Skip to main content

कविता

विक्रमादित्याचा पोवाडा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/02/2010 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी म्हणती वाघ म्हातारा कीं हो झाला SSSSSSSSSSS कुणी म्हणे त्याचा दरारा कीं संपला.... हो ओ SSSSSSSS पण महाराजा... शेर आखीर शेर होता है...... त्यानं सोडला नाही ठाव..SSS, सोसले..., गुमा SSS न सारे घाव SSS.... लावला नेम, पकडली येळ ..... अन डाव कीं हो साधला ..... जी ई ई SSSSSSS सन २०१०, वार बुधवार, स्थळ ग्वाल्हेरनगरी बडी पाव SSS न ... राजानं यवनांशी दावा कीं हो मांडला..SSSSS रणभेरी वाजलेली आहे, गनिम माजलेला आहे.... पहिल्याच घावात राजाचा सेनापती कीं हो पाडला.... शत्रुसैन्यात आनंदी आनंद झालेला आहे.... राजाच्या सैन्यात हाहाकार...
काव्यरस

चल उसात दंगा करू

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 25/02/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

काव्यरस

लहानपणीच्या सदाबहार कविता - १

लेखक Manish Mohile यांनी बुधवार, 24/02/2010 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
कविता - मानवी मनाच्या स्रुजन्शीलतेचा कल्पकतेचा एक कलाविष्कार. अगदी लहानपणापासून आपला या कवितान्शी सम्बन्ध येतो. तान्हे बाळ असताना अन्गाईगीत, बडबड गीते यान्च्याअ रूपानी. एकदा शाळेत जायला लागले की मग काय - बालभारती कुमारभारती मधुन पद्य विभागच सुरू होतो. यातील काही कविता निव्वळ ताप किन्वा डोकेदुखी वाटतात. पण काही मात्र मनात अगदी घर करून बसतात - त्यातील गेयतेमुळे, सुन्दर शब्दरचनेमुळे, शब्दचित्रान्मुळे , आशयगर्भतेमुळे. अर्थात हे सगळे बारकावे वयानुसार लक्षात यायला लागतात. पण लहान वयातसुद्धा काही कविता वाचल्याक्षणी आवडून जातात. आपोआप लक्षात राहतात.

वाट पाहणं!

लेखक राघव यांनी बुधवार, 24/02/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं! नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!! कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का? डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना? :W हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं.. वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं! गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!! :) आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं.. ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण? इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? :) त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं.. राघव

(माझ्या कविता - असा पाऊस पडावा : एक विडंबसुनीत)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 22/02/2010 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
(मी माझ्या कविता इतरत्र कुठेही लिहिलेल्या नाहीत. या माहितीचा वाचकाला काही उपयोग नाही हे माहीत आहे. पण सोचा बताने मे क्या हर्ज है? या कवितेवरून मला खालील ओळी स्फुरल्या. ही कविता वाचून मला टायपिंग नीट येत नसेल असं वाटेल. पण नाही, तो विडंबनाचा भाग आहे.
काव्यरस

पाउस - मुळ कविता

लेखक sur_nair यांनी सोमवार, 22/02/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस असा पाउस पडावा सुक्या मातीस ओलावा धरीत्रीत निजलेल्या बिजा अंकुर फुटावा असा पाउस पडावा पिके जोमाने वाढावी दोन्ही वेळा चुलीवर पुन्हा भाकर शिजावी असा पाउस पडावा त्याचा पैसा झाला खोटा नंदीबैल यावा दारी सांगे 'सुट्टी आज शाळा' असा पाउस पडावा मोरपिसारा फुलावा घरी दारी अंगणात राग मल्हार घुमावा असा पाउस पडावा झिम्मा खेळतील सरी बळीराजा ही खेळेल हिरव्या रंगाची पंचमी असा पाउस पडावा झरे तुडुंब वाहती घेती दरीतून उड्या त्यांची धिटाई केवढी असा पाउस पडावा पुर यमुनेस यावा कुणी गोपिका बावरी
काव्यरस

अशीच जर आमुची आई असती........

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच जर आमुची आई असती........ असे हो कोणी दिनीचा तो वार लागला होता महाराजांचा दरबार आमचे मध्ये राजे भोवती सरदार स्वराजाचा चाले असा कारभार जी........

नकारघंटा.............

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज विसरुनी यत्न कालचे नवदिनी गुंतलो आज पुन्हा नकारघंटा वाजत राही तरी मनी आशा हा काय गुन्हा भूमीपुत्र हा असा मी अडलो संथता,अनुबंध,अतिक्रमणात अडकलो पात्रता निपुणता धाब्यावर बसवली आता मात्र प्रभूरामाची वाणी उमगली असे हे कलयुग आज उगवले काग मोत्य कंकर हंस गमले परकीयांचे गमभन रुजले राज्कृत्या राजनितीस रमले आज वाचा हि फोडत येथे युवाशक्ती महायुवाच नेते अतिक्रमणास धड्भू धम लावू नैपुण्य, पात्रता शिरोधिनी पाहू - मंगेश पावसकर