Skip to main content

कविता

(घाईची वेळ)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 22/12/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण
काव्यरस

अनंताचा खेळ..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 21/12/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेला रूसुनिया | कातर सांजेला | तेजाचा तो गोळा | लालबुंद || कललेली सांज | चढणारी रात | सोडुनिया साथ | रवी गेला || कुशित तमाच्या | नक्षत्रे सहस्र | नांदती एकत्र | चांदवर्खी || शशीबिंब नभी | लोभस देखणे | धरेचे लाजणे | पाहून ते || चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || रोजचाच घोळ | नाही ताळमेळ | अनंताचा खेळ | चालू राही || - प्राजु

एकाकी वाट

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 20/12/2009 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ****************
काव्यरस

अगा देवराया | अम्हा खेव द्याया |

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 19/12/2009 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
अगा देवराया | अम्हा खेव द्याया | धरिसी या काया | पांघरोनी || कितिक विभूति | सर्वत्र जगती | धरियेल्या वृत्ती | नानाविध || कुणा शालजोडी | कुणासी गोधडी | कुणी ठिगळ जोड़ी | दारिद्रयाचे || कुणा मुखी साय | कुणी साही हाय | कुणा पोटी पाय | क्षुधार्तेने || कुणा पुष्प शय्या | कुणा काटे पाया | कुणा चालावया | पाय नाही || असुनी अनाथ | कुणा प्रेम छत्र | कुणा हाल मात्र | स्वगृहीचे || नाना परी अश्या | होती जीव दशा | सोसताती कैश्या | लेकरे ही || असती का सारी | रुपे नाना परी | हरी लीला करी | मूढ़ आम्ही || तूचि घेसी सुख | सोशिसी तू दु:ख | राव आणि रंक | तूचि होसी || ऐश्या नाना कळा | दावितो सकळा | स्वस्थ ह

हरी हे दयाळा कधी भेट देशी

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 19/12/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
हरी हे दयाळा कधी भेट देशी | उभे भक्त सारे तुझ्या पायरीशी | जैसा रवी ये घनान्धारातुनी | तैसे कधी श्री मुख दाखविशी | उभ्या धेनु वत्सासवे रान वाटे | गोपाळ मेळा दारात दाटे | सर्वास रे भेटुनी निवविशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी | संगे तुझ्या रे मन हारपते | संगे तुझ्या रे चित्त निर्वाण होते | मायाजलाब्धी आम्हा पार नेशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी | हरी सर्व चिंता तुला वाहियेल्या | तुझ्या पुष्पमाला आम्ही धारियेल्या | निमिषात सा-या चिंता हरिसी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी | मुखे गोड ऐसे तुजे नाम घेऊ | स-देही इथे सर्व वैकुण्ठ पाहू | नामात तुझिया अम्हा प्राप्त होशी | हरी रे कधी श्री मुख दाखविशी

(पुरावा)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 17/12/2009 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
जयवीताईंची सुंदर कविता दुरावा हीच आमच्या पुराव्यामागील प्रेरणा! ;) "देतोस ना उजाळा त्या कुंद कापडांना? होतोस काय अडवा ओढून चादरींना?" अवरुन घे दुपारी तो ढीग ताटल्यांचा ती खूपशी तपेली, किटली न कपबशांचा "फक्कड चहासवे दे सांजा करून भरभर!" उच्चारवात होती मज सूचना निरंतर "देईन 'चंद्र अर्धा' लग्नात जोडलेला त्या गोधडीत अजूनी तू मुक्त सांडलेला?" "आहे तसा शहाणा!" अर्धांग बोलले? वा! संपूर्ण काम झाले "रंग्यास" रे पुरावा!! चतुरंग
काव्यरस

(उशिराने आलेलं) शहाणपण.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 16/12/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
( उशिराने आलेलं ) शहाणपण..... रहायला भलं मोठठ घर आहे झोपायला स्वतंत्र खोली आहे अंगावर पांघरणारे "बाबा" नाहीत..... म्हणून झोप मात्र हरवली आहे ! जेवायला रोज चमचमीत मिळते आतून ढेकर मात्र येत नाही ! शिळ्या पोळी-पिठल्याची चव यावी म्हणून रात्री एक पोळी उरवली आहे ! कामावर जायला कंपनीची बस आहे इमर्जान्सीला मोबाईल फोन आहे सुबत्ताअसूनही मुलं नाखूष का? गरीबीत पण आमची सोय कशी पुरवली आहे? या कुशीवर वळतो , बाबा दिसतात त्या कुशीवर वळतो , आईचे कष्ट दिसतात उताणी पडलो तर मन मारलेले ताई-दादा दिसतात आठवांच्या आसवांत रात्र रात्र जिरवली आहे ! सुखांसाठी पैसा लागतो पण.....

(दाढदिवस)

लेखक रेवती यांनी बुधवार, 16/12/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;) (सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D ) हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला घासू किती किती मी, चोळू किती किती मी ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बदामा जोरात चावताना तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!! रेवती
काव्यरस

('वाढ'दिवस)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 16/12/2009 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला पळलो किती किती मी, वळलो किती किती मी ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बळाला वजनास उचलताना घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला "रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!! चतुरंग
काव्यरस