Skip to main content

कविता

स्वप्न

लेखक मनोज यांनी गुरुवार, 09/04/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
अशी काजळली रात चंद्र ढगात लपला जीवनाचा सारा प्रकाश प्रिये कोठे ग लोपला कसे विझले अकाश नाही चांदनी पेटत झोप गेली दुर देशी नाही पापनी मिटत अशी एकटीचा वाट का केंव्हाची सरेना लाख जपल्या जखमा त्याला काळीज पुरेना झाला श्रावण पाहुणा अता ग्रीष्मात जगणे खडे फेकत नदीत गोल तरंग बघणे झाले ओसाड जीवन वांझ मनाचीया आशा गांव मोडला स्वप्नांचा फक्त ऊरला नकाशा

भाकरीतला जलालाबादी

लेखक कवटी यांनी गुरुवार, 09/04/2009 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : रेवती आणि विशाल कुलकर्णी वार्डाबुरुंडी फिरताना, जुनी मळकी भाकरी मिळाली हलकेच घासता भाकरीमधुनी जलालाबादी की हो निघाला ठो ठो ठो ठो .... हवेत गोळ्या झाडून म्हणाला बोल माझ्या मुला, कुठले ऐकवू भाषण तुला? भाषण तर कधीच ऐकले शोधतो नव्या 'क्षणभंगूर सिंगूर' ला महाकाव्य शोधणे झाले मुश्किल बाबा रे, आता तुझाच हवाला विषण्ण हसला, हळुच म्हणाला मालको, जुना जमाना गेला भाकरी गेली पिझ्झा आला असते जर सोपे लिहीणे महाकाव्य ते पुर्ण करणे महाकवी तुझा हा असा असता का गंजल्या खाटेवर पडला? वार्डा, बुरुंडी नाहीतर गेल
Taxonomy upgrade extras

दिव्यातला राक्षस

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/04/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक पाडली समुद्रकिनारी फिरताना, जुना गंजला दिवा मिळाला हलकेच घासता दिव्यामधुनी राक्षसकी हो निघाला हा हा हा हा .... विकट हास्य करुन म्हणाला बोल मेरे आका, कहा करु तेरा तबादला तबादला तर कधीच झाला शोधतो नव्या शहरात दलाला घर शोधणे झाले मुश्किल बाबा रे, आता तुझाच हवाला विषण्ण हसला, हळुच म्हणाला मालको, जुना जमाना गेला असते जर सोपे शोधणे आजकाल प्रामाणिक दलाला गुलाम तुझा हा असा असता का गंजल्या दिव्यात राहीला खारघर, कल्याण नाहीतर गेलाबाजार एखादा कर्जतला वन बी एच के नसता का पाहिला. विशाल

यल्गार

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/04/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आता सोड तारे मोजायचं.. मोजताना चुकलं की आपणच हळहळायचं.. ही मोजणी नेहेमीच चुकणार.. इथे रोजच मृत्युला नवा घास मिळणार.. बाँब आणि बुलेटस आपलं प्राक्तन असणार .. आपलेच हात आणि आपलेच गळे.. लक्षात ठेव आपल्याच काळजाला.. आपणच पाळलेल्या श्वापदांचे सुळे.. ते म्हणतात आग विझवलीय.. आमच्याच राखेखाली ठिणगी दडपलीय.. म्हणुन म्हणतो तारे मोजणं सोड.. राखेखालची ठिणगी शोध ऐक्याची मार फुंकर.. चेतव वन्ही स्वत्वाचा आणि कर यल्गार.. नव्या युद्धाचा अस्तित्वाच्या लढाईचा...! विशाल

चैत्रगौर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 09/04/2009 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी.

कामवाली!

