Skip to main content

कविता

"बालकवि" ~ निसर्गसौंदर्यात रममाण होण्याची तीव्र तळमळ !

लेखक इन्द्र्राज पवार यांनी गुरुवार, 06/05/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
"५ मे" ~ बालकविंचा हा स्मृती दिन (१९१८ च्या या तारखेस त्यांचा अपघाती म्रुत्यु झाला होता.)आज आकाशवाणीवर बालकवि यांच्याविषयी एक खास कार्यक्रम सादर करण्यात आला, जो अगदी योगायोगाने मला ऎकायला मिळाला.

आज अचानक उदास का वाटे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/05/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक उदास का वाटे आज अचानक उदास का वाटे न रमे मन हे दिवसाही अंधार भासे ||धृ|| ईकडे पाहून तिकडे पाहून वेळ घालवू किती कसे कोण जाणे कितीक वेळ माझी जाते आज अचानक उदास का वाटे ||१|| किती मी चेहर्‍यांना वाचू किती अनूभव लेखू आवाज जवळी नसतांना साथीचे शब्दही पडत आहे थिटे आज अचानक उदास का वाटे ||२|| दुर अंतरावरी असता तू कसा निरोप देवू येथला निरोपही घेण्या मन माझे आक्रंदूनी उठे आज अचानक उदास का वाटे ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०५/२०१०
काव्यरस

वार्‍यावरती भुरभुरती केस

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 04/05/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
वार्‍यावरती भुरभुरती केस
तू समोर अचानक उभी, वार्‍यावरती भुरभुरती केस पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ|| तसाच बांधा अन रंगही कांतीचा गतस्मृतीत रममाण, विसरलो मी जग काय अवस्था केलीस? ||१|| वार्‍यावरती भुरभुरती केस.... ओळखीचे ते रूप मनामध्ये खोल आवेग अनावर, खेचतो मज तुजसमीप ताबा न मनावर ||२|| वार्‍यावरती भुरभुरती केस.... कशास जुने काढावे, नवे आचरावे एकदा वळून बघ, समजते मज जरी तू तीच नसतेस ||३|| वार्‍यावरती भुरभुरती केस.... पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस?
काव्यरस

आभास

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 04/05/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं नातच आभासांचं कधी खूप खूप खोल वाटणारं, थेट जाउन हृदयाला भिडणारं, काळजाला हात घालणारं, पण कधी क्षणात उथळ होणारं, अनोळखी वाटणारं ! मग खरं काय असतं ? ते खूप खोलवर घाव घालणारं, हृदयाला साद घालणारं ? का पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ? शेवटी आभासच सारे ! त्यात खरं काय आणि खोटं काय ! तुझं माझं नातच आभासांचं शब्दांशिवायच भावना बोलणारं, मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं, हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं, पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं निशब्दता पण अनोळखी होते. मग खरं काय असतं ?
काव्यरस

ओढ

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/05/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणात हसले क्षणात रुजले, वसंता तूझे गीत कोवळे.. दंवे सुखाने तृणही रमले, कळ्यात हळवे भ्रमर गुंतले ! प्राजक्त फुले गंध दरवळे, फुलूनी आली बकुळफूले.. गुलाब गाली ओज झळकले, समीरानेही अंग झटकले ! माळरानी रानफुल एकले, त्यानेही तव गीत ऐकले.. तोर्‍यात उभी निशिगंधा बोले, मला सख्याचे वेड लागले ! हळुवार तुझी चाहूल वसंता, बघ वसुधेने बाहू पसरले .. विरह व्याकुळ प्रिया जणू , भेटाया तुज मन आसावले ! विशाल
काव्यरस

