Skip to main content

कविता

मला पुन्हा एकदा

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 11/01/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे .. मला पुन्हा एकदा चिंब भिजायचे आहे ... पुन्हा चोरायचा आहे डब्यातून लाडू, पुन्हा विनवायचे माळ्याला 'एकच कैरी पाडू' ? पुन्हा रंगवायचे आहेत हात ... निळे शाईमध्ये पुसायचे हात शर्टाला ... खेळायच्या घाईमध्ये पुन्हा धरायचा हट्ट कुत्राच्या पिल्लासाठी, आणि चोरायचे मावळे ... आपल्या किल्ल्यासाठी पुन्हा घालायची शिळ तिच्याकडे पाहून .. थांबायचे पाहत ... ती पाहते का वळून ... पुन्हा जायचे पार्किंग मध्ये चुकवून नजरा ... पळून जायचे ठेवून तिच्या गाडीवर गजरा .... होते स्वप्न व्हावे मोठे ... कधी नसावे लहान ... वाटे जिंकुनिया जग व्यापावे पंचप्राण आता उमगत नाही ...

तू तेव्हा तशी ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 11/01/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती... त्या रात्री वेगळेपणाची जाणीव पूर्णपणे सरली होती ... उरले नव्हते कुठलेही पाश, न उरली कुठलीही आस ... वाटले मिटून घ्यावे डोळे ... तू असता असे पास ... भरून घ्यावा तुझा गंध ... जपून ठेवावा तुझा स्पर्श असाच होत राहावा दोन मनाचा दोन देहाचा परामर्श ... अचानक स्वप्न भंगले अन दिसली रिकामी उशी ... तुझ्याही शेजारी असेल का ग ती तशी ? नकळत माझ्या डोळ्याची कड पाणावली ... असेल का ग तुझीही उशी अशीच ओली? विषय बदलावा म्हणून कूस बदलली ... अन ह्या सगळ्यातच अजून एक रात तशीच सरली

बेत

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 11/01/2010 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते... नकळत आयुष्य मात्र वेगळीच वाट चालत होते सापडला किनारा म्हणून जरा विसावलो ... तर ते मृगजळ मला पाहून हसत होते भेदरलो शोधू लागलो परतीची वाट चाचपून पहिला आधारासाठी धरलेला हात तो हात बहुदा कधीच सुटला अन एकाकीपणाच्या नुसत्या जाणीवेने काळजाचा ठोका चुकला ... घातली साद त्या दिलाबरास पुन्हा पुन्हा उमगले नाही काय घडला गुन्हा ... वाटले संपवावे हे जीवनाचे समर तितक्यात .... दूरच्या मशिदीत घुमले अल्लाहू अकबर

इज्जत!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 11/01/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस तिरप्या धारा `बेभान'लेला आडवा वारा ओल्या मातीचा धुंद सुगंध, ..... आणि, एक लफ्फेदार सही सगळ्यातच एक `लिज्जत' असते... विदेशातले साहित्य संमेलन अध्यक्षाच्या पदाचा मान सारस्वतांच्या `कवतिका'चं भान ... आणि एक `झालर'दार मंडप ज्येष्ठत्वाला `इज्जत' असते.... ------------------

लीला केली विश्वंभरे ....

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 09/01/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
पाणियाचे पाणीपण | आकाशीचे व्यापकपण | अग्नीचे दाहकपण | कैसे राहे || कलिकेचे सुमन | सुमनाचे गंधाळण | भ्रमरा त्याचे आकर्षण | कैसे होये || देवा अंगी देव पण | भक्तां अंगी समर्पण | दुष्टा अंगी वाकुड पण | कैसे ठाये || लीला केली विश्वंभरे | पाही कौतुक साजरे | जेथे तेथे नाना परे | विठ्ठ्ल राहे || कंटक आणि पुष्पासरी | भिन्न गुणे राहे हरी | त्या त्या तैसे वंदन करी | प्रकृती धर्मे || सज्जनास पूजावे | दुष्टां निर्दाळावे | सुमनाचे गंध घ्यावे | त्या त्या परी || सागर लहरी ०८-०१-२०१०

उत्सव ...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/01/2010 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
*********************************************** मेघांचे उत्सव रिमझिमणारे जलदांचे अन गूढ चिंतन समीर बावरा निरंतर गातो आषाढातील जलदाच्या वेणा... निळे सावळे घन थरथरणारे दव-बिंदूचे अन हळवे स्पंदन विहग स्वरांचे सुखे मिरवती शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा... गीत अधरीचे ते हुळहुळणारे थिजलेल्या अन मौनाचे मंथन मेघही वळले होवून आतूर अन जलधारांची अक्षयवीणा... ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे रुजलो अन होवून हिरवे पाते लंघून सार्‍या सीमा शब्दांच्या एकटा कोरतो मौनाच्या लेण्या... *****************************************************
काव्यरस

ओझी

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 08/01/2010 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी? रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता?
काव्यरस

आठवण

लेखक प्रभो यांनी बुधवार, 06/01/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेचा विषय आमची 'ती'.......दुसर्‍या विषयावर कविता जमत नाहीत :) जाता दुरदेशी वाटलं होतं विसरेन तूला पण नुसत्या विचारानेच त्रासले मला नाही विसरू शकलो मी येते का कधी आठवण गं माझी? शेवटचे पाहिले तुला त्या दिवशी सोडवायला ही आली नाहीस तू वाट बघून वाट धरली मी प्रवासाची अशी का पाठवण केलीस गं माझी? पहिल्याच दिवशी पावसाने स्वागत केलं आठवली आपली पहिल्या पावसातली एकाच छत्रीतली सफर बसस्टॉपवरची पावसाने का पाठ सोडली नाही गं माझी? मनाची समजूत घालत फोन केला तूला आवाज ऐकताच मनातलं एक वादळ शांत झालं आणी दुसर्‍या शिडाला वारा भेटला या वेगालाही का कीव नाही आली गं माझी? आता थोडेच दिवस उरलेत इथे परत य
काव्यरस

(ती)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/01/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;) ती समीप माझ्या येते, खेटुन जाते मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची, ती कविता, आराधना, साधना त्यांची, 'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते चतुरंग
काव्यरस

ती

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 05/01/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
ती समीप माझ्या येते, निसटुन जाते मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
काव्यरस