Skip to main content

कविता

दत्त दत्त बोलत गेलो

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/12/2011 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त दत्त बोलत गेलो दत्त दत्त बोलत गेलो गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो दत्ताला भजूनी धन्य झालो झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो || दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी जगामधे मीच आहे सर्व सुखी नकळे मला मी कोण होतो दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो || गुरूदत्तावरी माझा राही विश्वास दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो || चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात प्रयत्न करणे केवळ असे हातात मागणे माझे काही नसता दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो || - पाभे
काव्यरस

कळीकाळानं असला कसला मौका साधला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/12/2011 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
कळीकाळानं असला कसला मौका साधला कळीकाळानं असला कसला मौका साधला व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ|| बाप तू रं आमचा तूच आमची माय दूध बी तूच आन तूच दूधावरली साय कोना म्हनू आता आमी माय अन बाप तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१|| न्हावूमाखू केलं तू रं तूच घातलं खावू तू न्हाई समोर आता आमी कुठं पाहू इस्तवात पडलो जवा तवा तूच विझवाया आला ||२|| पुर्वप्रकाशित:
काव्यरस

आरसा

लेखक निश यांनी मंगळवार, 27/12/2011 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच मी पाहीले होते आरश्यात मला वाटले होते दाखवेल दोश माझ्यातले मला. दोश दाखवले, दाखवले सत्य हे जगणे जगताना कीती स्वारथाने फुकट नासविले

शिदोरी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 27/12/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
शिदोरी घाटांतून वळणा वळणातून पसरलेली हिरव्या निळ्या मोदकांची ताटे त्यावर पांढरे शुभ्र बर्फ खोवून वाढलेले नागमोडी शेवयांच्या दोर्या गच्च पकडून शक्य तेवढ्या सगळ्या बाजुन्नी हिन्दकळत नशा केल्यासारखी चाललेली बस सृष्टी सौन्दर्य चाखून, पिऊन, ओरबाडून टुन्न झालेली पन्धरा वीस डोकी डोळ्यांत मावत नसलेले, शब्दांत गावत नसलेले भराभरा पळणारे बेहोश क्षण नंतर हवे तेव्हा स्मृतीच्या काळडोहांतून जसे होते तसे बाहेर काढता येणार नाही हे माहित असल्याने कॆमेर्याच्या पटलावर आधाशासारखे कोरून ठेवलेले कधी वाघा सिमेवर सैनिकांच्या संरक्षणात शत्रूकडील बघ्यान्ना डिवचत केलेला मेरे देश की धरती

चालू नको अशी तू

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/12/2011 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
चालू नको अशी तू चालू नको अशी तू तोर्‍यात ग तोर्‍यात केस उडतात भुरूभुरू वार्‍यात केस तुझे मखमली आले गाली ओठांवर तिळ शोभे गाली खळी नको तिरक्या नजरेनं पाहू मीच दिसे तुझ्या डोळ्यात खट्याळ वारा तुझा उडवी पदर उगाच माझी त्यावर गेली नजर पाहून तुझं रूप झाली हुरहुर सावरून घे पदराला हातात सांग तू असा का करते नखरा बघून तुला मी मारतो चकरा जीवाला लावून नको जावू घोर कसं सांगू मी तूला प्रेमात - पाभे
काव्यरस

भेट

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
ती तरुणी चालली कुणिकड, डोक्यावर घेउनी घागर, पडता कानी बासरीचे ते स्वर, धुंद होऊनी ती चालली बेफिकीर. तहान आणि भुकेचा आता पडला विसर, नाजूक पायी तिच्या ना ठेचाचा असर, त्या स्वरातील हाक आहे ती जाणून, मग बेभान होऊनी ती चालली बेफिकीर. खरच त्या स्वरात आहे खूप माधुर्य, पण तिला तर सख्याची ओढ, ते तर आहे तिच्यासाठी भेटीच माध्यम, मग सख्याच्या ओढीन ती चालली बेफिकीर. आता ना कसल्या थकव्याची जाणीव, नाजूक पद तिचे पडती भर भर, आता त्याच्या भेटीशिवाय तिच्या मनास कसले चैन, मग बैचैन होऊनी ती चालली बेफिकीर. पाण्याच्या बहाण्याने ती सख्यास भेटत, त्रासली ती डोक्यावर घेउनी घागर, पण भेतीसमोर हा त्रास तिला वाटे नगण्य,

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी सोमवार, 26/12/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
तोल हा मनाचा तू जरा सावर रे. दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पड

ती पण माझ्यावर प्रेम करेल का...?

लेखक अन्नू यांनी सोमवार, 26/12/2011 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कळेल का? मित्रांनो, तुम्हीच सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का? पावसाळ्याच्या त्या रात्रीत, ती चिंSS ब भिजली होती; मला आठवते आमची, पहिली भेट तीच होती..! झाडाखाली ऊभी राहून ती, रिक्शाची वाट पाहत होती; अन् माझी वेडी नजर मात्र, तिच्यावरून हटत नव्हती. मनात फक्त एकच विचार..
काव्यरस

आठवणीने दे !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/12/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीने दे !! चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे , क्षितिजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे !! ढगांनी भरलेले आभाळ नाही मागत तुझ्याकडे , थेंबा थेंबा ने बरसणारा एक ढग मात्र आठवणीने दे !! बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे , श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे !! बेधुंद करणाऱ्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे , जाताना एक मोगऱ्याची कळी मात्र आठवणीने दे !!

विधिलेशा

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 26/12/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
जळली तृणके गिरी बोडके वणवा बिन बोभाटा कशाच उरल्या तशाच अजुनी पायखुणांच्या वाटा काजळ तनभर माळशिरावर त्यात विखुरलेल्या लाटा पोत धुळीचे अधिक उजळले शेष न एकहि काटा या वळणावर उभा एक मी निरखित लामण रेषा काळावरती उठून दिसल्या विरलेल्या विधिलेशा .......................अज्ञात
काव्यरस