Skip to main content

कविता

मी आणी पाउस

लेखक प्रभो यांनी सोमवार, 23/11/2009 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली अशाच काही क्षणी येते आठवण तुझी माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श नभासही सार्‍या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं तेंव्हापासून माझं आणी पावसाचं आहे वेगळं असं एक नातं
काव्यरस

बोलताना का सुचेना..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 23/11/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना तेच सारे भाव आणि त्याच सार्‍या कल्पना..!! पायवाटा त्याच त्या की, चालते मी तीच ती तीच माझी पाउले अन त्याच त्या खाणाखुणा.. सांगताना थांबते मी त्या तिथे पुन्हा पुन्हा भासते का नित्य तेथे तीच शब्दऽ वंचना.. घाव ते ही ओळखीचे, खोल गेले नेमके त्याच जखमा आणि सार्‍या ओळखीच्या वेदना.. तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना.. का कुठेही वेगळेसे फासलेले रंग ना ना कुणीही वेगळीशी मांडलेली भावना.. तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..! - प्राजु

स्वप्न आणि सत्य !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/11/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
कधी उन्मादाच्या भरात तिला चंद्राची उपमा देतो विसरतो सोयिस्कररित्या… चंद्र.. तो स्वत:च शापित असतो ! कधी प्रेमाने तिलाही गंगेसम निर्मळ ठरवतो तिथली आत्मार्पणं पाहून… मी ही… शुद्धतेच्या व्याख्या विसरतो ! तुला चांदण्यांची फुले आणु? उत्साहाने स्वप्ने पाहतो … तुरडाळ शहाण्णव रुपये किलो? आम्ही दोघे… वास्तवाच्या चक्रव्युहात अडकतो ! विशाल.

दयाघना गणराया दे चरणी आसरा

लेखक मितालि यांनी सोमवार, 23/11/2009 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या यातानाना तुझाच रे सहारा दयाघना गणराया दे चरणी आसरा क्षणिक ही मोहमाया जीव असा जडावा जुळता तुटता नाती तूच रे आठवावा त्याचे डोळे आठवती पाहता रूप तुझे तुझ्या अशिर्वादा विन अधूरे स्वप्न माझे मनातील या भावना उमजाव्या तुला रे कृपासिन्धु गजानना तुझा धावा आता रे

चित्र

लेखक sneharani यांनी शनिवार, 21/11/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द नाही सापडले तर सुर जुळतील कसे? भाव नाही कळला नाते फूलेल कसे? होईलच चित्र पूर्ण रंगाशिवाय कसे? मग चित्र आपल अपूर्णच रंगाविना जसे कारण- तुझ्या मनातील रंग मला कळला नसेल अन् माझ्या मनातील रंग तुझ्या स्वप्नातदेखील नसेल.
काव्यरस

कोडी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/11/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते? मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!
काव्यरस

---------प्रश्न --------

लेखक अनुप्रिया यांनी मंगळवार, 17/11/2009 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
फुले उमलत नाही माळ्याला तमा नसावी काट्यांचा संग करोनी कळ्यांची खुडणी करावी ?? विणकर विणतो धागा वस्त्रा गाठ पडावी शुभ्र वस्त्रे पांघरोनी रक्तवर्णी होळी व्हावी ?? साज लेवूनी स्वप्नांचा परी अंगणी यावी पर तोडले जाऊनी पायात बेडी यावी ?? वचन जयाने दिधले त्यानेच इर्शा करावी आनंद या जीवनी देऊन घृणाही करावी ?? आरास कुणी मांडली नयनी चुकार हुंदक्यांची घाव मनी घुसला त्याची तमा नसावी ?? अंत नसे दु:खाला कवटाळे जो अंतरी ओठाआड मग व्यथा मुक्या हृदयाने पहावी ?? - सोनाली

नवे जग

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/11/2009 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
देवा हवाय मला एक खोडरबर ... नको असलेल्या आठवणी, मनपटलावरुन अलगद , हळुवार एकही ओरखडा न ठेवता पुसणारा... हवाय मला एक आयुष्याचा कॅनवास , अगदी कोरा कोरा, पांढराशुभ्र एकही रंग नसलेला , एकही ओरखडा नसलेला... सगळच नवं कोरं... रंगही नवे , कुंचलाही नवा... चित्र चितारणार तेही नवेच... देवा हवाय मला एक नवा कोरा आरसा अगदी नवा... कुणीच, कधीच त्यात आपले प्रतिबिंब पाहिले नसावे... ज्या आरश्यात मी स्वता:लाच नव्याने ओळखावे, असा आरसा...

नवीन वसाहत

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/11/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी खबर, ताजी खबर भुतीण पारावरून ओरडली लगबगीने सरसर सरसर पारंबी धरून खाली आली - रात्र काळी, सळसळ झावळी समंध भारी, मुंजे किरकीरी जखिणी, हडळी आणि भुतावळी झाडांवर जमली सारी बिरादरी - कशाला उगाच मारतेस बोंबा उलटे झुलते वेताळ विचारते जरा थांबा, खाली घ्या टांगा सांगते सारे, भुतीण फिस्कारते - आपला सगळा मोहल्ला चालला येथून दुसरीकडे जागा देतील संपला जुना सहवास इथला कबरीतून काढून भांड्यात ठेवतील - बिरादरी भुमीवर वसाहत बांधून जागा भरणार, माणसे रहाणार हाडे खोदून, थोडीशी निवडून, एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१ - मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा तूच म
काव्यरस