Skip to main content

कविता

स्पर्शून तारकांना..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 23/04/2010 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्शून तारकांना गाई पहाट वारा कंपीत शब्द माझे आणि तुझा इशारा!!! गंधात नाहलेली, लाजून जात जाई घेई उगा मिटूनी, तो शुभ्रसा पिसारा झंकारले अशी की, काया सतार झाली तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा आली भरात आता, भलतीच प्रेम वेला बेबंध श्वास माझे आणि तुझा उबारा.. स्पर्शात या तुझ्या रे, वर्षाव हा हिमाचा पेटून तप्त होई, माझ्या उरी निखारा दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा - प्राजु
काव्यरस

असाच व्हावा शेवट माझा......

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 23/04/2010 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
असा यावा मृत्यू मला की वेदनांनी सुखावून जावे आणि सुखानीही माझ्या कडे आता असूयेने पाहावे मी अशीच गुणगुणता गाणे श्वासांनी थांबून जावे लिहिता कविता मृत्यूने हळूच मजला कुशीत घ्यावे मी हुंगावे फुल सुगंधी आणि क्षणात राख व्हावे खाली ही असे पडावे जणू वेली वरुनी कुसुम गळावे जलाधीच्या वेगवान लाटेतुनी मृत्यूने घालावी साद कधी मी त्याच्यात विलीन व्हावे जणू मीच व्हावे मुग्ध नदी मुसळधार पावसात मजला दामिनीने करावे चिंब मी हासत हासत तिचे मनोरम बनावे प्रतिबिंब असाच व्हावा शेवट माझा थेट भिडवा मृत्यू मला आयुष्याने ठकावले बहु मृत्यूच इमानी अन असे भला अनुजा(स्वप्नजा)
काव्यरस

“ चंद्र हवा मज “ ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 23/04/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
“ चंद्र हवा मज “ ! ! ! “ किती करशी प्रेम मजसी “ ? प्रश्नं करी मज प्रेयसी. “ विशाल आकाशा येवढे, वा त्याहिपेक्षा जास्तच थोडे “ आम्हीहि वदलो लाडेलाडे “ ई s s श्य ! तुम बडे वो s s हो ! ! प्यार मे मगर सो-सो हो “ ! नाहीतर आतापर्यंत, घालूनी गवसणी गगनासी, आणुनिया चंद्रासी, दिधला असता नजराणा मज प्रेमळ हट्टा पायी “ बस ? इतकच ?
काव्यरस

दमलेले ढग

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 23/04/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग उन्हामुळे रापलेला तहानेने व्याकुळलेला कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही मी त्याला पाणी दिले अन विचारले इतका का धावतो आहेस ? असे काय लपवतो आहेस ? तो बोलला विमान मागे लागले आहे .. पाउस शोधणारे ... पाउस मागणारे ... मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ? कुणाला तरसवायचे !!! म्हणून धावतोय .. ज्यांनी निसर्गावर प्रेम केले, धरती अन आकाशावर प्रेम केले त्यांच्यासाठी ... http://binarybandya.blogspot.com/

समोर आता येते कशाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/04/2010 06:07 या दिवशी प्रकाशित केले.
समोर आता येते कशाला
समोर आता येते कशाला ||धृ||
समोर आता येते कशाला, तिर नजरेचा मारतेस मला मदनबाण लागतो ग उरी, जखम खोलवरी ठाव नाही ग तुला ||
समोर आता येते कशाला ||१||
याद असतीस मनी राहूनीया दुरी काळीज धडधडता काय न कळे ग मला होईल वेडा असेच वाटे ग मला ||
समोर आता येते कशाला ||२||
वाटे संगती असावीस सदा, नयनी माझ्या न गाळावे आसवांना कितीदा तरी हसलो समोरी, तू ग उभी तरीही न कळावे का तुला ||
समोर आता येते कशाला ||३|| - पाषाण
काव्यरस

आठवण

लेखक स्वप्निल मन यांनी गुरुवार, 22/04/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल

स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 22/04/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ? टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, कानोंकानी खबर आली, xxxx स्वामींना गुन्हयासाठी अटक झाली. मोर्चा, लाठीमार, सारं काही झालं. पोलिसांनी तरी त्यांना गजाआड केलं ! भरल्या घरची लेक, *पोटुशी राहिली होती. अन स्वामींची तक्रार, पोलिसांत नोंदली होती. जमानत ! सुटका ! ! सारं रीतसर झालं ! ! ! स्वामींनी सगळं कसं सहज “म्यानेज ” केलं ! भरल्या घरच्या लेकीला “ गुरुमाय ” केलं. अन संग संग विमाननं “फॉरेन “लाही नेलं !

तू असं यावस......

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 22/04/2010 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू असं यावस.... नकळत........ थंडगार वाऱ्याच्या झुळकी सारख.... गरम उन्हाच्या झळा माग साराव्यास...
काव्यरस

शुद्ध दाद दे !!

लेखक बाळअमोघ यांनी बुधवार, 21/04/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील माझे पहिलेच लिखाण आहे. (चूभूदेघे) एक कविता आहे .. कलाकाराच्या भूमिकेतून लिहिलेली. हे गाण लवकरच दुवा स्वरुपात देइन. ताल सूर नाद्ब्रह्म , अन्तरात घे मैफल ही ईशदान, शुद्ध दाद दे !! गंधर्वच करिती गान, निर्मळ नि:स्वार्थ दान याचक हो, हो भोगी, शुद्ध दाद दे !! जन्म मला काही क्षण, सार्थक तो होइल पण निर्मि कला तव कारण, शुद्ध दाद दे !!

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/04/2010 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगित: रानातले खेळ जरा खेळू हिरो: अग ए मैना जरा इकडं ये ना जावूया राना नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना
गोड गोड पोळं झाडावर उभं काढायंचं कसं म्हणतीस का गं कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं टपटप मध चोखून घे ना चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना आता नको नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
हिरवीन: नको रे सजना आले मी राना कुणा सांगता विना सांगल कुणी तर माझा बा येईल ना (दांडकं घेवून माझा बा येईल ना)
काव्यरस