Skip to main content

कविता

घर

लेखक sur_nair यांनी शनिवार, 13/03/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
घर घर, एक वास्तू विटा मातीची घर, एक कल्पना प्रत्येकाच्या मनाची घर थारा निवारा कष्टाचे अन घामाचे घर इच्छा आशा सुखद आठवणींचे घर महाल वाडा झोपडे वारूळ गुहा खोपटे कधी कपार उंच कड्याची कधी भुयार पोखरलेले घर बालपणीचे भातुकलीतल्या खेळातले गोष्टीतल्या चिऊ काऊचे एक मेणाचे एक शेणाचे घर तारुण्याचे जिद्ध अपेक्षा आकांक्षेचे भविष्याच्या ओढीचे गोड गुलाबी स्वप्नांचे घर वार्धक्याचे आश्रयाचे आधाराचे स्मरीत, काही विस्मरीत, अशा आठवणींच्या गोतावळयाचे घर प्रेमाचे, विश्वासाचे नाती - गोती, जुळलेल्या मनांचे घर संशयाचे, विरल्या स्वप्नांचे दुभंगल

पाठलाग

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 12/03/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाठलाग गुंतुनी इश्कांत तुझिया , वैफल्यता मी ल्यायली. दर्द आठवणींचा उरी, झोप नित्त्याची लोपली ! मरण माझे याच देहि याच डोळा पाहिले, पोहोचलो मरणद्वारी परि,यातनांनी ना त्यागले ! होतो पहुडलो शांत येथे, आज मी सरणावरी, आलीस त्रास देण्या पुन्हा, काढीत माग इथवरी ! निरंजन वहालेकर
काव्यरस

स्वप्ने

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 11/03/2010 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती... ती डोळ्यातुन स्वप्नं सांडत होती... अन ती स्वप्ने वेचायचा मी निष्फळ प्रयत्न करत होतो... माझी स्वप्ने , तिची स्वप्ने, आमची स्वप्ने ज्या डोळ्यांत मी सजवली होती.. त्याच डोळ्यांतुन ती आज कितीतरी स्वप्ने सांडत होती... अगणित... निघून जाताना तिच्या डोळ्यातले एक स्वप्न माझ्या तळहातावर विसावले होते, अन तळहातावरल्या आसवामध्ये मात्र मला फक्त माझच प्रतिबिंब दिसत होते..

रस्त्यात मामा आडवा येतो जेंव्हा...

लेखक Navigator यांनी गुरुवार, 11/03/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: आपण सकाळी सकाळी जेंव्हा घाई घाई मध्ये कामासाठी चाललो असताना, आपण ट्राफिक सिग्नल तोडतो आणि मग पोलीसवाला मामा आपल्याला थांबवतो आणि मग आपल्याकडून पैसे लुटतो..
काव्यरस

नजर

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 11/03/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.

प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला | प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला ||

बोलूया नजरेनेच आज आपण | फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||

नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी | जखमेची ह्या तू दवा दे मला ||

खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी | सुखासाठी आज त्या जगू दे मला ||

काव्यरस

परम सन्तोश

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 10/03/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
परमसंतोष ज्ञात असते ती शोक इतुका, करणार माझ्या मरणावरी गाठले असते मृत्यो तुला भेटुनी वरचेवरी !

भग्न किनारे

लेखक जयवी यांनी बुधवार, 10/03/2010 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
का उदास वाटते नयनी पाणी दाटते असून घोळक्यातही एकलेच वाटते बोलणे नको नको मौन सुखद वाटते विचारही मनी नको रितेच मुक्त वाटते शांत सागरातही भोवरे नवे नवे वादळे जुनी परी भग्न किनारे नवे उजाड माळरान हे गंध, गारवा नको श्रावणातही घना बरसणे तुझे नको जयश्री
काव्यरस

साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रतिभेचा ई आविष्कार!

लेखक प्रसाद यांनी मंगळवार, 09/03/2010 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या संकेतस्थळाने 'प्रतिभेचा ई आविष्कार'या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यपूर्ती, उखाणे मित्रमैत्रिणींचे, चित्रावर चारोळी आणि इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द अशा या स्पर्धा असणार आहेत. तेंव्हा आजच http://sahityasammelan2010.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रतिभेचा आविष्कार करा आणि साहित्य संमेलनामध्ये आपला ई-सहभाग नोंदवा ही मिपाकरांना आग्रहाची विनंती! [तात्या नमस्कार!, ही बातमी वजा आवाहन मिपावर कुठे टाकावं हे कळलं नाही म्हणून येथे देतो आहे...

करप्शन

लेखक श्रीराम पेंडसे यांनी मंगळवार, 09/03/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
करप्शन श्री. संदीप खरे यांच्या 'नेणिवेची अक्षरे' या काव्यसंग्रहात त्यांची "दाढी काढून पाहिला....." अशी एक कविता आहे. ही कविता ते " आयुष्यावर...." कार्यक्रमातही खूपच प्रभावीपणे सादर करतात. ही कविता म्हणजे माझ्या या कवितेमागची प्रेरणा आहे. आणि म्हणून श्री. संदीप खरे यांची क्षमा मागून ही कविता सादर करत आहे.........