Skip to main content

कविता

बिन्धास भ्या !!!!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 08/03/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी भ्यायला घाबरत नाही, बिन्धास भितो...! वाटली मला भिती ,तर खुशाल लटपटतो..! घाबरणे आहे तसा, प्राणीजात स्वभाव. भिती वाटते नाकारणे, हा खोटा अहंभाव.. सुरक्षित जगण्या साठी असते आपुली धडपड त्यात झाली गडबड तर वाढते कि हो धडधड असेल जर हे खरे, तर कशास लाजायचे..? उडाली घाबरगुंडी, तर खुशाल घाबरायचे..!! बोट लावता लाजाळु, पान मिटुनी घेते मावळतो रवीराजा अन फुल कोमेजते लाजाळुने लाजावे अन ,फुलाने कोमेजावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे...? हा
Taxonomy upgrade extras

क्षण

लेखक जागु यांनी शनिवार, 07/03/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण क्षण जगावे आयुष्य हे वसूल करावे जीवनात क्षण समजू नका प्रत्येक क्षणात आहे जीवन सुखाचे क्षण, दु:खाचे क्षण सुखात आनंदे डुंबायचे दु:खातही तितकेच रमायचे क्षण असतात प्रेमाचे, विरहाचे प्रेम क्षणात साठवायचे विरहात त्यांना स्मरायचे क्षण हे मौजेचे, कंटाळ्याचे मौजेमध्ये उधळायचे कंटाळ्याला सावरायचे क्षण असतात रागाचे, लोभाचे रागामध्ये जळायचे लोभामध्ये साधायचे क्षण असतात रुसण्याचे, मनण्याचे रुसताना तट्ट फुगायचे मनताना थोडे आखूडच व्हायचे क्षण असतात कष्टाचे, विसाव्याचे कष्ट करत धगधगायचे विसावा घेत शांत व्हायचे.
Taxonomy upgrade extras

तू घरात नसताना ...

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही जरा रेंगाळतच पडलो होतो बिछान्यावर बरेच लोळून झाले पण झोप काही आली नाही आख्खी चादर लपेटून घेतली अंगाला पण तुझ्या मिठीची सर काही आली नाही तूझी आठवण मोजता मोजता पहाटच झाली पण आठवणींचे गणित काही सुटले नाही तू घरात नसताना आज जरा थंडी वाजली मायेची माणसं गेली की उब पण रहात नाही - अडाणि.
Taxonomy upgrade extras

मातिच्या मुंग्या

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... जाता जाता वेळ गेला कळले नाही कधी सरले बालपण... उचलली जीभ लावली टाळ्याला बोलू नका तूम्ही काहीपण... मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली हाती उरले फक्त वेडेपण... का म सु (काही महत्त्वाच्या सुचना) १. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्‍याने चोरली आहे असे समजावे. २. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. ३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी. ४.

(बोल)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं? नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं! मैत्रिणींना सांगायची ती दुसर्‍यांची लफडी नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा? मला म्हणे फोनवर बोलता येत नाही कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही? म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते! काय समजू मी की मेली तुझी भुक आहे? अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ? प्रेरणा: जागुताईंचे बोल

(पाहिजे वीकांत मोठा)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

प्रवास

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 06/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास मन भिजवून गेल्या कोवळ्या स्मृतींच्या लाटा अजूनही चालते मी पूर्वसंचिताच्या वाटा रित्या आयुष्यासारखी वठलेली झाडे कुठे, कुठे पळसफुलांनी सजलेल्या रानवाटा कधी चालता चालता अडखळती पाउले, कधी मन ठेचाळते, सलतो उरात काटा किती वळणे घेऊन जाऊ किती मी दुरून? तुझ्या घराकडे जाती ओळखीच्या सा-या वाटा वेड्या मना, अविचारी, उतावीळ होऊ नको, तुझ्या क्षणिक मोहाचा उगा होईल बोभाटा नाही ठाव किना-याचा, असा प्रवास हा माझा, शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा क्रान्ति
Taxonomy upgrade extras

पाहिजे एकांत थोडा--

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 06/03/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे एकांत थोडा पाहिजे थोडा अबोला पाहिजे पहाट थोडी पाहिजे निशब्द वारा होउनी मग एक तेव्हा अंतरी मिसळून जाउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ मिटूनी तू डोळे तुझे ग काहीशी हरवून जासी स्पर्शता लाभे दिलासा तू मला बिलगून जासी छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही त्रुप्ताता देहात ही त्रुप्ताता विश्वास सार्‍या त्रुप्ताता श्वासास ही संपता पहाट थोडी काहीशी हुरहुर व्हावी धुसरत्या तारकांना भेटीचे संकेत देउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ -पुष्कराज
Taxonomy upgrade extras

कंपूबाजी

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 06/03/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

बोल

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/03/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का रे कळत नाही तुला प्रेमातल ? नेहमीच ते पुस्तकात नाक खुपसून बसायच ! डोळ्यांत उतरवायची ती दुसर्‍यांची आत्मचरित्र नी कथा जाणशील तरी कधी तू माझ्या मनातली व्यथा ? मला म्हणे रोमॅन्टीक बोलता येत नाही रोजच्या वाचनात एक वाक्य पण येत नाही ? पुस्तकांतल्या कथांमध्ये कोणी प्रेमच करत नाही ? म्हणे बोलायला कशाला हव ? समजायच असत ते ! काय समजू मी की तुझ प्रेम मुक आहे ? चंद्र तारे तोडायच नको बोलू ते सर्व काल्पनीक आहे पण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य काय अवघड आहे ?
Taxonomy upgrade extras