Skip to main content

कविता

..(चुकले माझे)..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 04/04/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
चुकले माझे ---------------------------- शाळेला वनवास म्हणालो,चुकले माझे.. तासाला मी त्रास म्हणालो,चुकले माझे.. वर्गामध्ये गुरुजींना का वेड लागले..! केला ना अभ्यास? म्हणालो,चुकले माझे.. तातांनी मज असे फोडले नका विचारु.. मी झालो नापास म्हणालो,चुकले माझे.. रस्त्यावरती राडा झाला,डोकी फुटली . आयटम अगदी क्लास!!! म्हणालो,चुकले माझे.. कांदेपोहे,चहा पिऊनी किती लाजलो.. ही कॉफि फर्मास! म्हणालो,चुकले माझे.. मैफिलीतला बरा कवी तो भ्रमिष्ठ झाला.. का लिहिले बकवास? म्हणालो,चुकले माझे.. घोडादेखील त्या नवर्याचा जाम बिथरला.. तव घोडी झक्कास!
काव्यरस

जखम

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 04/04/2010 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
हृदया वरली जखम ओली कधी गोठली कधी वाहिली कधी हुंदका अस्पष्ट जरासा कधी मनातून खोल उसासा कधी नयनातून अवचित गळती खारट मोती गालावरती प्रिय मला परी जखम माझी सदैव राहो ताजी ताजी....!
काव्यरस

पाणिग्रहण

लेखक स्पंदना यांनी शनिवार, 03/04/2010 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाणिग्रहण......... रुढिन ठसवलेल इतरानि सुचवलेल 8> तु मनोमन असशिल जाणल तर हा हात धर र॑ग रुप शरिर मनि जाचत नसल त्या पलिकडे तुझ मन पोचल तर हा हात धर माझ्या मनिचा भाव माझ्या भावनन्चि गुम्फण हे सर्व तुला पुरेपुर उमगल्...भावल तर हा हात धर या प्रितिच प्रतिबिम्ब तुझ्या मनाच्या आरशात अगदि अस्सच उमटल तर हा हात धर घेण्यापेक्शा देण्या कड रागापेक्शा लोभाकड जर तुझ मन झुकल तर हा हात धर...... लेखक हो तुमच्यासाठि... अपर्णाचा सलामि नगमा चु.भु.द्या.घ्या.
काव्यरस

नका अंगचटीला येवू

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 03/04/2010 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, पुन्यांदा रामराम. आज परत ही लावनी ऐका. आजची लावनी लिहूनशान म्या या आयपीएल किरकेट च्या मॅचेमधी जशी हॅट्रीक करत्यात तशी सलग तीन दिवस ३ लावन्या लिहूनशान हॅट्रीकच केलीया. तुमी म्हनाल या सुक्काळीच्या पाषानाला काय लावनी चावली का लावनीवालीनं धरलं. पन काय सांगू मंडळी, आहो खिशात 'लय शिरीयस' मुक्तछंदी परकृतीच्या ४/५ कवितांचे ड्राफ्ट हायती. पन मन ह्ये लावनीकडंचं वळतया पगा. माझ्यासारख्या दगडफोडी करनार्‍या मान्साला आसं लय इचार करूं करूं लागलं म्हंजे माझं टाळकं कसं पहार लावल्येल्या कातळागत फुटतंया पगा.
काव्यरस

दागे उल्फत का जलाना

लेखक सागरलहरी यांनी शुक्रवार, 02/04/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज आखिर कुछ लहू से, ऐसे गुजर रहा है.. कोइ पूछे तो कहेंगे, जनाजा गुजर रहा है.. बात कुछ ऐसी अनकहीसी, थी कही किसीने .. गूंज लेके अब-तलक, ये दिल संभल रहा है.. कुछ पलों की बस जवानी, कुछ समेटी यादें.. इतनाही सामां बचा था, अब के ये जल रहा है.. दागे उल्फत का जलाना, जुल्मे-फित्रत नही "सागर" जी के जलना, जलके जीना, सिलसिला ये चल रहा है.. --सागरलहरी.

दगडफोड्याचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 02/04/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
दगडफोड्याचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला) मंडळी, लावणी म्हटली की ती शृंगाराची असावी/असते असा आपला समज. पण लावणी ही त्या पलिकडे जावून आध्यात्मिक किंवा सामाजिक पद्धतीचीही असू शकते. खालील लावणीत आपली नेहमीची हिरवीन थोडं वेगळं बोलतेय. ती काय म्हणते ते बघा तर खरं: दगडफोड्याचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)
काम करोनी म्हेनत घ्येवूनी आपन वाढवू सौंसारा गरज तुमची चिल्यापिल्यांना तशीच गरज आहे मला नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||धृ||
काव्यरस

'आई'[एस.एम.एस.]

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 01/04/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मी रचलेली नाही पण मला ह्या कवितेचा कवी पण माहीत नाही.... ही कविता मला सरळ मोबाईल संदेश[एस.एम.एस.] द्वारे आलेली आहे पण खुप आवडली म्हणुन मिपा रसिकांसाठी देण्याचा मोह आवरला गेला नाही ...... आवड्ली तर अवश्य प्रतिक्रिया द्या.... "आई आहे मंदिराचा उंच कळस... अंगणातील पवित्र तुळस... भजनात गुणगुणावी अशी संतवाणी... वाळवंटात प्यावं असं थंडपाणी.... आई म्हण़जे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी... आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..."

कवितेचा मार ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 01/04/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा मार ! ! ! जेष्ठ कवींचे संमेलन, भरले श्रोत्यांनी प्रांगण. कवींना चढे अगणित स्फुरण, श्रोत्यांची स्थिती दारूण. झडती कवितेच्या अगणित फैरी, ए के – 47 च्या माऱ्या परी. श्रोते जाहले सैरावैरा, धडकी भरे त्यांच्या उरी. आधीच समस्त श्रोते वेठीला, त्यात एक कवी अवतरला. छेडीला भीमपलास कवितेचा, उतावीळ श्रोते भैरवीला. . जाहले तास दोन तास, तरीही ना सरे त्याचा अट्टाहास. वदे एक श्रोता शेजारी स्त्रीस “ काही उपाय सुचवा हो “ ! वदली ती गौरांगना सत्वर, “ तुम्हीच काही सुचवा गुरुवर, सहते वीस वर्षे हा कवितेचा मार उपाय परी ना गवसला आजवर.
काव्यरस

नाचरी गाय - २ (आधारित)

लेखक चित्रा यांनी गुरुवार, 01/04/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची कविता आणि पूर्वपीठिका/संदर्भ इथे http://www.misalpav.com/node/11707 (पामेला ट्रॅव्हर्सच्या मेरी पॉपिन्समधील एका कथेवर आधारित) हा भाग जरा लांबला, पण मूळ कथेतील वर्णनाचा विस्तार पाहता हे ठीक वाटले. माझ्या संगणकावर घातलेले तक्ते दिसत नाहीत, म्हणून वाचायला अजून सोपी करता आली नाही. (असेच गेले दिवस बहु अन अशाच गेल्या रात्री अनेक थांबेना फडफडते शेपूट आणि नाचरे पाऊल एक) ..(येथून पुढे सुरू ....
काव्यरस

रानातली वाट - The Way Through the Woods

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 01/04/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर बऱ्याच अनुवादित कविता दिसल्या म्हणून ही रुपांतरीत कविता व त्यासंदर्भात मी लिहिलेला छोटासा लेख इथे टाकत आहे.
काव्यरस