Skip to main content

कविता

अभिनंदन

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 20/04/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात भीती कसली?

श्रद्धा

लेखक जागु यांनी सोमवार, 20/04/2009 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिकडे तिकडे अंधश्रद्धेचे थैमान, कुणा अशुभ कुणा शुभाचे वरदान ! जळी स्थळी भिन्न त्याचे माप, श्रद्धेवर अश्रद्धेने केलेला घात, दुबळ्या मनावर घडलेला अपघात ! मांजर आडवे जाता कर्म बिघाड, वाट पाहतात पिल्ले तिची रस्त्या पार ! घुबडाचे तोंड का असे अपशकून ? पाहून नये का जग तिने जन्म घेऊन ? टिटवीचे ओरडणे मारते कुणा, तिलाही होतच असतील मरण यातना ! पापणीची फडफड धरी स्वतःवरच रोष, देहाच्या त्रीदोषांपैकीच हा एक दोष ! आहे ना थोडी श्रद्धा विधात्यानेच सृष्टी निर्मिल्याची ? जे घडते ते त्याच्याच इशार्‍यांनी सारेच असे शुभ नसे कुणी अपशकूनी श्रद्धेला नेऊन ठेवा उच्च स्थानी .
Taxonomy upgrade extras

स्फुटक..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 20/04/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पेन घेतलं...? पाकिट .. चश्मा..? तिचे नेहमीचेच प्रश्न .. माझी उत्तरे ठरलेली.. आता.. ती नाही.. उत्तरे आहेत.. पण.. प्रश्नच नाहीत......!!

बळ दे !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 20/04/2009 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
बळ दे.....! दोन हात जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करू नकोस , ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्व दु:खात आणि पर सुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच ! एकदा तरी सुंदरशी खेळी फसायचं बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत ! पण अंधारातही स्वत:च्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी ! सरते शेवटी "प
Taxonomy upgrade extras

मुक्तक..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 20/04/2009 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला नाही वाटत बरं तूच हातानी जेवुन घे ना बाळा.... काप-या स्वरात आई बोलली.... केवळ तिच्या समाधानासाठी मी कशीबशी खिचडी खाल्ली बेसिन मध्ये हात धुताना.. डोळ्यातिल आसवं हातावर ओघळली...! बरं वाटेल ना तिला..? मनात शंकेची पाल चुकचुकली...!!!

मनात लपलेला दु:शासन!

लेखक उमेश कोठीकर यांनी शनिवार, 18/04/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
शरीर स्त्रीचे भासे शाप डोळे विखारी जगी अमाप नजर फिरते अंगी जैसी बुभुक्षित ते कामुक साप! परस्त्री ती समोर दिसता दु:शासन तो जागे क्षणात खेळ मनीचा विकृत चाले भोग तिचा तो घेई मनात गर्दी असो! असो एकांत पदर खेचण्या अधीर हात हात सराईत जागी लागे वखवखलेली श्वापद जात! असो बालिका असो तरूणी नाते गोते लज्जा नाही नरमादीचे नाते एकच! असहाय्य मादी मुकाट साही असेल कोठे कृष्ण सखा तो? कवच तुझे दे! शरीरी रक्षक दग्ध होईल शरीर अमुचे कामुक नजरा!
Taxonomy upgrade extras

फुलाचं जीवन

लेखक जागु यांनी शनिवार, 18/04/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
फुलांच आयुष्य - अल्पायुष इवल्याश्या आयुष्यातही पुर्ण जीवन ! कुणी काट्यावर कुणी चिखलावर परी हसर्‍या रुपाने सर्वस्व फुलवत! कर्तव्याचा संदेश सुगंधात दरवळवत हुंगले जरी कुणी कर्मात ना मोडत! कुणी माळेत, कुणी इश्वर चरणी, लीन होऊन जीवन सार्थक ! कूणी बागेत, कुणी वाटेत वाटे वाटेतुन बाग फुलवत ! कुणी गजर्‍यात, कुणी फुलदाणीत सजवण्यासाठी सदा टवटवत! कुणी गुच्छातून सन्मान राखतं कुणी मृत शय्येसही श्रद्धांजली वाहत! फुलाचं जीवन, जन्म जगण्यास शिकवतं !
Taxonomy upgrade extras

पौर्णिमा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 17/04/2009 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य विभागातल्या पौर्णिमा पाहून {वाचून} मला माझी पौर्णिमा खुणावू लागली. थोडी वेगळी पौर्णिमा. हाकारले फुलांनी अंगार शोधताना मज पौर्णिमा गवसली अंधार शोधताना एकेक पाकळीचा एकेक सूर झाला हरपून भान गेले गंधार शोधताना माझ्यापुढे खुली ही झाली कुबेरनगरी, माझ्याच अंतरीचे भांडार शोधताना डोळ्यांत दाटलेले ते भाव मूर्त झाले नाकारण्यात दडला स्वीकार शोधताना खुलली अजाणता ती विश्वातली रहस्ये, सगुणात निर्गुणाचा आकार शोधताना मी, सावळ्या अरूपाची ब्रम्हलीन छाया झाले तपस्विनी का संसार शोधताना?

सख्खे शेजारी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 17/04/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यातली दोन मनं अगदी सख्खे शेजारी एक वेडं , तर एक शहाणं ! वेड्याच्या हाती तलवार तर शहाण्याच्या ढाल ! वेडं वाट चुकत असतं नको तिथं धावत सुटतं शहाणं वाट शोधून काढतं योग्य जागी नेऊन सोडतं ! वेडं सतत घाईतच असतं संयमाशी पटतच नसतं शहणं मात्र शांत असतं धिराच फळ त्याला हवं असतं ! वेडं मन हट्टाला पेटतं धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं शहाणं त्याला जवळ घेतं समजूतीच्या ओलाव्याने त्याला शांत करतं !
Taxonomy upgrade extras

पौर्णिमा

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 17/04/2009 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुताई नि राघवदादांच्या पौर्णिमा पाहून/वाचून मला मागच्या एका कोजागिरी पौर्णिमेला लिहिलेली कविता/गझल आठवली. शिळी, उष्टी असेलही कदाचित; पण आठवण झाली नि सहज शोधून मिळाली म्हणून मग येथे चिकटवायचे ठरवले.