Skip to main content

कविता

पाठवणी...

लेखक नेहमी आनंदी यांनी शनिवार, 14/11/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा शाळेचा पहिला दिवस प्रेस केलेला शाळेचा युनिफॉर्म तो टिफिन ती वॉटर बॉट्ल किती आनंदात होतीस ना तू? पण मी ? कसं सांगू तुला.. एकीकडे तू आता शाळेत जाणार हा आनंद तर एकीकडे तुझे घरातून ३ तास का होईना माझ्यापासुन दूर जाणार.... ह्या कल्पनेनेच मी हळवी होत होते.. तो दिवस आणि आजचा दिवस आज तुझे लग्न आणि पाठवणी पुन्हा तू किती आनंदात आहेस नविन कपडे, नवे दागिने नविन घर, नवे लोक वरात येण्याच्या तयारीत तू गौरीहार पुजण्यात मग्न पुढच्या जिवनाची स्वप्नं रंगवणं एकीकडे तुझं मला खरचं दुरावणं एकीकडे तुझा आनंद एकीकडे माझा एकांत आणि इकडे पुन्हा मी हळवी होत होते... प्रसन्ना जीके

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

ऑनलाइन प्रेम

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 12/11/2009 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात नसलीस की हिरमुसतो मी सध्या तर गम्मतच ऑनलाइन झुरतो मी कधी तु बिझी, कधी तु अवे तुझ्याभोवतीच ऑनलाइन पिंगा घालतो मी असलीस ऑनलाइन की तासनतास तुझ्याच फोटोकड़े बघतो मी डेरिंग नाही होत पिंग करायची नावावर उगाच माउस नेतो मी तु नसतेस ऑनलाइन, तरी उगाच तुला ऑफलाइन पिंगतो मी कम्युनिकेटरवर गप्पांचा पाउस समोर आलीस की मात्र गप्प बसतो मी बीसीसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी काय अन कसे सांगु मी चॅटिंग करता करता ब्लशतो (लाजतो) मी काहीतरी शोधायची ओढ आहे मनात हजार वेळा जुनेच चॅट लॉग रिडतो (वाचतो) मी सध्या कामात लक्ष कुठे आहे आजकाल ऑनलाइन कविता पाडतो मी ज़रा विचित्रच आहे ना मी प

बुधवारची कविता: तमाशा

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 11/11/2009 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्‍हास बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास" सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास' म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"? म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा -पुण्याचे पेशवे
काव्यरस

३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/11/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह म्हणजे माझा जिव कि प्राण आहे.. पॉकेट सा‌ईज डायरी च्या आकाराच्या त्या खजिन्या मघे माझ्या अनंत अश्या गमति व गुपिते बंदिस्त आहेत. एखाद्या लहान मुलाच्या खेळण्याच्या पेटित असतात तसे.. खुप गमति साठवल्या आहेत..त्यात.. सी.एच आत्माचि जुनी गाणी.. पुलंच्या काहि कविता... पिकासो नि काढलेली चित्रे.. मॅरिलिन मनरो व मधुबालेचे जुने फोटो.. काहि उन्मादक जे.पी.जी फोटो.. काहि पोर्न क्लिप्स... सहलीचे फोटो.. इरॉटीक वेब सा‌ईटचे गुप्त पासवर्ड काहि सेक्सी प्रोफा‌इल्स च्या लिंक्स काहि गेम्स.. आचार्य् अत्र्यांचि भाषणे काहि पी.डी.एफ् ई पुस्तके अश्या हजारो गोष्टी साठवल्या आहेत..

पैलतिरी..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 07/11/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा? शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्‍या उन्हापरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. नको विचारू कधी, कुठे तू!
काव्यरस

मृगजळ

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 05/11/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू नाहीस, की जसा पाउसही नाही चातकास मेघाचे दर्शनही नाही हुडकत होतो प्रेमाचा झरा मी नशीबास मंजुर मृगजळही नाही वेड्या मनास साथ असे सुरांची रडण्यास खांदा जवळ एकही नाही आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही मिळता न तु सांग काय करेन मी? "तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही" काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना
काव्यरस

आठवण

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 04/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ते आठवते का सारे? सर्द संध्याकाळी त्या गुंफुनी हात फ़िरलेले तुला ते आठवते का सारे? गर्द चांदण्या आकाशी अन गहिरे ते उसासे तुला ते आठवते का सारे? फुले उमलता प्रितीची मन हळवे झालेले तुला ते आठवते का सारे? पाठमोरा होऊन जाताना पाश सारे तोडलेले तुला ते आठवते का सारे? या देहाच्या धुरातून अश्रु तुझे दाटलेले तुला ते आठवले का सारे? प्रसन्ना जीके १५-१०-०८
काव्यरस

लोटांगण

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 04/11/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू गुरूर देवो सत्यसाईश्वरा धावत आलो दिल्लीवरूनी सरकारा तारा पट्टपुर्थीश्वरा .... विजय जाहला, सत्ता आली 'खाती ' खाती हवी आम्हाला घास मुखीचा निसटू पाहे कृपा असावी पट्टपुर्थीश्वरा ... महान राष्ट्री भाऊबंदकी लोणी हवे सारे आम्हाला सावलीनेच धरला दावा द्या वरदहस्त पट्टपुर्थीश्वरा ... पोहोच तुमची खालवर पुरती हायकमांडही ढाळीते चवर्‍या उद्दंड जाहला जाणता राजा द्या समज त्यासी पट्टपुर्थीश्वरा ... नतमस्तक हो तुमच्यापुढती दास खुर्चीचे पामर आम्ही बुडत्या नौकेस हात द्यावा घ्या दंडवत पट्टपुर्थीश्वरा ... संदर्भ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरुन धावत येवुन सत्यसाईबाबांची

दु:ख

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 03/11/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख स्वतःला वेदना होऊ नये म्हणून प्रयत्न करतात रक्त वाहू नये म्हणून पट्टी बांधतात दु:ख दिसले की त्यावर इलाज करतात सज्जन माणसे! पण लोकांना दु:ख दिसत नाही अथवा बंद डोळ्यामागे जागे असते दु:ख!- इथेच सगळी गोची आहे रक्ताने माखलेले सैनिक आक्रोश करणारी लहान मुले भूकबळी, हुंडाबळी, आत्महत्या करणारा शेतकरी खाटिकाकडे बांधलेली मुकी जनावरे सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा शांत झालेले असते सजलेले, सजवलेले , फोटोच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!