लेखकझुम्बरयांनी मंगळवार, 20/04/2010 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे ९ वाजता कसेबसे डोळे उघडले
आणि घाबरत घाबरत मी बाथरूम गाठले
मातृदेवातेची बडबड चिडचिड नेहमीसारखी
आज कानावर माझ्या कशी ती पडलीच नाही
उशिरा उठूनही कोणी माझ्यावर तोफ डागली नाही
टेबला वरती आई ने पोहे काढून होते ठेवले
कसेबसे कोंबून तोंडी धावत पळत कॉलेज गाठले
प्रवेश द्वारी पाहुनिया सरांची रागीट स्वारी
परत मुकाट्याने फिरवली मी माझी बापुडी सवारी
थेट मग मी लाडक्या fashion street वरी शिरले
मनसोक्त कपड्यांच्या खरेदीत बुडुनी गेले
गम्मत अशी घडली की मला सगळे फुकट मिळाले
कारण अस्तित्व माझे कुणाच्याही खिजगणितही नवते
नंतर मग मलाच माझी भीती वाटू लागली
आणि मग आईची मऊ कुशी मला आठवली
वाटल
लेखकचिर्कुटयांनी मंगळवार, 20/04/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कर माझ्यावर
किंवा माझा द्वेष कर
मागणं मात्र एक मान्य कर
जे करशील ते मनापासून कर
तुझ्या प्रेमाने मला मढव
आणि प्रीतिने जडव
अथवा रस्त्यात अडव
आणि सँडलने तुझ्या बडव
कॄपा मात्र एक माझ्यावर कर
जे करशील ते मनापासून कर
हात तुझा दे माझ्या हातात
अथवा दे श्रीमुखात
आयुष्यात दे मला साथ
अथवा पेकाटात घाल लाथ
धन्य होईल प्रेम माझं ऐकलंस तू जर
जे करशील ते मनापासून कर
लेखकविशाल कुलकर्णीयांनी मंगळवार, 20/04/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा मनाच्या पसार्यात राम नाही,
बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही !
सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती,
मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही !
इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही,
फुलांच्या मनी राहिला आज राम नाही !
कशाला हवे चंद्र.., तार्यांचे चांदणेही,
अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही !
हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे,
उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही !
विशाल.
लेखकसन्जोप रावयांनी मंगळवार, 20/04/2010 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द
वंगणबद्ध
ही सकाळ
इसबगोल
थॅन्क्स
हिरव्या मिरच्या
गरम मसाला
दीर्घपार्ट्या
अॅसिडीटी
गरम घशाशी
गुरगुर जरा
तरी बाटली
बूचबंद
किंचित कळ
बंद दार
सुलभ सुलभ
अतिआनंद
लेखकमीलीयांनी मंगळवार, 20/04/2010 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो.
तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे!
म्हटले यावेळी आपण का मागे राहावे!
लेखकनिरन्जन वहालेकरयांनी सोमवार, 19/04/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ! अरे s s s रे ! ! !
जन्मलो तेव्हांच मृत्यो अरे !
भेट अपुली ठरली असे.
यौवानांत मी, अन अचानक,
आज तू द्वारी वसे.
अधिरता तुज, काय वेडी
मिलनाची आपल्या.
लोक म्हणतील हाय हाय,
मिलनासी आपल्या.
.
गेले आज विपरीत समयी,
खंत ह्याची इतुकी नसे.
गेले तुजसवे मी यौवनी
शोक याचा सकलां असे.
निरंजन वहाळेकर