Skip to main content

कविता

वेडा

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 04/12/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक एस.टी 'स्टँडवरचा माणूस' मळलेली चड्डी , मळकट अन तेलकट असा लांबसा सदरा, विस्कटलेले केस, दोन पायात दोन वेगवेगळ्या चपला.... स्वता:शीच काहीतरी बोलत असतो, कधी झाड , कधी पक्षी ,कधी प्राणी कोणाबरोबरही तो बोलत असतो, प्रत्येकात तो स्वतःच्या कुठल्यातरी नातलगाला शोधत असतो... अन हो त्याच्याकडे एक चिंध्याचे गाठोडे पण आहे, त्यातल्या तो काही चिंध्या काढतो , काही फेकुन देतो , काही फाडतो, काहींच्या गाठी मारतो, काही नवीन शोधुन आणुन त्यात परत भरतो, हिच त्याची दिनचर्या.... त्याला सगळेच वेडा म्हणतात का कोणास ठावूक ? मीही स्वता:शीच बोलत असतो तासनतास.. कुठल्याही माणसात शोधतो की मी पण मित्र ,नातलग, प्रेम... मा

शेवट

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 03/12/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का दुस्वास करावा..जाता जाता? चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली मागमूस याचा न उरावा..जाता जाता दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
काव्यरस

मत्सर ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 02/12/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्याने ओंजळ भरली चंद्र नयनी सामावला मत्सराने धुमसणारा, तो... सुर्य सखे मी पाहीला पसरले पंख मयुराने उन्मुक्त सुखे तो नाचला थांबला नभी खगराज पाहता नर्तन कोमेजला विठ्ठल विठ्ठल निनाद पंढरी भागवतींचा हर्ष गर्जला कमरेवरती हात ठेवूनी विठू सावळा हिरमुसला तुझे आहे ते तुझ्याचपाशी हेवा मना हवा कशाला? तुझ्यासारखा तुच राजा मत्सर का मनी आला ? विशाल. ०२/१२/२००९

कविते, तुज शोधित आले

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/12/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले कविते, तुज शोधित आले इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे, झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले कविते, तुज शोधित आले मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची, कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची, मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले कविते, तुज शोधित आले तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची, तू तन्मय मीरा दासी हरिचरणाची, तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले, कविते, तुज शोधित आले तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी तू सांजवात तेवतेस संध्याकाळी त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले कविते, तुज शोधित आले
काव्यरस

पुन्हा ती भेटली तेव्हा..

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 30/11/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
(गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे. 'गालगालगा.. गालगालगा' अशा चालीत वाचावे.) ============== भेटलीस तू.. बोललीस तू.. थांबल्या दिशा, थांबले ऋतू थांबला जणू काळ तेवढा काळ जेवढा.. थांबलीस तू ! भासलीस तू कापरापरी, काजळी जणू.. काजळावरी कंप पावती खोल पापण्या सांगती तुझी बातमी खरी स्मित मोजके, बोलणे कमी त्याच चौकश्या, तीच बातमी.. जे मनात ते, बोललो कुठे? होत राहिले हेच नेहमी.. हासणे तुझे.. स्फुंदणे तुझे.. आळसावणे.. रंगणे तुझे.. त्या कळा कुठे? रंग ते कुठे? लोपले कुठे.. चांदणे तुझे? शब्द का मुके?

ठेव

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 27/11/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
:) नमस्कार मंडळी. मध्यंतरी अगदी ध्यानी-मनी नसताना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं.
काव्यरस

दे दे भाकर

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 27/11/2009 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंती अन डोक्यावरती आहे छप्पर म्हणायला.. जीव जडु दे त्याला लागु आपण ही घर म्हणायला.. मदत घेतली नाही मित्रा इतक्यासाठीच तुझ्याकडुन लोक लागले मलाच असते तुझाच चाकर म्हणायला जेव्हा जातो त्याच्यापाशी ह्ट्टापाशी अडुन बसतो.. त्याला आता नकोच आहे कुणीच ईश्वर म्हणायला... दु:ख जरी तु देवुनि गेलीस हसतमुख मी असे सदा निमित्त झाले दुनियेला असते दिली तु ठोकर म्हणायला.. सभ्यपणाच्या वस्त्राआडुन मला दाविता पुच्छच त्यानी.. त्यांना देखील हवेच होते मी ही वाSSनर म्हणायला... क्षितिजावर मी धावुन गेलो लांघुन गेलो सर्व दिशा. जिथे मी गेलो तिथे लागले दे दे भाकर म्हणायला.. इथे तिथे मी विखरुन गेलो..मोडुन गेलो डाव

ऐक धरित्रे!!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 27/11/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक धरित्रे, तव उदरातील गर्भांकुर ते नवे नव्हाळे उमलून येता अंगांगावरी बाहू तुझे गं लेकुरवाळे ग्रीष्माचा गं अफ़ाट वणवा थोडेसे तू सोस उन्हाळे तुझ्याच साठी घेऊन येईन मेघ अनोखे निळे सावळे सचैल घालेन स्नान तुजला बहरून येशिल राजस बाळे ! लेऊन घेशील साज आगळा माणिक, पाचू, मोती पोवळे तृप्त होऊनी, गीत तुझे मग कडेकपारीतूनी झुळझुळे इंद्रधनूच्या झुल्यावरी गं घेशिल हलके तू हिंदोळे आज लेऊनी घे गं तूही सुर्याचे हे लखलख वाळे उद्या पुन्हा मी बरसत येईन पुरवेन आणिक तुझे डोहाळे - प्राजु

गुलमोहोर असा

लेखक नेहमी आनंदी यांनी गुरुवार, 26/11/2009 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
लाल टपोऱ्या त्या फुलांचा रंग चटकदार ऐसा शोभतो वाळक्या त्या जंगलामधे गुलमोहोर ऐटीत मिरवतो बहर आला असा फुलांना लाल दहकत्या रंगाला वैशाखात ही दिमाखाने सजत डोलत उभा राहिला बहरला गुलमोहोर तरी प्रिया माझी का येईना वैशाख वणावा अंतरीचा उरातुनी त्याचा दाह जाईना प्रसन्ना जीके