Skip to main content

कविता

गुढी उभारावी अशी

लेखक राजा यांनी शुक्रवार, 27/03/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी उभारावी अशी
एक उभी केली काठी त्य़ाला बांधली गोड गाठी निंबाचा उघळा वर तांब्याची लोटी दर वर्षी आपण अशी पारंपारीक गुढी उभारतो पण थोर पुरुषांनी अशा अमर गुढ्या उभारल्या भक्तीची गुढी तुकारामांनी ज्ञानाची गुढी ज्ञानेश्वरांनी गिता संदेशाची गुढी कृष्णांनी शांतीची गुढी बुध्दांनी महाराष्ट्राची गुढी शिवरायांनी समतेची गुढी ज्योतिबांनी सत्य अहिंसेची गुढी गांधीनी देश भक्तीची गुढी सावरकर, भगतसिंगांनी स्वच्छतेची गुढी गाडगेबाबांनी शिक्षणाची गुढी कर्मवीर अण्णांनी मला वाटते मोठे काम करणे म्हणजेच गुढी उभारणे होय आपण सुध्द
Taxonomy upgrade extras

तुझं घर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 26/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शब्दांची पाखरं उडतील वार्‍यावर दाही दिशांत फिरून शोधतील तुझं घर तुझ्या अंगणी विसावा घेतील ती क्षणभर माझ्यासाठी आणतील तुझ्या गाण्यातले सूर माझ्या आशेचा पाऊस बरसेल झरझर ओल्या मातीच्या गंधाने धुंदावेल तुझं घर मोती थेंबांचे सांडेल तुझ्यासाठी फुलांवर माझ्यासाठी आणील तो तुझा प्राजक्तबहर माझ्या स्वप्नांचे काजवे जागतील रात्रभर उजळेल तुझं घर, तुला दिसेल समोर उभा अंगणी मोहक चांदण्यांचा गुल्मोहर माझ्यासाठी झळाळेल तुझ्या हास्याचे झुंबर माझ्या कल्पनेचा वारा माझा धरून पदर मला संगती नेईल दाखवाया तुझं घर मंद शीळ घालून तो उघडील तुझं दार माझ्यासाठी आणील तो ............तुलाच माझ्यासमोर!
Taxonomy upgrade extras

निरोप

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/03/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आज मोगरीने डाव साधला सुन्न ओझे आठवांचे घाव घातला.. सुटे भान दिशाहिन आज जाहलो सापडेना मार्ग माझा चांद मातला.. हरवले माझे पण तुला पाहता आसवांनी दोर माझा आज कापला.. संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता भुतकाळ रम्य सारा आज बाटला.. हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी आसवांना लपविता भाव दाटला.. एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! विशाल

आता नाही

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 25/03/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचा जुना आड आता नाही वेदनांचे तसे लाड आता नाही.. मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही.. वेदनांची खरी जाहली मज सोबत संकटांना नव्या "हाssssड", आता नाही.. कल्पनांचा मना लाभला आधार नि... जाणिवांची तशी चाड आता नाही.. झेलले घाव सारे सदा सुमनांचे अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही विशाल

शाळा

लेखक जागु यांनी बुधवार, 25/03/2009 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! भिंतीवरचे सुविचार घडवित होते आचार मास्तरांची छडी घाली शिस्तीची घडी पुस्तकातील धडा भरे ज्ञानाचा घडा कवितेचे पठण लावे आयुष्याला वळण शाळेची मधली सुट्टी डब्यासंगे जमे गट्टी सर्वत्र आरडा ओरडा शिक्षेसाठी उठा बशा पिटीचा एक तास मैदानाची पाहे वाट कसरत अन कवायती श्रमाचीही कळे मती जन गण मन ची सुरूवात वंदे मातरमने शेवट संस्कारांची ही देवाण जीवनातील ही ठेवण.
Taxonomy upgrade extras

तु नसताना.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी बुधवार, 25/03/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
तु नसताना..... ! हा चंद्र फ़िका वाटतो.. गूढ भासतो..सखे.. तु नसताना.... विमनस्क नभी हिंड्तो... खुळा हासतो.. सखे.. तु नसताना... हरपला ओठीचा सूर.. धडधडे उर.. मनी काहुर.... डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... सखे.. तु नसताना.... [१] हा उदास वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा... शोधितो गंध बावरा... होई कावरा.. सखे.. तु नसताना... [२] र्‍ह्दयात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश... चालला रवि अस्तास... ओठी बिभास... सखे.. तु नसताना... [३] निःशब्द निळ्या अंगणी.. बघ मुकी शुक्र चांदणी .... व्याकुळ चंद्र मीलनी... कशी विरहिणी ... सखे.. तु नसताना...

दिवस जूने भुलायचे,काळजी वाचून जगायचे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/03/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला. हेल्थ स्कीममधून सिनियर सिटीझननां ही सवलत होती. भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले, " जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.
Taxonomy upgrade extras

प्रतिक्षा.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 24/03/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षा.....! प्रतिक्षेत सखे तुझ्या.. कसे मन.. सैरभैर झाले.... ओठांवर मग.. तव विरहाचे.. आर्त गीत उमटले... नकळत होई भास पुन्हा ग... तव स्पर्शाचा क्षणोक्षणी.... मंद चंदनी गंध तुझा मज... लावी पिसे ग.. मनोमनी.. आतुर तव भेटीला नभ.. मृग थेंब बनुनी बिलगले.. ओठांवर मग ....... [१] वाटे मजला सौधामध्ये... असशील बहुधा तु अजुनी... वळूनी बघता होई हसे.. मज चंद्र खुणावे..तो गगनी... त्या बिंबातुन तव प्रतिमेचे... रुप निशी प्रकटले... ओठांवर मग .......[२] रेशीमस्पर्शी मीठीत तुझीया...वाटे मज मी.. स्वर्गी असे.. तुझ्या नि माझ्या प्रीतिचे गे... सुंदर घरकुल मनी वसे.. परि ना कळले..
Taxonomy upgrade extras

सूर भैरवीचे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 24/03/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
मज छेडती अवेळी ते सूर भैरवीचे करती अगम्य खेळी ते सूर भैरवीचे भिजुनी तुझ्या स्मृतिंनी माझ्या मनात ओली ती रात्र पावसाळी अन् सूर भैरवीचे भुलवून या मनाला मज दूर दूर नेती हलकेच सांजवेळी ते सूर भैरवीचे माझ्या मनातली मी गीते दिली तरीही गाती तुझ्याच ओळी ते सूर भैरवीचे स्वप्नात साद देते मज पैलतिरी इवले घर एक चंद्रमौळी अन् सूर भैरवीचे घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
Taxonomy upgrade extras

खंत

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/03/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
बोलली नाहीस कधी न सांगताच पण काही मज उमजली होती सखे तगमग अलवार तूझी मिटल्यास पापण्या तू पण रुद्ध डोळ्यांमधली मज जाणवली होती आतुरता व्याकुळ तूझी मिटलेल्या ओष्ठकळ्या कबुलणार नाहीस तू सखे ओळखली होती मुग्ध हळवी प्रीत तूझी वृंदावन डोळ्यांमधले तू गं राधा कृष्णमयी गोकुळात विरघली होती मुक नि:शब्द वेदना तूझी विषप्याला अमृत झाला श्यामखुळी तू वेडी मीरा कृष्णात मिसळली होती स्निग्ध शांत चेतना तूझी मज कळली नाही कशी खुण आपल्या नात्याची सखे मीच हरवली होती धुंद ओढाळ मुरली माझी विशाल