Skip to main content

कविता

जाईची कळी

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/03/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जाईची कळी सायंकाळी उमलली रात्र सुगंधी करण्या काळोखी जागली वार्‍यांच्या मंद झुळकेने लाजली दवबिंदुंच्या स्पर्शाने शहारली चंद्रप्रकाशी पुलकीत झाली रातराणी सखी जाहली पक्षांच्या भुपाळी त डोलली केशरी किरणांच्या कुशीत शिरली अलगद परडीच्या कडेवरून धन्य झाली इश्वरचरणी अर्पुन.
Taxonomy upgrade extras

(...उदरात ढकल काही!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 23/03/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले!

कृष्णमय--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 23/03/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गोरी राधा हरी सावळा अव्दैताचा रम्य सोहळा सगुण होउनी सखा श्रीहरी सहज छेडतो मुग्ध बासरी राधा तोचि तोच बासरी मनात तोचि तोच अधरी स्वरातूंन तो तोच सुरांतून हरी खेळतो कणाकणातून गोप्-गोपिका तोच र्निमितो वेड लावुनी रास खेळतो होउन यमुना धुंद वाहतो हरी सावळा हरी रहतो त्रिगुणात्मक तो तोच गुणातीत विश्वात्मक तो तोच कणातीत तोच लिहीतसे माझे हे गीत श्रीहरी चरणी नित्य समर्पित
Taxonomy upgrade extras

बाकी ते रुसणेच खरे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/03/2009 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे ते लाजणे गालात आठविता गं रात्र सरे शब्द ओलावणे ओठात स्मरण्यां दिवस ना पुरे तु नसशी कवेत आता बघ अशांत मन झुरे बांध वेदनांचा तुटेना शुष्क डोळ्यांत स्वप्न तरे मन विसरु पाही तुला मज सुन्न एकांत सावरे पुन्हा डोकावणे स्वप्नात जखमांचे ते भान ना उरे अन थांबलेले डोळ्यात आसवांचे वाहते झरे लटके ओशाळणे तुझे बाकी ते रुसणेच खरे विशाल

भूल

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/03/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
खुळावले नयन, झाले धुंद सख्या हळुवार तुझी चाहूल संपले अवचित सारे भास मनाला पडली कसली भूल स्तब्ध जाहला, अवखळ वारा वाजता तुझे नि:शब्द पाऊल पाचोळाही अन नाद देतसे बघ उगा तुझ्या येण्याची हूल विसरले श्वास, तुझाच ध्यास तु असा कसा रे उंबर फूल पांघरलेली गात्रांवर ओली खुळावल्या दंवबिंदुंची झूल विशाल

सागराचे मनोगत

लेखक जागु यांनी सोमवार, 23/03/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती मग मला काहो कुरूप करीता ? माझ्या भोवती कचरा पसरवूनी ! नेतो मी तुम्हा पैलतिरांवरी झेलून तुमचा भार खांद्यावरी मला का तुम्ही अडकवीता ? घालुन बांध माझ्या भोवताली ! माझ्यातील जीव मारूनी तुमचे तुम्ही पोट भागवती माझ्या साठी काय हो देता ? घाण आणि प्रदुषणा वाचूनी ! माझ्यातून तुम्ही तेल शोषूनी उद्योग तुम्ही भले उभारती अतिरेकी मज स्पर्शुन जाती तुम्ही कुठे करीता माझी रखवाली ? वाळू चे माझ्या ढिग उपसती लुटता माझे अवयव तुम्ही सोशितो तुमचे सगळे छळ नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.
Taxonomy upgrade extras

...उदयात शोध काही!

लेखक राघव यांनी सोमवार, 23/03/2009 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
चार मायेचे उत्साहाचे शब्द निराश मनाला शांत करण्यास उपयोगी पडतातच. उभारीची ताकद तर पंखात असतेच. जाणिव फक्त परत व्हावी लागते. :) अजुनी उदास का रे बोलावयास काही? की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही? नेहमीच सूर्य दिसतो अस्ताचलास तुजला.. चैतन्य जागवाया, उदयात शोध काही! पेटावयास वणवा क्षणमात्रही पुरेसा.. फुलवावयास माती सरतात जन्म काही! घे कुंचला मनाचा रेखावयास जगणे रंगांत डुंबणारे आहे अजून काही! ध्येयास गाठण्याचा घे छंद अंतरी तू! भात्यात निश्चयाच्या, आहेत बाण काही! प्रेमात ईश्वराचे अस्तित्व जागताहे.. स्मरणात राघवाच्या उधळून टाक काही!! शुभम्

क्षण.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी रविवार, 22/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण ! कणकण जळे अन, क्षणक्षण झुरे.. झाला जीव सखे वेडा.. तुझ्या पायी ग.. भरुभरु डोळे बघ, वणवण फ़िरे.. आता इथे-तिथे-कुठे.. ठाई ठाई ग.... तुझ्याविना जग सारे, उदास भकास, गेला हरवुन सूर.. अन हरपले गाणे.. जगताना आणि सांग,किती वेळा करायचे,रोजरोज तेचतेच,खोटे ग बहाणे एका तुझ्या भेटीपायी,वेड्या वेड्या आशेपायी,उरे श्वास उरे जीव,काही ग.. कण कण जळे अन....... [१] तुझी मीठी गंध-धुंद,उश्ण श्वास धपापला,क्रिश्णमेघी केसांची ग छाया... हरवलो हरपलो,आणि विसरुन गेलो,सखे दोन जीव,एक काया.. माझ्या देही तुझा गंध,तुझा माझा एक श्वास,दोन कुडी एक प्राण,ठाई ग.. कण कण जळे अन........

मुक्ती

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 22/03/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला आसावल्या पावलांना वाट दिसे पंढरीची सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ अंतरीची द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी भुकेल्याची तृप्ती इथे जाणवते अंतर्यामी दूर भौतिकापासून भक्तिमार्गाला निघाले अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले लक्ष चौर्‍यांशीचे फेरे किती काळ आता साहू? मुक्ती देई मायबापा, आता अंत नको पाहू
Taxonomy upgrade extras

चित्कला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 21/03/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आदिमाया ती आदिशक्ती स्वयें चित्कला मायमुक्ती ज्ञानराज सोपान मुक्तीचा साधन ते अवघे निवृत्ती मन मारुनी उन्मन करावे ज्ञानराया शिकवली युक्ती त्याग मायेचा मार्ग प्रभुचा मिटविली चांग्याची भ्रांती अहं नाम्याचा कच्चे मडके गोरा म्हणे ती स्वयं भक्ती क्लेश साहुनी क्षमा करावी मुक्ती म्हणे मग मिळे शांती नभात तेजें ज्योत उजळली माय चित्कला मुक्त जाहली विशाल