लेखक उमेश कोठीकर यांनी बुधवार, 08/04/2009 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
होती गरीब कष्टमूर्ती ती साधी निरागस कामवाली पती मुले आयुष्यच सर्व कष्टांचा ती डोंगर झेली! नाही दिवाळी! नाही दसरा हौस मौज ना ईच्छा काही पती दारूडा! नरकयातना! वीजवेदना! चमकून जाई होती शहाणी! म्हणे हळूच ती मुले माझी शिकतील ताई मोठ्ठे होतील तुमच्यासारखे! नको देवा! दुसरे काही! मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून ती कौतुक सांगे काय बाई! वळ माराचे लपवून पदरी! काम करी! सांगे ना काही! स्वप्न्!नशीब!आयुष्यही फुटले! लपवे ती अश्रूंचे पाट! असीम कष्टा फळ मिळे ते दारूचाच घमघमाट! झोपड्पट्टीत गलका झाला! खिडकीत वाकून! काय झाले? कळले आता दारूड्याने कामवालीला ठार मारीले! काळीज चर्र!
Taxonomy upgrade extras

सहवास मजला हवा...

लेखक jenie यांनी बुधवार, 08/04/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
रान झाले उदास पाऊस गेला बरसून डोळीयात अनिवार पाणी आले भरुन..... टपकताना आसवांचे एकेक थेंब थेंब करपून गेले माझ्या.. न उरली काही आशा उसवले सगळे धागे विहारती भोवती पक्षी पण दुरावले सारे.... सर्व काही लाभते परि आहे काही उणे मोहरा विनाच वृक्ष लगडेल कसा फळाने.... या घनतिमिरी काळोखात तुच जाहालास दिवा आसाच तेजोमयी तुझा सहवास मजला हवा....

सारे काही पहिले

लेखक जागु यांनी बुधवार, 08/04/2009 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील काही पहिले क्षण सुखद अनुभवाचे सारे धन बाळाचं पहिल पाऊल मोठेपणाची लागलेली चाहूल आयुष्यातील पहिला पाऊस कागदी होडीची केलेली हौस कडाडलेली पहिली विज आईच्या मिठीला बिलगलेले काळीज पहिला दिवस शाळेचा गंध दरवळणार्‍या कोर्‍या पुस्तकांचा घडलेली पहीली मैत्री घरापलीकडील ती दृढ नाती झालेल पहिल दु:ख रडून रडून मिळालेल सुख प्रेम पहिल जुळलेल मन कुठेतरी हरवलेल प्रेमाचा पहिला स्पर्श भावनांशी भिडलेला संघर्ष सारे काही सुखद पहिले फक्त आठवणीत राहणारे पुन्हा परत न येणारे.
Taxonomy upgrade extras

निनावी नगर

लेखक जागु यांनी मंगळवार, 07/04/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक नगर असावं निनावी तेथे कुणी न राजा न राणी मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी रुपया नाणी नसो व्यवहारी असो माणूसकीची देणी घेणी अनाथ आश्रमे तेथे नसावी वृद्धाश्रमेही ओस पडावी कायद्याची वाट नसावी मंदीराला हाक असावी एकात्मतेची असो दिवाळी स्वार्थाची पेटावी होळी प्रेमाची बरसात असावी मायेची पालवी फुटावी पौर्णिमा येथेच खिळावी अमावस्येला जाग न यावी.
Taxonomy upgrade extras

अनाथाश्रमाची भेट!

लेखक उमेश कोठीकर यांनी मंगळवार, 07/04/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथाश्रमी जाण्या झाले निमित्त दु:खाचे बाळ सोडून गेले माझे दोन दिवसांचे अनाथश्रमी मी गेले दु:ख हलके कराया माझ्या बाळाच्या आठवाने फुले देवाची बघाया पोचताच मी तेथे बाई समोर आली करडा आवाज देता मुले पळत आली हात जोडून सारी माझ्या समोर बसली फुले देवाची निष्पाप धुळीत मातेने फेकली कोणी छोटी कोणी मोठी ठायी त्यांच्या फक्त आशा आई बाबा या हो लवकर! रडवेली त्यांची दशा! चूक आमची काय? आम्ही देवाघरची फुले तुम्ही तरी न्या हो घरी! आईबाबा आठविले भाव निरागस त्यांचे हसू ओळखीचे वाटे आई आली का न्याया?
Taxonomy upgrade extras