Skip to main content

कविता

<?!#^&* भरीत *&^#!?>

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 22/10/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मोडकांचे गणित व नान्याचे प्रतिबिंब कविता करताना मोडक म्हणाले स्वता:शी "अगणीत>,(गणित!),[वळीत], दहाजणीत!, (झिरो),सणसणीत>>>>, ((गणित)), [गणित!] की झणझणीत" कोणतं विडंबन येईल आधी?? प्रश्न सुटेनासा झाला तेंव्हा केव्हातरी, २००८ मधे केलेली कविता ऑक्टो २००९ मधे मिपावर डकवली *** जुम्म्याची आंघोळ करून आवरताना आरशात पहिलं नानानं तेंव्हा आरशातही त्याला एक प्रतिबंब दिसलं तिच्यायला , हे तर माझंच प्रतिबिंब आहे असं म्हणत तो एकटाच हापिसला निघाला तेंव्हा त्याच्याकडे पाहत ते प्रतिबिंब म्हणाले "दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं" रचना उद्या टारूसोबत आहे.आम्ही आज आता ताबडतोब मजा करून
काव्यरस

[वळीत]

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 22/10/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरं वळवत फिरतांना वीराप्पा स्वतःशीच म्हणाला, "वकटी, रंडू, मोडू, नायडू- पाचाचे चार कसे झाले करडू?" झोल मिटेनासा झाला तेव्हा, शिवी हासडून दिला दंडूका मोती कुत्रा जाम कळवळला... *** सुन्न होऊन परततांना मागं पाहिलं वीराप्पानं तेव्हा अंधारातही त्याला एक सावली दिसली... लपणं आणि छपणं या लपाछपीचे नियम कळत असुनही त्याला उमजेपर्यंत तो हरला... उंचावत दंडूका तोच वीरप्पा ओरडला तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती सावली म्हणाली, "मीच तुझे चुकलेले करडू!"
काव्यरस

<अगणीत>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 22/10/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा... न सांगताही समजला असालच... अगणीत!
काव्यरस

((गणित))

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/10/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :? गच्च मीटिंगमध्ये शिरताना तो स्वतःशीच म्हणाला, "डॉक्यूमेंट्स, मॉडेल, पॉवरपॉइंट, स्प्रेडशीट, स्लाईड्स - सगळ्या, अपूर्ण की पूर्ण?" प्रेझेंटेशन जमेनासं झालं तेव्हा, टकल्यानं टाकलेला एक कटाक्ष पुढल्या वादळाची नांदी देणारा... *** लॅपटॉप बंद करुन क्यूबमध्ये परतताना टेबलवर पाहिलं त्यानं तेव्हा कागदाच्या ढिगातही त्याला 'त्याचं' अक्षर दिसलं... इंजिनिअर, आणि मॅनेजर या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत मान त्यानं ती नोट वाचली तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती म्हणाली, "०/१०!" रचना : गणित चुकल्यानंतर २००८
काव्यरस

गणित!

लेखक श्रावण मोडक यांनी गुरुवार, 22/10/2009 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द अरण्यात शिरताना हंस स्वतःशीच म्हणाला, "शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध - शून्य, अपूर्ण की पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका शून्याकडून पूर्णाकडे झेपावला... *** पंख आवरून उतरताना भूमीवर पाहिलं हंसानं तेव्हा 'शून्या'तही त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत श्वेत-धवल पंख एकाकी उड्डाण केलं तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "शून्य हेच तर पूर्ण!" रचना: केव्हातरी, २००८
काव्यरस

स्वप्न

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/10/2009 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्न
(चाल: एखादी शालेय कविता)
स्वप्नामध्ये आज पाहीले सुंदर खासे तळे
बदक पांढरे, हिरवी झाडे, सुंदर पाणी निळे        || ध्रू ||

(चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 20/10/2009 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्रोत- नेस्टेड चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो दूर दर्शनाला हा मी बघणार नाही फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो? "समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
काव्यरस

निरोप

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 20/10/2009 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सख्या नववधू होऊनी आली दिवाळी दाराशी इंद्रधनूचे रंग वेचुनी रेखिली रांगोळी मी खाशी इवल्या इवल्या पणतीतून स्पर्धा नभीच्या तार्‍यांशी गंध खमंग फराळातला.... प्रीत तोलतो हाताशी उल्हासाची पखरण भवती, आतिशबाजी आकाशी तुझी लक्ष्मी तुझ्या स्वागता उभी बावरी उंबर्‍याशी ..... ......... तुझ्याएवजी निरोप आला....... काळोखाच्या घनराशी मोरपिशी पदराने रोखते... जळता हुंदका ओठाशी विखुरलेल्या रंगावली या, कुणी मिळवले अभिरासी ? तव नामाची इवली पणती... ज्योत उडाली आकाशी अर्ध्यावरती डाव मोडता... प्रीत एकली उपवासी मिटले कुंकु.. फुटले कंकण...
काव्यरस

(सुज रंग)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 20/10/2009 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या काव्याचे हे एक मुक्त स्वरुप- लालसर झाल्या त्या जागा जेथे डासा रे तू मला चावला उडत ये तसाच गुणगुणूनी आजच तू या संध्याकाळी... टायर, डबे, घाण अंगणी त्यात पाणी थोडे ठेवूनी तुझिया स्वागताची तयारी जय्यत करोनी ठेविली... डोक्यावर तेल लावून, बसले मी ओट्यावरी गुणगुण तुझी ऐकूनी कांती माझी आसुसली... टचकन तुझी सोंड खूपसुनी पी हे माझे रक्त लवकरी, सांग मित्र-सग्या-सोयऱ्यांना... अधीर ही तनू बावरी.. खाजवू ती चाव्यजागा, मजाच त्याची निराळी तुझ्या चाव्यांच्या खूणा घेऊनी सुज्जित बाला दिसे निराळी... तुझ्या असंख्य डोळ्यातूनी ऊडून पहा खालती लाललालती सुजगर्विता स
काव्यरस

'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 20/10/2009 05:20 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले!
काव्यरस