा तो, कधी कुणाच्या आयुष्यामध्ये | जिथल्या तिथे थांबते सारे, चालले होते जे वेगामध्ये | कुणास मिळता हा पुर्णविराम तो, अल्पविराम कुणास त्या मिळूनी जातो | कुणाची सोडूनी साथ कुणीतरी, एकांत कुणास त्या देऊनी जातो | आपण म्हणतो जरी त्यास त्या क्षणी, आम्ही आहोत ना तुझ्या सोबती | सोबत असते ती परी.. क्षणभराची, अथांग उरल्या त्या जन्मातली | क्षण सरता तो जलद गतीने, पाऊले मागे का..? अडखळती | कुणास आठवूनी कुणी असे का..? वळणावर एका त्या घुटमळती | घुटमळणारे मन ते सोडूनी, जावेच लागते तिला पुढे | काळा सोबत जर..

सुंदर चित्र ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 11/12/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
खूप सुंदर चित्र काढले होते तिने आजुबाजुला मस्त हिरवळ भले भरलेले वृक्ष गिरक्या घेत होती पाखरे कधिपण चिवचिवाट करतील ईतकी जिवंत सुरेखशी पायवाट नि आजुबाजुला दोन घरे खूप आवडून गेले म्हणालो :एक घर माझे एक घर तुझे तिने हसून बघितले नि म्हणाली ओ.के.
काव्यरस

वैषम्य

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 09/12/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मळक्या; उरात जखमा; ते लेकरू अडाणे शामल अशांत वेळी मातेस बिलगलेले माता-कुशीत दूजे त्याचे अकांत रडणे पोटात कोंब तोही; सारे कसे भुकेले डोळ्यात खोल करुणा स्वामित्व लोपलेले ना गोत; ना किनारा आशेत हरवलेले व्याकूळ काळजाचे; हे; रोप दीनवाणे परसात वेदनेच्या बांधून शकट गेले अस्वस्थ मी भिडस्त माझेच गाइ गाणे ओठी चणे दयेचे, अवघे दुरून पाही डोहात आंसवांच्या चंद्रसवे नहाणे देहास ज्ञात नव्हते निर्वस्त्र हे रहाणे ही जात माणसांची कैसी अशी विखारी बांधे कुणी मनोरे कोणी न पायरीही मातीतले स्वरूप मातीस ना विचारी देठास विषम काटे सुमनेहि पाठमोरी ........................अज्ञात
काव्यरस

इति प्रेमपुराण संपले

लेखक विदेश यांनी गुरुवार, 08/12/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्यावर त्याचे चॉकोप्रेम त्याच्यावर तिचे कॅडप्रेम जागत होता तिच्याचसाठी जगात होती त्याच्याचसाठी दु:ख काहीच ठाऊक नव्हते सुखात दोघे डुंबत होते ! आले कधी जर त्याचे डोळे तिचेच डोळे पाणी गाळे ! हासत खेळत आनंदाने मजेत जीवन चालू होते जिवापाड ते प्रेम तयांचे तहानभूकही विसरायाचे त्या प्रेमाला दृष्ट लागली... सुमुहुर्ताची ओढ लागली ! इति प्रेमपुराण संपले -त्या दोघांचे 'लग्न' लागले !

म्हातारा बसलेला असतो ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 08/12/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
चटेरीपटेरी अंडरप्यांट घालून डोक्यावर टोपीचा द्रोण लेऊन म्हातारा बसलेला असतो संध्याकाळी त्या लाकडी बाकावर सूर्याचे कोवळे उन्ह घेत अंगावर उघडाबंब ...!!
काव्यरस

पण........!

लेखक फिझा यांनी बुधवार, 07/12/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी राखून ठेवले होते शब्द, परवा शब्दांची ची एकच घाई उडाली, कागदावर उमटण्यासाठी त्यांची अगदी रांगच लागली भेटणार होतास तू , ठरवले होते म्हणूनच , सांगावे सारे सारे तुला,.......पण ............. न धाडता फक्त लिहिलेली पत्र एक न अनेक, वाचावीत घडा घडा ऐकत राहशील तू फक्त या आशेने सांगत राहावे सारे सारे तुला.......पण....... विणले होते धागे ,गुंतले होते मन कळत होते फुलांनाही आता उमलणे , वाटेवर डोळे लावून बसलेल्या राधेला सतावणे , येशील तेव्हा सांगेन खरे सारे सारे तुला.....पण...... अनोळखी म्हणून भेटलास खरा आत्ताच ओळख झाली म्हणालास खरा जे माझे नव्हते कधीच, मी गमावून बसले होते, तू म

खुणा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/12/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
विझल्यात खुणाही सरल्या गाथा उरले गीत व्रणांचे आकाशी तुटल्या तार्‍यांचे खेद कुणाला आता स्वेद ओघळे भाळावरती पाउल पुढचे पडता आग निवळण्याआधी भडके परतुन जाता जाता भंगुरतेचे स्वप्न अनोखे रेखिव घडले लेणे अभंग त्याचे गुणगुणतांना शिरी वाहिले मेणे गोत विखुरले शब्दस्वरांतुन गोत्र एक ते विरघळले पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले .......................अज्ञात ७/१२/२०११
काव्यरस