Skip to main content

कविता

नकोस माझी आठवण काढू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/05/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस माझी आठवण काढू नकोस माझी आठवण काढू नकोस मजला मोही पाडू भोगले क्षण ते ओले नकोच त्यांना आता कुरवाळू || ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते शब्दही त्यातून नच फुटी ते कढ दु:खाचे बाहेर काढण्या हुंदकाही नकोच सांडू || उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात लाव्ह्यापरी जाळे तो मनास काय राहीली शेवटली बाकी गणितही त्याचे नकोच करू || - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०५/२०१०
काव्यरस

विश्वास

लेखक उग्रसेन यांनी शुक्रवार, 21/05/2010 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
गोड शब्द, गोड वचनं आणि निरागस चेह-यावर कधीच विश्वास टाकू नकोस असं तु म्हणायचीस. मुखवट्यांच्या चेह-यात तुझाच एक चेहरा खरा वाटायचा, पण कालांतरानं कळलं तोही फसवाच. आता तुझे स्पर्श बोलतात आणि पाणवतात डोळे. तेव्हा मात्र धैर्य होत नाही तुझ्यावर,तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवायला.
काव्यरस

विचारु नका ..!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/05/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
कोण मी मलाच हे विचारू नका आज मी जिवंत कां विचारू नका... मारुनी स्वतःस मी निष्पाप कसा? आसवांचे अर्थ मला विचारू नका... कां असा सुखांचा मार्ग बदलला? वेदनांचा पत्ता मला विचारू नका... तो सुर्य, चंद्र..,तारकाही गळाल्या क्षितीजाचा गाव मला विचारू नका... कोमेजल्या कळ्या चित्रातल्या? कां फिकुटले रंग? विचारू नका ... हरवला भाव सांगा कुणा गवसला? सोडला ठाव, कां? मला विचारू नका.... विशाल

तुझी घागर नळाला लाव...

लेखक फटू यांनी बुधवार, 19/05/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं.

गणपती बाप्पा मोरया

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 19/05/2010 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.
काव्यरस

जावा तिकडे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/05/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
जावा तिकडे उं.. जावा तिकडे मी नाही येत, तुम्ही ना गडे सोडा मला आता, जवळ कशाला ओढता तुम्ही गडे ||धृ|| शौकिन तुम्ही हे आसलं, नाही म्हणत नाही कधी हौस जीवाची करता, सोडत नाही एकही संधी अंहं...
काव्यरस

पोरी पदर घे उन लागलं

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/05/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
पोरी पदर घे उन लागलं चाल: येथे ऐका आगं पोरीsss पदर घे ग उन लागलं गssss रंग काळल गss आता ग पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं उन लागलं ग रंग काळल पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं बाहेर पडती तू गं दुपारमधनं वेगी चाल रस्ता सारा पायाखालनं उन आहे जाळ आसं चैत्रातलं पोरी पदर घे ग उन लागलं आता ग पोरी पदर घे उन लागलं माती उडतीया आशी गं वार्‍यावर डोळा जाईल धुळ ss अन होईल येळ वाट पाहायची आता उगा किती काळ आता तरी सांग सारं मनातलं ग पोरी पदर घे ग उन लागलं आता ग
काव्यरस

आज पुन्हा मरणास पाहिले

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 16/05/2010 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्‍या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे. असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे.

अशी लाजू नको

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 16/05/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
अशी लाजू नको
अशी लाजू नको अशी मुरडू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ|| स्वप्नातले रुप आज सत्यात आले हातात घेवून मी ते पारखले सहवासात तुझ्या विसरलो जगा अशा समयी वेळेची फिकीर नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१|| फुलापरी तुझा सुगंधीत गंध असे तसाच गुलाबी रंग रूपास दिसे रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०५/२०१०
काव्यरस

वाढदिवस

लेखक sur_nair यांनी रविवार, 16/05/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस अलीकडे ते एकमेकांचा वाढदिवस साजरा करत नाहीत एकमेकांना छोटासा पुष्पगुच्छ साधसं भेटकार्डही देत नाहीत इतर कुठल्याही दिवसासारखी ती तारीख येते, निघून जाते मित्र मैत्रिणींच्या शुभेच्छामध्ये हरवतात दोघे एकमेकांचे 'वय वजन वाढते त्यात साजरं काय करायचं' ती म्हणते डिनर व केक, सुंदरशी भेट त्याची सर्व इच्छाच मरते कधी तोही असतो हिरमुसलेला तिच्यावर कशास्तव चिडलेला त्याचा आवडीचा पदार्थ करायचा मग तिचाही बेत रद्ध झालेला यावेळेस तो विचार करतोय निदान प्रयत्न तरी करायचा डिनर नको तर चौपाटीव
काव्यरस