Skip to main content

कविता

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

आभारी वेदनांचा !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/03/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
कंटक सारे आठवांचे श्वासात सखे रुतलेले कांगावे अन स्वप्नांचे.., आकांक्षात गुंतलेले....... काळ ओलांडूनी मागे दिवस जुने फिरलेले बोभाटे ओल्या स्मृतींचे अश्रुंनी ते मिरवलेले .... श्वासही भ्रष्टाचारी माझे तुजसवेच बांधलेले लगाम वेड्या मनाचे मम हातातून सुटलेले.... मी आभारी वेदनांचा मज तयांनी सावरलेले तटबंदीचे कोट मनाच्या भोवती मी बांधलेले.... नको दिलासे चांदण्याचे उजेडात बरबटलेले मळलेले बिंब प्रकाशाचे.., अंधार उजळू लागले..... विशाल.

आमच्या सम आम्हीच ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 18/03/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सम आम्हीच ! ! ! रुपयौवना जणू विश्वाची तू, आम्हीही नाही कमी. वृथा अभिमान सोड आता, येईल प्रचिती तव सत्वरी ! सौंदर्य कसले बागेस त्यां माळीच ज्यां निगेला नसे चार दिसांचा ताटवा मग़ पाकळ्यांची झड असे ! ! लावण्ण्याची बाधा तुला लेखू नको मजला कमी, पाहिले बाग़ अगणित आम्ही गुलाबांची येथे नाही कमी ! ! ! निरंजन वहालेकर

त्यानंतर सगेळ्च थांबले आहे ...

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 16/03/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
कशाची पर्वा न करता सूर्य उगवतो आहे, चिमण्या दाणे टिपत आहेत मला वाटत ही शांतता संपेलच आता.. नवा बेड आणलेला दिसतो शेजारी मुलाचे लग्न आहे घरातल्या म्हातार्‍या आजीला भरवणारी बाई..खिडकिशी आहे गरम वारा आत येतो ..उघड्या खिडकीतून .. तशी रेडियोवरची गाणी कुठलीतरी बाबा आदमच्या काळातली ,नाकात गायलेली.. किती आनंदाचे दिवस उरले आहेत कुणास ठाऊक.. ( एक सुंदर तरूणी सलून मधून रस्त्यावर येते) आली वाटत ती.. तिच्या गालावरची बट वारा येतो , बट येते .. (रस्त्यालाही पाने फुटतील असे वाटते अवेळी) तिला पाहून 'आलोच आजी '- म्हणत शेजारचा देखणा तरूण बाहेर पडतो.. मोटरसायकलवर निघतो.. ऐटीत ..

टारझण मला खास वाटत नाहीत

लेखक उग्रसेन यांनी मंगळवार, 16/03/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनाच्या कक्षा ओलांडून तू मिसळपावच्या कुशीत शिरलास. [योग्यता नसतांना] याचे लेखन मोड, त्याचे तंगडे मोड, शब्दार्थापेक्षा इथं चिन्ह, तिथं चिन्ह, मिसळपावच्या बोकांडी हा उभा. वेळ जात नाय म्हणून यांच्या लेखनाच्या लाटावर लाटा, संकेतस्थळाचा भरतो नुस्ताच डाटा. दुर्लक्ष हाच एकमेव उपाय कारण वेळ आली आहे, याला करण्याची टाटा.
काव्यरस

(आज अचानक गाठ पडे)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 15/03/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की?
काव्यरस

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 14/03/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रेशमी केसांनी : एक सुडंबन विजुभाऊंनी विघडवलेलं सुघडवण्याचा माझा प्रयत्न. मूळ विडंबनाशी एकनिष्ठ राहाण्यासाठी यमक, वृत्त, कवितेचा स्वर व बरेचसे शब्द तेच ठेवलेले आहेत.
काव्यरस

बेघर

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/03/2010 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं या पावसातही तुझ्या आठवणींना लपेटून घेतलं मी कवितेत. हळूच दुडले काही दिवस एकमेकांसोबतचे शाकारली स्वप्नांची कौलं नि पडलो जरासा वाचत मजेत नव्या छपराखाली त्याची वाट बघत चवदार शब्दांचे घुटके घेत पण वाचता वाचता डोळा लागताच हा कोसळून गेला धबाधबा माझी फिरकी घेत. जाग येऊन बेघर झालो पुन्हा नि फुटक्या कौलांचा तो ढीग घेतला पुन्हा कवेत. आता आधी कौलं घालू की वाचन संपवू इतकाच प्रश्न आहे. पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!
काव्यरस