Skip to main content

कविता

आणि अचानक.....

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 02/06/2010 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अचानक डोळे पाणावले, काही समजेना हे मला काय झाले कधीच नव्हतो इतका उदास, इतका शांत कधीच नव्हती पडली जगण्याची भ्रांत निराशेच्या भोवर्यात गटांगळ्या खात खोल खोल कुठेतरी मनाच्या गाभार्यात माझ्याही नकळत मी कसां शिरतो मिटताच पापण्या चेहरा तुझा आठवतो निमिषात एका घडून जाते सारे संपतात शब्द उरतात फक्त सुस्कारे वाटते भेटशील का परत फिरुनी एकदा किमान हो म्हण तेवढाच उदयाला आसरा
काव्यरस

बरे नाही

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 31/05/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
गझल सम्राट सुरेश भट ह्यांची एक अतिसुंदर गझल.
काव्यरस

पिकल्या आंब्याला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/05/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पिकल्या आंब्याला सिच्यूऐशन: हिरवीन आंबे विकणारी आहे. आंबे विकतांना ती गिर्‍हाईकांशी काव्यातून संवाद साधते... गद्य: आंबे घ्या आंबे, गोड गोड रसाळ आंबे आंबे घ्या हो आंबे!
काव्यरस

बजरंगाचा भक्त पैलवान

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/05/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
बजरंगाचा भक्त पैलवान
हि कविता आपला सगळ्यांचा लाडका टारझन यास अर्पण
मी आहे बजरंगाचा भक्त, त्याचा डोक्यावर वरदहस्त मेहनत करतो कसूनी, मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ|| शाळेत होतो द्वाड, घरी करायचे नाही लाड चिंचा बोरे आवळे पाडूनी खायी नाही कसली त्याला तोड लहाणपणी म्हणती सगळे तू अभ्यासात सुस्त आता मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||१|| दंड बैठका तालीम करतो, जोर मारूनी घाम गाळतो शड्डू जोरात ठोकतो, गडी समोरचा घाबर
काव्यरस

दिले नादान तुझे हुआ क्या है.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 29/05/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिले नादान तुझे हुआ क्या है.... ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल. आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात आपल्याला अधिक माहीती मिळेळ. सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते “मार्ग” म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात.

नदीकाठी सासूरवाशीण

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नदीकाठी सासूरवाशीण
अल्याड आहे सासर माझं, पल्याड माहेरा पाहते मधी वाहे चंद्रभागा, त्यात धुनं मी गं धुते || पानी वाहे दुधगंगा, जसं अमृताच्या चवीचं त्याची गोडी काय सांगू, त्याची गोडी अविट || नदीकाठची शाळू वाळू, बारीक बारीक मदी आसतील गोटे, बी संगे खारीक || माहेर मोठं दांडगं, नाही कसली वनवा सासर बाई आसलं द्वाड, त्याला कसली पर्वा || सोडले मोकळे पाय नदीच्या ग पान्यात, ऐन्यात रूप दिसे, रूपे सोनेजडीत || जा ग माय जा ग माय, अशीच ग तू वाहत भरव तुझ्या लेकरांना, चारा देई दुष्काळात || कितीकदा येते
काव्यरस

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
तो: गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग पदर कमरेला विळखा घाली असती आपल्यातच दंग चाल तुझी मोरावानी हरणापरी चपळ अंग कुठं जाशी कुठून येशी सांग सांग सांग पोरी सांग सांग सांग
ती: गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद शिंप्याची चुक झाली केली चोळी त्याने तंग मोर हरणावानी चाल चपळ न्हाई तुझ्यागत फोपशी अंग नसत्या चौकशा करू
काव्यरस

कळालं तेव्हा...

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 28/05/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाला पाणी घातलं तेव्हा कळालं गुलाब तर केव्हाच जळुन गेलेला आता नेहमीच हसायचं असं ठरवलं तेव्हा कळालं माझं हसणंच रुसुन निघुन गेलेलं मित्राची माफी मागायची ठरवलं तेव्हा कळालं तो तर या जगातुनच निघुन गेलेला जिच्यासाठी सगळं सोडायचं ठरवलं तेव्हा कळालं तीच मला सोडुन निघुन गेलेली मला जपणारे कोण, समजलं तेव्हा कळालं प्रेमाचे दोन शब्द बोलणारे आयुष्यातुन निघुन गेलेले आता तरी रडावं असं ठरवलं तेव्हा कळालं अश्रु सुद्धा माझ्याशी रुसुन बसलेले शेवटचा पर्याय म्हणुन मरायचं ठरवलं तेव्हा कळालं मृत्युदेवी माझ्याकडे पाठ फिरवुन हसत चाललेली डिस्क्लेमरः (गैरसमज नकोत म्हणुन): कवितेतुन एवढच सांगण्याचा उद

पोवाडा मर्द मावळ्याचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 27/05/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा मर्द मावळ्याचा खण खण खणाण खण खण खण खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार शिवाजीचा अवतरला अवतार शत्रूंना दिले उत्तर बाणेदार साथ दिली मावळ्यांनी भरपूर अशा राजा शिवाजीस करूनी नमन शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा मर्द मावळ्याचा जीर हा जी जी जी जी जी ... अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले अनेक किल्ले राजांनी जिंकीले अनेक शत्रू त्यांनी मारीले मराठी राज्य त्यांनी स्थापिले शिवाजीमहाराज छत्रपती जाहले याकारणे साथ दिली अनेकांनी तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी अहा ... { गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले.
काव्यरस

प्रार्थना

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 26/05/2010 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
साद मागची; साद नसे रे, हा तर सारा भुलावा. क्षणभर भुलवी; धरा सोडवी, भवसागर कैसा तरावा? चुकार मनाच्या बसे कोनाडी; हळुवार शिळ जशी विरावी, हवेत जरी ती नसे कुठेही, ठोका हृदयाचा चूकवी. असतील जर पाश कुठे रे जखडाया मना; तना सोबती, ऐवज सारा गहाण घालीन सात जन्म वरती. सोडव मजला मनापासुनी नको वेदना; नको भिरभिरणे, थांबव माझे बंजारेपण, घाल पदरी स्थिर जगणे. अपर्णा
काव्यरस