Skip to main content

कविता

आणखी एक कला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 07/04/2009 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक कला *** हरवायची कला नाही कठिण शिकायला. इतक्या वस्तू बनल्या आहेत घेऊनच आस हरवायची - ती आपत्ती नको वाटायला. * रोज काही हरवू द्या - होऊ दे गडबड शोधायला - हरवा छल्ला चावीचा, जाऊदे वाया एक तास. हरवायची कला नाही कठिण शिकायला. * सरावाने भराभरा, भारंभार लागा हरवायला नावांस, ठिकाणांस, सफर करायच्या त्या स्वप्नांस हरवू देत.
Taxonomy upgrade extras

रंगांची गोष्ट!

लेखक उमेश कोठीकर यांनी मंगळवार, 07/04/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट..... सगळे रंग..कॅनव्हासवर सुखाने रहात होते.. हिरवा,निळा,भगवा वगैरे..! आपापल्या जागी सुखी होते... कॅनव्हास पण समाधानी.... पांढरी रंगाई पण सुखाने नांदत होती... हिरवा हळूहळू पसरत होता...उगीचच निळा.. तसा नविन.. हसत होता... भगवा..एकटाच! तळपत होता.. सगळे आपापल्या जागी ...मजेत पण....कली आला..! गर्जला... "सगळे सुखी? चांगले..? पांढरा पण..? दाखवलेच पाहिजे..कॅनव्हासला!" हळूच म्हणाला रंगांना,"हिरवे मियाँ; पसरा खूप अजून, देतील नाहीतर हाकलून..!" "अहो निळेबाबा, तुम्ही नविन ना? घ्या ना जागा हक्काची! राखीव.!.मागेच रहाल" "काय भगवे राजे? कसले हो? मोठे व्हा!
Taxonomy upgrade extras

फुलोरा..(माझ्या चाली सकट)

लेखक प्राजु यांनी सोमवार, 06/04/2009 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलोरा... केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली का उषेच्या उंबर्‍याशी, रे उभी ओठंगुनी ती?? चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. - प्राजु इथे ऐका कृपया न हसता..!

स्त्री

लेखक उमेश कोठीकर यांनी सोमवार, 06/04/2009 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री रचना स्त्री सृष्टी स्त्री प्रेम स्त्री वृष्टी स्त्री प्रिया स्त्री माता स्त्री कष्ट स्त्री दाता स्त्री बळ स्त्री शक्ती स्त्री मीरा स्त्री भक्ती स्त्री माया स्त्री उब स्त्री पूजा स्त्री शुभ स्त्री दीप स्त्री ज्योती स्त्री लज्जा स्त्री मोती स्त्री यज्ञ स्त्री याग स्त्री फूल स्त्री आग स्त्री कन्या स्त्री भार्या स्त्री विदुषी स्त्री आर्या स्त्री जीवन! धारित्री स्त्री अमृत सावित्री स्त्री लक्ष्मी भाग्यद्वार! स्त्री थोर फार फार स्त्री श्रेष्ठ? ग्रंथ मौन स्त्री स्थान? सर्व गौण स्त्री दासी? स्त्री भिक्षा? स्त्री भोग्य? उपेक्षा? स्त्री दु:ख अमाप स्त्री जन्म अभिशाप!
Taxonomy upgrade extras

बालगीत

लेखक दवबिन्दु यांनी सोमवार, 06/04/2009 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कविता स्वताच्या जबाबदारीवर वाचवी. १ होती उ आणि १ होती टु, दोघी गेल्या फिरायला, उ ला सापडला रुपया, उ म्हणाली आईला - आई, आई, याचं काय करु ? आई म्हणाली आण जा भाजी. उ : आई मी भाजी आणली. धुवु कशी ? सपासपा. चिरु कशी ? कराकरा. शिजवु कशी ? रटा रटा. खाऊ कशी ? मटा मटा. झोपु कशी ? डाव्या कुशी. पादु कशी ? ढुम्मदिशी. (लोकगित)
Taxonomy upgrade extras

तुझ्या मनात

लेखक जागु यांनी सोमवार, 06/04/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
आले होते सहजच तुझ्या मनात फेरफटका उगाच मारायला किती खोल आहे तुझ मन ते आत डोकावायला गांगरून गेले आत मी कुठल्यातरी कोड्यात फसले मी कोड्यात होती खुप घरं प्रत्येक घराला वेगवेगळे रंग प्रत्येक घराला वेगवेगळे रस्ते मध्येच कुठे कुठे बांधही घातलेले घर होत प्रतिष्ठेचं, कर्माचं खुप उंच आणि पसार्‍याचं घर होत आत्पेष्टांचं, मैत्रीचं जिव्हाळा आणि कर्तव्याने भरलेलं एक होत तुझ्या छंदाच, स्वप्नांचं सुबक पण कुंपण घातलेलं एक होत सामाजीक बांधिलकीचं गोर गरीबांच्या आश्रिवादाचं त्यातच एक घर माझही होतं सुंदर, प्रितीने सजवलेलं प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं कोड्याचा रस्ता सुटणारं.
Taxonomy upgrade extras

तुझे माझे नाते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 04/04/2009 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे माझे नाते जशी गूढ सागराची खोली दूर दूर तरी एक तुझी माझी मनबोली तुझा धुंद निशिगंध, माझी नाजूक अबोली तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी तुझे माझे नाते जशी घनगर्द देवराई तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई तुझे माझे नाते जशी श्रावणसरींची गाणी तुला-मलाच कळली प्राक्तनाची गूढ वाणी तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी तुझे माझे नाते जसे उठती तरंग जळी आभाळीच्या खेळियाने मांडली अबोध खेळी तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी
Taxonomy upgrade extras

आपणच........!

लेखक उमेश__ यांनी शुक्रवार, 03/04/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपणच आपल्याला लिहलेली पत्रं वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावित वा~यावर पानं.... थोडसं हसून आपणच आपल्याला सांगावी कधीतरी एखादी गोष्ट आपणच गावं आपल्यासाठी रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं....... आपणच जपावेत मनात; वा~यावर झुलणारे गवताचे तुरे एखादी धावणारी पायवाट, अन् जपावेत काही नसलेले भास्...... जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना आपणच द्यावेत थोडेसे श्वास........
Taxonomy upgrade extras

(ब्यूटी पार्लर अर्थात काव्यफुफाटा)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/04/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी मिपावर आलो आणि 'ब्यूटी पार्लर अर्थात यौवन फुफाटा' ही कविता वाचून डोळे भरुन आले! काल भडकमकर मास्तरांनी जालिंदर जलालाबादींची ओळख काय करुन दिली आणि आज ही नवकविता वाचायला काय मिळाली, सगळेच विलक्षण! हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्‍या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! धन्य आहेस माऊली धन्य आहेस!!

शब्द

लेखक जागु यांनी शुक्रवार, 03/04/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते तुझ्यावर काही लिहावे मनातील भावनांना कागदावर निरखावे न्याहाळताना तुला, तंद्रित जावे सहवासी तुझ्या वाहवून यावे. शब्द शब्दांना जुळवून घ्यावे सुगंधी रचनी तुला हुंगावे शाईतून तुझे प्रेम पाझरावे. मखमली लालीत तुला पसरावे. वाचताना तुज ओठ हसावे डोळ्यांतून भाव पाझरावे दाखवताना तुज हे शब्द तुझ्या ओठचा शब्द व्हावे.
Taxonomy upgrade extras