कामगार आम्ही कामगार असतो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 04/05/2010 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
कामगार आम्ही कामगार असतो कामगार आम्ही कामगार असतो ठिणगी ठिणगी एक होतो धमन्यातले रक्त जाळतो मोठ्या आगीचे एकक असतो कामगार आम्ही कामगार असतो देशाच्या प्रगतीची ओळख असतो वेगवेगळे हात एकवटतो तुकड्यातुकड्यांचे एकसंध निर्मीतो कामगार आम्ही कामगार असतो श्रमांचे आम्ही मोल असतो कपाळावरच्या भाग्यरेषांतूनी घामाच्या नद्या वाहवतो कामगार आम्ही कामगार असतो भक्कम हातांच्या मुठी वळवतो वज्रालाही पिघळवतो मनगटासारखे कांबवतो विश्वकुटूंबातील घटक असतो भिन्न देश अन भाषा जरी असो संकेतांना अनुसरतो विचार कृतीत रुपांतरतो अजस्र यंत्राचा एक भाग असतो आम्ही हलतो, विश्व तोलतो समुहाच्या नात्यातून कामगारांती
काव्यरस

पहिला पाऊस

लेखक बरखा यांनी सोमवार, 03/05/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस वळ्वाचा पाऊस आधी देखील पडला होता, पण्..कालचा पऊस मात्र, माझ्या साठी पहिलाच पाऊस होता दोघा॑नी पहिल्या॑दा एकत्र पावसात भिजण्याचा आन॑द लुटला होता, तु मात्र माझी वाट पाहुन ओलाचि॑ब झाला होता मी भिजु नये म्हणुन अडोशाला था॑ब म्हणत होता मी मात्र त्या दिवशी हट्टाला पेटले होते तुझ्या सोबत पावसात मला देखिल ओलेचि॑ब व्हायचे होते तुझ्या गालावरुन ओघळ्ण्यार्‍या दव बि॑दुत मला माझे प्रतिबि॑ब पहायचे होते माझ्या बटेतुन गळणारे पावसाचे थे॑ब तुझ्या खा॑द्यावर पाडायचे होते छत्री न्हवती म्हणुन काय झाले एका ओढणी खाली दोघा॑नी बसायचे होते, पण्..तु सा॑गितल्यावर पावसाने ही था॑बायचे ठरवले होते अ॑गावर शहार
काव्यरस

जखम!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 03/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
"स्मृती" प्रेम एक अनुभव वाचलं आणि जखमेवरची खपली निघाली. नव्हतच करायच सफल तर हे घडाव का? नव्हतीच मिळायची साथ तर प्रेमात पडाव का? का नसते भान मनाला जात पात या सगळ्याचे . का जखडती पाश तनाला नुसत्या एका नजरेचे? तट्तट तुटती बन्ध मागचे माय बाप भावंडांचे . ध्यास एक लागतो जीवाला कसले खेळ हे नियतीचे? घायाळ जखमी ; वाट न सरते पाउलान्चे मनाशी बन्धन तुटते ओढ मागची पुढे जायचे मरणानन्तर श्वास घ्यायचे !!

वेडेपणा....

लेखक स्पंदन यांनी शुक्रवार, 30/04/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कर मंडळी.... त्रिवेणी जमली का ते सांगा.... ******************** दिवसभर डोळ्यात भिरभिरतेस आता स्वप्नांवारही ताबा घेवू लागलीस... . . हल्ली वेडेपणाचा अर्थ समजू लागलाय... ~ स्पंदन ~

धनी माझं कसं येईना अजून

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/04/2010 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
धनी माझं कसं येईना अजून
दिस हा गेला रात चढली कितीक बसावं सजून धजून वाट पाहूनी डोळं थकलं धनी माझं कसं येईना अजून ||धृ||
रातीचा मी शिणगार केला शेज सजवूनी गजरा माळला शालू नेसूनी तयार झाले कुंकू ल्याले भांगातून ||१|| धनी माझं कसं येईना अजून
सांगून गेलं आठदिस झालं कुठं आसलं कुना ठावं लवकर येतो म्हनलं होतं लढाईतून परतून ||२|| धनी माझं कसं येईना अजून
काळीज माझं चिमनी जसं नाही काही थार्‍यावर फोलपणा हा सजण्याचा न जाई मनातून ||३|| धनी माझं कसं येईना अजून - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०४/२
काव्यरस