Skip to main content

कविता

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न : आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! ****************************** यशाकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. - प्राजु (कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

आठवांचा पसारा..

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.. उगा जाहला आठवांचा पसारा खळेना कशा आज डोळ्यांत धारा सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा जरी वादळी घेतली झेप मी ती तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा चला संपला अर्थ या जीवनाचा दिला नीयतीने मला हा इशारा - प्राजु
Taxonomy upgrade extras

व्यथा

लेखक सुरताल यांनी रविवार, 19/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
सारे ओळखीचे डोळे पुसून गेले! होते अनोळखी ते गाली हसुन गेले! ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की, माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले! माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली घायाळ काळजाला विंचू डसून गेले! डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले! जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! सुरताल
Taxonomy upgrade extras

श त्रू

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 18/10/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
घाटामधल्या वाटेवरती तो गोसावी बसतो मारून हाक, दावून धाक नजरेत विखारी हसतो खोचून त्रिशूल वाटेवर पसरे अर्धफाटकी भगवी छाटी चावुन दात, धावून जात निष्पाप जनांच्या पाठी मी जाई जेव्हा घाटामधूनी भित भित वेगात, हटकून मारील, वाटे मजला अन् लोळवील क्षणात आज ही असला दिवा भितीचा क्षण आला एकांती, पण मी चालत जाईन वाटेवरुनी दगड दुधारी घेऊन हाती हळूच पाहिले, धीर करुनी निजलेल्या त्या राक्षसाकडे पण, धुळ माखला चेहरा दिसला थिजले डोळे, तोंड वाकडे फाटुन गेल्या छाटीवरती त्रिशूल वाकूनी पडला होता पोटामधूनी निघुनी पाठी रक्ताचा ओघळ अडला होता मी हळहळलो, नकळत माझ्या गालावरुनी अश्रू गेला ? घाटावरच्या व

निरोप......

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 18/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप...... राहिली न शाश्वती आता कुणाला कुणाची..... कशास मग काळजी करावी जीवाची...... जीवनाच्या वाटा अशा काटेरी झाल्या.... आशा मनीच्या मनातच निमाल्या...... साव ली ही आता वाटे रणरणत्या उन्हा ची कशास मग काळजी करावी जीवाची......... शब्द ही न येती भेटीस आता.... खातो किती म्हणती हा जगाच्या ला ता....... आधीच प्रेत यात्रा निघाली आत्म्या ची...... कशास मग काळजी करावी जीवाची....... अखेर चा निरोप घेईन मी म्हणतो उसन्या आवाजाने मी गुणगुणतो.... न लाज राहिली मज आता जनाची...... कशास मग काळजी करावी जीवाची.......
Taxonomy upgrade extras

निघून गेली रात्रपरी

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 18/10/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्ताच्या बुंध्यापाशी पाउस पाडून शुभ्रकेशरी सुगंध सांडून अशीकशी निघून गेली रात्रपरी दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी निघून गेली रात्रपरी उषाराणीच्या कोमल गाली सोडून गेली रंग जरतरी कांचनात मिसळून लाली निघून गेली रात्रपरी मदनाक्षीची नीज जपोनी कुंतलास ती विखरी मिलनाची कसक ठेवूनी निघून गेली रात्रपरी चांदणे शिंपीत गेली रात्रभर गगनात जरी करुन उषेला मंत्रखुळी निघून गेली रात्रपरी

गर्भ मंदीर

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 16/10/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
मातेचे गर्भालय पवित्र देवालय शांतीचे आलय कैवल्याच्या मातेच्या गर्भात वात्सल्य व्यवस्था तिथे प्राणप्रतिष्ठा अस्तित्वाची मातेचे गर्भस्थान मंगल तीर्थस्थान आत्म्याचे आधिष्ठान मुर्तिरूप मातेच्या गर्भात अबोध तो बुद्ध जन्मा येता सिद्धार्थ होइ त्याचा..........
Taxonomy upgrade extras

बिघडलिये मान

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 16/10/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते वाढलेल्या वयाला नाकाराते हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला... -- लिखाळ
Taxonomy upgrade extras

त्रिवेणींची वेणी

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/10/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी हा एक अनोखा काव्यप्रकार. चारोळ्या चार ओळींच्या तसे त्रिवेणी, हायकू तीन ओळींचे. त्यातही हायकूतल्या प्रत्येक ओळीतल्या अक्षरांच्या संख्येवर बंधन. कवीश्रेष्ठ गुलजारांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद आंतरजालावर वाचनात आला. 'साखळी हायकू' या आंतरजालीय खेळात सहभागी झालो होतो, तेव्हा त्रिवेणी जवळून पहायला व हाताळायला मिळाल्या.