मुलीची आई
माझ्या सासूबाईंनी केलेली कविता खाली देत आहे -
मुलगी जन्मली
सगळे म्हणाले
लक्ष्मी आली घरी
खूप बरं वाटलं, कारण आईच ना मी ||१||
अंगणातल्या चिमण्या
घरीदारी नाचतात
तरी घरट्याकडे वळतात, सांजेच्या वेळात ||२||
झगे परकरपोलके झाले
साड्याचोळ्या ल्याल्या
पहातापहाता जरा
मोठ्याच दिसू लागल्या ||३||
शिकल्या सवरल्या
स्वावलंबी झाल्या
आणि मन पोखरू लागल्या, उदासी सावल्या ||४||
आईचं काळीज धडधडू लागलं
पण कर्तव्याची जाण
मन खाऊ लागलं ||५||
मुलीची जात
नाही रहाणार घरात
जाईल परक्यात, पण नांदेल सुखात ||६||
तेव्हा वाटलं आत्या व्हावं
मावशी व्हावं
भावाबहीणींची व्हावं ताई,पण कठीण होणं मुलीची आई
काव्यरस
मिसळपाव
- गणपा भाऊ ने विशेष मदत करुनही मला येथे मीपा वर text format मध्ये हे फुलपाखरु व्यवस्थीत देता आले नाही,
खाली मुळ text देतो आहे, माझ्या येथे जेंव्हा मी हे पोस्ट करतो तेंव्हा मराठी शब्द चौकोन म्हणुन दिसतात , बाकीच्यांकडे मधील स्पेस विस्कळीत होते.
असो येथे देतो आहे, नीट नाही दिसले तर वरील इमेज नक्की दिसेन म्हणुन इमेज दिली आहे.
text format: