Skip to main content

कविता

कोण तूं रे कोण तूं ?

लेखक सुभाष यांनी बुधवार, 18/03/2009 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
कोण तूं रे कोण तूं कालिकेचे खड्ग़ तूं ? की इंदिरेचे पद्म तूं ? जानकीचे अश्रु तूं ? की उकळता लाव्हाच तूं ? खांडवांतिल आग तूं ? की तांडवांतिल त्वेष तूं ? वाल्मिकीचा श्लोक तूं ? की मंत्र गायत्रीच तूं ? भगिरथाचा पुत्र तूं ? की रघुकुलाचे छत्र तूं ? मोहिनीची युक्ति तूं ? की नंदिनीची शक्ति तूं ? अर्जुनाचा नेम तूं ? की गोकुळीचे प्रेम तूं ? कौटिलाची आण तूं ? की राघवाचा बाण तूं ? वैदिकाचा घोष तूं ? की नीतिचा उद् घोष तूं ? शारदेचा शब्द तूं ? की हिमगिरी नि:शब्द तूं ? की सतीचे वाण तूं ? वा मृत्युला आव्हान तूं ? शंकराचा नेत्र तूं ?

वय

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/03/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
खास माझ्या लेकींसाठी लिहिलेली कविता. वय तुझे फुलण्याचे, वार्‍यासंगे बोलण्याचे इवल्याशा पंखांवर आसमंत पेलण्याचे आपल्याच सुरांमध्ये गात आपलीच गाणी आपल्याच रचनेच्या सौंदर्याला भाळण्याचे कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली, तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे तुझी स्वप्ने जपताना ज्यांचे वय ओसरले, त्यांनी भाग्य दिले तुला हिरेमोती तोलण्याचे
Taxonomy upgrade extras

मन!

लेखक प्रेरणा यांनी बुधवार, 18/03/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी जुन्या आठवांनी मन भरून येतं.. शुभ्र काळ्या ढगांनी आभाळ दाटून येतं.. पावसाची जाण, फक्त, वैशाखाचं रान देतं! सोबतीला आषाढाची ओल धरून येतं.. भारलेल्या क्षणांमागे पुन्हा जाऊ बघतं.. झुळुकीवरती कळीसारखं हळूच फ़ुलून येतं! नात्यांची वीण जरा पुन्हा उकलू पाहतं.. निसटलेली रेती, वेडं, पुन्हा धरु जातं! जुन्या जुन्या वाटांवरती पुन्हा फिरून येतं.. सरलेले दिवस जरा पुन्हा जगून येतं.. प्रेरणा
Taxonomy upgrade extras

घड्याळ

लेखक जागु यांनी बुधवार, 18/03/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
जोराने एवढ्या ओरडू नकोस थोडावेळ थांब उशिरा झोपले रात्री , अंगाला चढलाय आम टक टक तुझी सदा चालू असते जग सारे तुझ्याभोवती घुटमळत असते. २४ तास तुझे न चुकता जागतोस अर्ध्या पेक्षा जास्त त्यात आम्हालाच राबवतोस. ऑफीस चालू बंद करण्याची तुझ्यात असते ताकद आम्हाला मात्र सुट्टीची मोजावी लागते किंमत. नको तेव्हाच कधीतरी बंद पडतोस आणि कामाचा सगळ्या बट्याबोळ करतोस. जन्मा पासुन मरणा पर्यंत तुझा असतो सहवास एखाद दिवस नसशील तर दिवस होतो भकास.
Taxonomy upgrade extras

तुझ्या दु:खाविना

लेखक शिवापा यांनी बुधवार, 18/03/2009 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन किती वेळ जाईल? तुझी आठवण कुठपर्यंत राहिल? तु गेलायेस पण आठवण छळतेय तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच हे सर्व दु:खांचे हेहि संपेल पर्व आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना आठवणीची सारी भुते जळतांना हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी अश्रुही तरळणार नाहि तुझी आठवण तेव्हांहि येईल पण तुझ्या दु:खाविना

आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 17/03/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु दूर उडुनिया गेल संगे काळीजही नेल बाळ होता इवलासा केला जीवाचा हिंदोळा पापणीच्या पंखावर त्यांनी बाळाला ठेवला त्याची गरुडाची झेप जग कवेमध्ये आल कसा विसरला बाळा बळ पंखाना दिलेल घार हिंड्ते आकाशी लक्ष्य तिचे पिलापाशी पिलु उड्ता आकाशी घार एकटी घराशी दिसु लागे पैलतीर पिलु दुरच्या आकाशी वाट पाहते नजर घोर लागला जीवासी कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दांण प्रेमाने टिपाव
Taxonomy upgrade extras

माझे घर

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/03/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मझ्या घराचा तुम्हा काय सांगू थाट ? रुबाबदार रस्त्यातून एक डौलदार पायवाट! स्वागता असे उभी जाई जुई ची कमान वृंदावनातील तुळशीला असे मोठा मान भवतालीचा बगीचा पशू पक्षांना आसरा कुंपण सभोवती करी काटेरी पहारा दारासमोरील प्राजक्ताचे निर्मळ असे मन विहीरीतील गोड पाणी भागवीते तहान. टांगता कोहाळ दूर ठेवी अरिष्ठ काळी सान बाहुली काढी घराची दृष्ट. ओटीवरला झोपाळा झुलतो झोकात उंबरठ्यावर लक्ष्मी, पावलांच्या रुपात. घरात नाद घुमतो दुडदुडणार्‍या पैजणांचा माझ्या बाळाच्या बोबड्या ओठांचाही चाळा. थोरा-लहानांची माया जसे माठातले पाणी एकत्र कुटुंबाचे, घर कौतूके गातो गाणी.
Taxonomy upgrade extras

<शीघ्र कवीची एक कविता>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 16/03/2009 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते सारेच रस्ते तीच्या घराकडे जाणारे , मोरपीस. एक-दोन-तीन-चार म्हणताच काटा आणणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत सावज दाखवण्यासाठी निघालेला, ती च्या भावाच्या गँगलाही माझ्यापर्यन्त आणून सोडणारा.

(शीघ्र कवीच्या तीन वेता!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 16/03/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्यांच्या धाकाने आमच्यातला कवी मेला!" असं म्हणणारे प्राडॉ जेव्हा तब्बल तीन-तीन कवितांचा नजराणा घेऊन आलेले बघितले तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि आम्ही लगोलग मुद्याला हात घातला ;) कवितेच्या बागेत कळ्या सजतात कविता कळ्यांना स्वतःच्या केसात खोपा करुन माळतेही. तसा विडंबक आसुसलेला असतो कळ्यांच्या निवासी खोप्याला, होतं काय, ओळींतून सुकलेली फुलं पडतात आणि विडंबक निराश होतो! दोन गावंढळासारखी दळता येत नाही पिठासारखी भसाभस कविता मुकाट्यानं शांत बसावं एका जागी, तर तेही नाही जालावर येतो हायसे वाटण्याचे क्षण मिळावेत म्हणून, तर इथेही कवीच्य

ग्लोबल वॉर्मिंग (देवद्वार छंद)

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 16/03/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पाहता पाहता काळ दारी आला सारी वसुंधरा संकटात….१ ऊतले मातले गर्वात नाचले बेफाम वागले सान थोर….२ वाहनांची रीघ जणू पाठशिव हवेचाच जीव घुसमटे….३ यंत्रांचा निघाला धूर काळा काळा प्लॅस्टिकचा मळा त्यात फुले….४ विज्ञानाने केली आपली प्रगती आणि अधोगती आपणच….५ पाहू एक स्वप्न करूया प्रयत्न जपूया हे रत्न पृथ्वी नामे….६ कापडी पिशवी प्लॅस्टिक ऐवजी जमे ही सहजी सुरूवात….७ मोटार गाडीला ठेवुनी बाजूला पायी पायी चला शक्य तेव्हा….८ लावू झाडे, वृक्ष माळरानी रूक्ष मुलांचे भविष्य तगवाया…. ९
Taxonomy upgrade extras