Skip to main content

कविता

'गिरी' वाद

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 19/10/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी आयुष्यभर गांधीवाद जोपासला.... ....असं ते म्हणतात. त्यांना 'गांधीगिरी' भावली नाही. आम्ही म्ह्टल, " तुमचा विरोध नक्की कशाला ? " तुम्ही उभं आयुष्य 'गांधीं'च्या मागे 'वाद' लावून जगलात. पण वादाने प्रश्न सुटत नाहीत...... .. ... आम्ही त्यांच्या मागे 'गिरी' उभा करतोय. आधी लोकांना हिमालयाची भव्यता दिसू दे... मग गंगेचे फायदे हळू हळु कळतीलच...............
काव्यरस

दीप रंग..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 19/10/2009 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
धूसर झाल्या नभी तारका आसमंती बेहोष हिवाळी, मेहंदी रंगल्या सोनपाऊली पहाट घेऊन येई दिवाळी.. मंद तेवते दीप अंगणी जणू नक्षत्रे उतरून आली, रंग माखूनी अंगावरती, जमीन सारी भरून गेली.. मंद सुगंधी अभ्यंगातून, धुंद काया होत सकाळी चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी यौवनास या नवी झळाळी.. रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन् सुवर्णमाला गळा ल्यायली, निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी वस्त्रांकित ही तनू बावरी.. बिंदी रेखूनी भाळावरती, काजळरेखा नयनी आली साज सोवळा लेऊन दर्पणी लज्जित बाला रूप न्याहाळी.. क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. - प्राजु
काव्यरस

पाळणाघरात

लेखक मनोज यांनी शनिवार, 17/10/2009 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात छान खाऊ मिळे तिथे चॉकलेट गोळी जेवायला असते तूप साखर पोळी चव तुझ्या हताची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात खेळायला खेळन्या काऊ आन चिऊ निजायला असते उशी मऊ मऊ ऊब तुझ्या कुशीची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात गोष्टी राजा-राणीच्या असतात छान पावसाच्या गान्यात हारवते भान गोडी त तुझ्या अंगाईची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात नाही आई तुला मी त्रास देनार सांगशील ते सारे ऐकनार दंगा केला तर रागव तू मला खोडी केली तर सांग बाबाला नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात
काव्यरस

आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 16/10/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! आपण बोलूया एकमेकांशी शब्दानं शब्द वाढू दे. आपण लिहूया एकमेकाला आपण वाचूया एकमेकाला शिष्ठ शांततेच्या कोषातून आपण बाहेर येऊया... आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! आपण ओळख दाखवत नाही एकमेकाला आपल्याला विश्वास नाही एकमेकांबद्दल आपल्याला भीती वाटते एकमेकांची एका प्रचंड ताणाखाली वावरत असतो आपण आणि मग अंधारच अंधार दाटत राहतो सभोवताली... सहज आपुलकीनं बोललो दोन शब्द एकमेकांशी तर विरुन जाईल अंधार लख्ख उजाडेल सारीकडं... `स्नेहा'च्या प्रकाशात आपण आनंदानं राहूया... आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! -अविनाश ओगले

गाणे आनंदाचे ... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/10/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
तेज दिपांचे उजळुन आले दिप मनींचे झणी प्रकाशले.. तेजाळल्या त्या ज्योतींमधुनी ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!! दिपवाळीच्या आनंदामध्ये आर्त मनांचे विरुनी गेले.. सुख-दु:खाच्या गंधासह मम आयुष्य सुखे गंधावून गेले..!! गाणे मनातले ओठी आले दिपावलीसह फुलून गेले.. सुमन सुगंधी दिपावलीचे दिपांसवे जिवनी दरवळले..!! कानी निनादती तेच तराणे सदैव एक ते आनंदी गाणे.. आले दिन सौख्याचे आले सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!! दिपावली शुभचिंतन ! विशाल.
काव्यरस

प्रवास

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 15/10/2009 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
पायवाट म्हणाली, "सांभाळ! अनवाणीच आहेस ठाऊक नाही मुक्काम तुला. प्रश्न सुरवातीला नसतोच, ते येतात तेव्हा उत्तरांचा शोध सुरू होतो, वाटेकडं दुर्लक्ष होतं..." वाट राखणं हे तर जगणं, अन्यथा सारेच प्रवास महामार्गी! "महामार्गाचं बरं असतं, तो बदलतो माझं तसं नसतं मी मातीचीच असते. अनवाणी चालताना पाय मळतील म्हणून सांगतेय..." चालताना केव्हा तरी वाट सुटली, भरकटली आता पायाखाली केवळ माती अन मातीच आहे मी चालतोच आहे... 'मातीचे पाय'चा दागिना मिरवत!
काव्यरस

भिंगोरी..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 14/10/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणांत खाली क्षणांत वरती श्वास झुलतो झुल्यावरी आभासांच्या मागे भिरभिर मन झाले गं भिंगोरी.. खळबळ मनांत धडधड उरांत चाहूल ही हृदयांतरी कधी आकाशी कधी जळाशी पाऊल माझे अधांतरी कशी आवरू कशी सावरू साद घालते कुणीतरी क्षणांत येथे क्षणांत तेथे चित्त नसे थार्‍यावरी किती करावे नवे बहाणे नशा चढावी मनावरी उगा रूसावे उगा हसावे राग लटका कधीतरी ओढ लागुनी स्पंद रूजावे माझ्या उरीचे तुझ्या उरी सोन स्वरांनी गीत सजावे प्रित फ़ुलावी जन्मांतरी - प्राजु
काव्यरस

कोडे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 14/10/2009 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी मुग्धता कमीच बोलणे तुझे टाळणे तुझ्या भावना समजून घेणे आयुष्याला नवेच कोडे..! रितेपणाचा खेळ नवा तरी जूनेच कोडे हात नवे परी सुटले म्हणता तरी सुटेना जगणे माझे उरले थोडे तरीही हाती घेउन बसलो नवेच कोडे..!! कोडे घेउनच जन्मा येतो कोडे सोडवीत जगतो आपण कोण कुठला..? माझे मी पण प्रश्न सनातन उत्तर याला कधी सापडे..? मीच मजला झालो आता कायम कोडे...!!!

ये ना .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 14/10/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
ये बाहुपाशी हलकेच प्रियवरा राजसा, का असा, दुर तू जाशी? सखया तू येना जवळ लवकरी बघ रे कधीची चांदरात झाली ! मिठीत तुझीया रे स्वर्ग साती नाते अपुले, जणु मीन जळाशी, तु घेना मज कुशीत झडकरी प्रीतीची ज्वाला मनी भडकली ! विझवलेले सख्या दीप कधीचे बहाण्यास तुझ्या.., पडले फशी, धरू नकोस ना राग मजवरी बघ रात्र सारी उडून चालली ! सोड ना आता रुसवा फुकाचा कशास फसवे हे कलह प्रियेशी? पंचप्राण घेवूनी उभी निजकरी ये.. मिलनवेळा निघुन चालली ! विशाल.
काव्यरस