Skip to main content

कविता

अंत:स्थ

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 05/01/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे.

प्रेम काव्य संग्रह

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 05/01/2010 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या दोन आयुष्यांचे क्षण एकमेकांत मिसळून जाती झालो मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती ------------------ एका क्षणी तुला पाहिले क्षण तो खास अगदी त्या क्षणी मिळाला क्षणाला क्षणाचा सोबती ------------------ तुझ्या प्रेमातला "मी" ------------------ प्रेमात तुझ्या गुंतलो मी माझाच नाही उरलो मी प्रेमाच्या खेळात जिंकलो मी हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी..... भेटलीस तेव्हा हरखलो मी हसलीस तेव्हा हर्षलो मी रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी निघालीस तेव्हा हिरमुसलो मी..... तू दूर होतीस तेव्हा तुझ्या हृदयात दिसलो मी परत कधी आलीच नाहीस तेव्हा माझ्याच अश्रूंमध्ये
काव्यरस

रान वाट

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 04/01/2010 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीवर घेउन उगवती, रान वाट ही पळते सरते, सुवर्णकण कवडशांमधुनी, देवाचे ऐश्वर्य उसळते.. काठावरच्या झाडावरुनी, पक्षी मंजुळ स्वरास गाती.. गवताच्या पात्यावर हलके, सोन्याचे हे थेम्ब चमकती.. मंद मंद वा-याचे गुंजन, ऐकून सारे चित्र डोलते ... सुवर्ण कण कवडशा मधुनी, देवाचे ऐश्वर्य उसळते.. बैसुनी थोड़े निवांत व्हावे, मनातले झाकोळ पुसावे वाटेला या गुज सांगावे, वाटे फिरुनी इथेच यावे विश्व हे सारे आनंदाचे, जगण्या पुन्हा उमेद देते पाठीवर घेउन उगवती, रान वाट ही पळते सरते, सुवर्ण कण कवडशा, मधुनी देवाचे ऐश्वर्य उसळते.. -- सागर लहरी १४-८-२००९ ,

करतो अजून आशा....

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 04/01/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी अशी दरिद्री, जगते ही रोज मरुनी, निर्लज्ज लांडग्यांचे, असहाय्य भक्ष्य बनुनी, पिचली उरेही फूटती, खळगीत अन्न भरुनी करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणुनी, बघतो नवीन चाळे, गीधाड कावळ्यान्चे... घेतो मिटून डोळे, बघताच थेर त्यांचे .. जगतो कसे म्हणावे, मरतोच रोज आम्ही .. करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणुनी, घेउन अमर पट्टा, नव्हता कुणीच आला, झुन्जात सांडला तो , नव्हता कधीच मेला, तानाजी बाजी सारे, होऊ सवेच आम्ही, करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणुनी, - सागर लहरी ८-१०-२००९

परी

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 04/01/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
परीच्या गावची अबोल राणी शांत असे जस नितळ पाणी नितळ पाण्याच्या गाभ्यात काय? उजाड़ रानात मन झोके खाय .. राणीचे गाणे अबोलीचे लेणे.. कुण्या राव्याचे अंतरीचे देणे.. अंतरीचे देणे असे फिटेल काय ? उजाड़ रानात मन झोके खाय .. सूर्य सांजावला अन धुके दाटले मळभ उरी , मनी आर्त साठले , राव्याला हे आर्त असे कळेल काय? उजाड़ रानात मन झोके खाय .. -- सागर लहरी ०४-०१-२०१०

फक्त तूझ्या बछडीसाठी...

लेखक sneharani यांनी सोमवार, 04/01/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय बाबा, आज डोळ्यात अश्रू... मुलीला वाढवताना होणार्‍या कष्टांमूळे थकलास का? म्हणून डोळे भरुन आले का? खरच आजच वाटलं, आज आई असती तर... बाबा, मी जन्माला आले अन् आई गेली, तुझ तर सर्वस्वच हरपल.. मग आपल्या जगात आपण दोघचं तू अन् मी... बाबा तू कधी शिकवलच नाहीस तूला 'तुम्ही' म्हणायला आज ही ये जा करते तूला ही तुझी बछडी, इतक प्रेम दिलयस की आईची आठवण कधी मनाला शिवत सुध्दा नाही... जगायच कस हे तु शिकवलसं, अन् आज ही शिकवत आहेस.. आठवतय का, तूला तुझ्या वाढदिवसाची तारीख विचारत होते किती छान हसलास.. कशाला गं बेटा.. अस काय बाबा सांग ना रे.. माझे हे बोबडे बोल आज ही आठवतायेत... पुढच्याच महिन्यात होता वाढदिव

अश्वत्थ

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 03/01/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थ अश्वत्थाच्या अखंड सळसळी मधे अजुन एक पान गळून पडले आहे अश्वत्थ तसाच सळसळतो आहे अखंड हसतो आहे. पान गळून जाण्याचा कधी होतो उत्सव तर कधी आक्रोश ... अश्वत्थाला त्याचे काहीच नसते जशी पाने गळतात ... तसेच धुमारेही फुटत राहतात ... .... अश्वत्थाला त्याचेही काही नसते हां ...

काही कविता.

लेखक रामदास यांनी शनिवार, 02/01/2010 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
असा नको अवेळी वारा पदराचा. झाकले इंगळ राखेखाली . मन माझे. +++++ माझी फितूर पानं गुलाम तुमची झाली . हुकुम आमचा झाला बाजी तुमची झाली. अवघड खेळ आहे बुवा. ++++++= आळंबीचं पांढरं रान माजलं आहे तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं . आता, शोधाशोध निरर्थक आहे. उपेक्षेच्या उंबर्‍यावर मनाचा चुडा फोडून मी जगण्याचे गाव सोडले आहे. +++ ते म्हणाले, हा वेडा आणि ती वेडी पण.. मी खोल खोल डोहात तू काठावर कोरडी. ++++ नव्या वर्षाची सुरुवात करू या.

संकल्पः नव्या युगाचा

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 01/01/2010 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
. झाल्या चुकाही आणि उरल्या जरी उणीवा । त्यांचे स्मरून शल्य, निर्दोष कार्य व्हाया ॥ किती मार्ग उन्नतीचे, शिकवून वर्ष मिटले । त्यांनी सुपंथ क्रमू या, नवनीत या युगाचा ॥ २०१० हे नवे वर्ष आपणास, आयुरारोग्यपूर्ण शांती-समाधानाचे, भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे ठरो हीच हार्दिक शुभेच्छा! http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे. .
काव्यरस

मंडली, म्या एक दादांसारकी कविता ल्यिहल्येली हाय. वाचा तर मंग आता.

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/01/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मंडली, म्या कालरातच्याला, नव्या वर्षाच्या मुहूर्तावर एक कविता ल्यिहल्येली हाय. हिरो आन हिरवीन आपले ग्रामीन भागातले हैत. आन त्ये शेतामदी मजा कराया आलेले हैत हा शिण हाये. जरा मजे मजेच्या अंगान त्ये खेळ खेळू र्‍ह्यायलेत. डोक्याला ताप नसल्यागत आनंद लुटायाचा आसल आन सेन्सॉर सारकं व्हत नसल तर हितं टाकू काय? नाय काय आस तस लिवलेलं नाय हो. साधं सरळ हाय. जरा जरा दादा कोंडके यांच्या लिखानासारखी हाय. नाय आधीच विचारून घ्येतो.
काव्यरस