Skip to main content

कविता

आठवण...(२)

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 02/02/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तुला पाहून तुझा सुगंध माझ्या श्वासात भरून डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या आवाजावर समाधान मानतोय ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा ती शेअर केलेली कॅडबरी बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा' नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा सगळ्याची आठवण येतेय आजही माझ्याकडे आहे तुझा तो पहिला मेसेज आणी पहिल्या शॉपिंगचा शर्ट आज तोच शर्ट घालून ऑफिसला जावे म्हणतोय
काव्यरस

कारे प्रिया दूर जाशी,

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 02/02/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
चिम्ब चिम्ब वाटा, चिम्ब चिम्ब झाडे, आसमंती मन होते, चिम्ब चिम्ब वेडे..... वरुण राजा आज कैसा, धरित्रिला कुरवाळितो सोडुनिया आकाश घरटे, प्रिये कड़े झेपावतो..... कारे प्रिया दूर जाशी, अश्या चिम्ब वेळी, दाट धुक्याचे कोंदण माझे, अंग अंग जाळी......... सागर लहरी

आज अचानक...

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक कातरवेळी, मनी दाटती काजळरेषा वाट चालुनि थकली पाऊले चल साजणा अपुल्या देशा गर्भरेशमी यौवन सरले, शैशव आता स्वप्नचि उरले आठवणींचा खेळ चालला संध्याछाया झाकोळती दिशा सखेसोबती वाट पाहती समांतर वाटा जरी चालती मधुर क्षणांची बकुलपुष्पे अजुनि जागविती मनी आशा पैलतीरी नेत्र लागले स्वप्नांचे आभासही नुरले नको येथले भास मखमली अन परतीची फसवी भाषा.
काव्यरस

मनात माझ्या...

लेखक अजिंक्य यांनी सोमवार, 01/02/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनात माझ्या विचार आले, अफाट वेगामधे पळाले, कुठून आले, कुठे निघाले, कळे न काही... मनात माझ्या उरे न जागा, लगाम नाही विचारवेगा, हजार घोडे लहान पागा, कळे न काही... मनात माझ्या अनेक वाटा, दिशादिशांना अनेक लाटा, जिथे बघावे नवीन फाटा, कळे न काही... मनात माझ्या विचार आले, सुसाट वेगे नभी उडाले, विहार केला, उडून गेले, कळे न काही...

माझी अगतीकता

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/01/2010 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अगतीकता अगदी सकाळी मी उठलो, उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो. तर काय सांगत होतो मी...

काकमित्रा

लेखक सागरलहरी यांनी शुक्रवार, 29/01/2010 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
अंतीच्या कळान्चे | जिवाला लागीर | सोसेना उशीर | काही केल्या || भयकारी चित्र | दिसते सर्वत्र | घरदारा पुत्र | धूसरती || धुमस ही कंठी | नाही येत ओठी | राहिल्या त्या गोष्टी | सांगायच्या || सांगितल्याविण | समजावे मन | उतरावे ऋण | कसे आता || पिन्डाला वेढीन | गुज सुचवीन | मग घास देइन | काक मित्रा || - सागरलहरी

प्रहरांचे दु:ख.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 27/01/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार ! मंडळी , सहज मनात विचार आला , आपण जे सारखे तुलना करत असतो एकमेकांशी, प्रत्येकाला नेहेमीच वाटते , माझ्यापेक्षा याची (शेजार्‍याची)बायको / शेजारणीचा नवरा सुंदर आहे ! देअर ईज ऑल्वेज अ ग्रीनरी ऑन द अदर साईड ऑफ द फेन्स ! आणि मग वाटले हे प्रहर पण करत असतील का हो एकमेकांशी तुलना? ह्या विचारातून काही ओळी सुचल्या.....बघा पटतात का..... प्रहरांचे दु:ख..... हे भरले मळवट* भाळी मिरवते कशी ही उषा?

अगतिक.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 25/01/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
अगतिक..... हातात हात घेण्या मी वाकलो तुझा पण सहसा कधी कुणाचा .....झालो गुलाम नाही ! तू झेललीस थुंकी ...लाचार तू सदाची , विकण्यास मी तयार्.....माझा कलाम नाही ! काळीज ओतुनी मी , जे मांडले , जगी या त्या गायकास "वाहव्वा" .....मजला सलाम नाही ! नुरलो न मीच माझा मरणापल्याड सुध्दा इतुका सखे कुणाचा , कुणीही गुलाम नाही ! भिजल्या दवांत होते , ते केस तुझे सोनेरी शब्दांत कसे ते मांडू?- नाही - कलाम नाही !

असे सखे तू रुसू नको ना.....

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 23/01/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
असे सखे तू रुसू नको ना , मोती डोळां सांडू नको ना , फुला फुला रे माझ्यासाठी, असे उगा तू रुसू नको ना .. |१| असे कोणते दु:ख तुला गे , कुणी बोलले काय तुला गे, कटू बोल ते स्मरू नको ना, असे सखे तू रुसू नको ना.. |२| चंद्र कोर बघ अर्धी झाली, कळी उमलता तशी थांबली, अशी पापणी मिटू नको ना, असे सखे तू रुसू नको ना..|३| हसशी जर तू जग हे हासे, तयासाठी तर हास जरासे, मला दूर तू करू नको ना, असे सखे तू रुसू नको ना..|४| -- सागर लहरी १७.१.२०१०

तत्वज्ञान.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 22/01/2010 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! जवळजवळ ७ वर्षे झाली असतील ( २७ जुलै २००३) एक कविता लिहायला सुरुवात केली , पण एक कडवे झाल्यावर काही सुचेचना.ती कविता आज एका मैत्रिणीचा "मैत्री" वर एस एम एस आला आणि त्याला उत्तर म्हणून ४ ओळी पाठवल्या तेंव्हा ती पूर्ण होण्याएव्हढे काही सुचले आहे , बघा आवडते का ते ! तत्वज्ञान..... बदलते ते वय बदलत नाही ती वय भावतो तो भाव भोवतो तो स्वभाव ! सतत बदलतो तो रंग अविचल रहातो तो श्रीरंग समजण्यासाठी वाढते ती संगती आणि मग जाणवते ती वि