Skip to main content

कविता

हा स्पंद फुलण्याचा

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 06/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा हातात पावसाची ओली फुले उमलती पाण्यात नाचताना जणू थेंब ताल होती झाडांतूनी पसरतो नवश्वास पालवीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा आरश्यात पाहताना प्रतिबिंब रोज हासे माझे मलास सांगे, हे दिवस श्रावणाचे अंगातूनी फिरे मग, स्वरनाद बासरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा लपुनी पुन्हा पुन्हा मी, मलाच साद देई थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई लडीवाळ स्पर्श होतो, गालांवरी फुलांचा सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

खपली

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 06/11/2008 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
रुतलेल्या सहस्त्र जखमा मी सांभाळतो उराशी रुदनाचे सोयर तुटले मज खंत ना जराशी आक्रोश ना कदापी ना द्रोह जीवनाशी अजुनी सजीव आहे ना राग हा तुझ्याशी गाऊ नको वॄथा तू माझी मलाच गाणी वांझोट्या स्वप्नांनीही मानले रिक्त हे पाणी जा सोड इथेच आता चल मोह पाश तोडू झेपेना स्पर्ष हताचा खपली नकोस काढू

माझी विठ्ठल माऊली..

लेखक राघव यांनी बुधवार, 05/11/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की! तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही?
Taxonomy upgrade extras

अर्थ काय ह्याचा?

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 05/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
कळीने कधी विचारला अर्थ उमलण्याचा? फ़ुलाने कधी दाखवला स्वार्थ जपणुकीचा? उषा पुन्हा निघून गेली पुसून लाली रंगांची नाही क्षणही थबकली वाट पहात टाळ्यांची निर्झरांना कधी मिळाला आस्वाद मधु जलाचा? पाखरांना कधी समजला आवेग तृप्त करण्याचा? आईने कधी का केला कंटाळा भरवण्याचा? अर्थ कधी ना पुसला बाळाच्या लाथांचा.
Taxonomy upgrade extras

फुलपाखरु

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 05/11/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
झुळकी सोबत येई तरंगत रांगोळीची नक्षी दाखवित कुठे चालले, नाही माहित
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
बघा कसे ते थोडे दमले पाकळीवरी थकून बसले लिपझिप लिपझिप पंख हलवले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
परागातला मधू चोखते सावध आजूबाजू बघते सुंदर, रंगीत अन् नाजुकते
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू
हळूच जाउन जवळ पाहिले अलगद बोटांमधे पकडले बाटलीत मग सोडुन दिले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे खेळू
कसे बिचारे निपचित पडले रंग पंखांचे बोटांवर आले अ
Taxonomy upgrade extras

उद्वेग विसरून कसं चालेल?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 04/11/2008 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणार्‍याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? जो त

(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 04/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;) होता खमंग, होता चकणाहि खास बाकी सारेच टुन्न होती पण आसपास बाकी जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही हातात फक्त काजू करणे खलास बाकी! फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा सांगू तिला कसे मी?

भुलण्याचे वय तुझे... सावर सावर

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली. ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का? (लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे.
Taxonomy upgrade extras

लफंगा भूंगा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 03/11/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर गुणगुण गुंजन करणार्‍या भुंग्याला पाहून मनात आलं की एखाद्या लफंग्या व्यक्तिला जसं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्याची मौज वाटत असते तसंच ह्या भुंग्याला पण एका फूलावरून दुसर्‍या फूलावर जाऊन गुंजन करावं असं वाटत असणार. रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर फिरे हा लबाड भूंगा गुंजन करुनी काय सांगे कळ्याना हा निर्लज्य लफंगा देइ का हा कुणाचा निरोप का उघड करी अपुले स्वरूप गुंजन करूनी काय सांगे कळ्याना हा लबाड भूंगा देई का हा गतऋतुची स्मृति का सांगे काही पुराणी किर्ती असेल कसली रचलेली कथा का दूसरी कसली व्यथा गुंजन करुनी काय सांगे कळ्याना हा लबाड भूंगा आठवे हा कसले प