Skip to main content

कविता

कडुलींब (देवद्वार छंद)

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 14/11/2008 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
दारी कडुलींब पसरी सावली घराला माऊली जशी वाटे दारी कडुलींब घराचे बिरुद पाव्हण्याला साद देतो जणू दारी कडुलींब पानांचा संभार गारवा चौफेर उन्हाळ्यात दारी कडुलींब पक्ष्यांचा संसार घरट्यांचा भार अंगावर दारी कडुलींब खेळामध्ये येतो आम्हा लपवितो खोडामागे दारी कडुलींब श्रावण खेळतो झोका झुलवितो फांदीवर असा कडुलींब डोळां साठविते घर आठवीते माहेराचे

गारवा (देवद्वार छंद)

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 14/11/2008 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम धोंडोपंतांचे हर्दिक अभिनंदन! आपण छंदात्मक काव्यप्रकाराची अतिशय सहज शैलीत माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला. खर तर व्याकरण निमवालीच्या बाबतित आम्ही खुपच कच्चे. व्याकरणाच्या नियमात बसवून एखाद काव्य करण्यास सांगितल कि माझा पोपट होतो. परंतु ज्या तर्‍हेने आपण समजावून सांगितलत त्या मुळे आमच्या सरख्या नवोदितांची हिम्मत वाढली आहे. मी माझी एक कविता स्पर्धे साठी देत आहे. ती नियमात बसते कि नाही (विषयाच्या द्रुष्टीने) त्या बद्दल मी जरा साशंक आहे. तरीही देत आहे .
Taxonomy upgrade extras

समुद्र...

लेखक veebee009 यांनी शुक्रवार, 14/11/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र... कसा ? असा किंवा तसा... समुद्र...
Taxonomy upgrade extras

निरगाठी...

लेखक नीधप यांनी गुरुवार, 13/11/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
तिने ठरवलंच होतं अंगाखांद्यावर खेळणारा झुरमुर अनुभवांचा गुंताडा, एकदा सोडवायचाच... ती मनाशीच घाबरली. अनुभव दुखावतील वितळून जातील ना.. तसं आवडत होतंच तिलाही अनुभवांच्या झुरमुरीत हरवून जाणं हरवतानाच तिला भान आलं गाठ घट्ट बसत चाललीये. ती थरकापली.. शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. झुरमुर अनुभव आठवणी झाले. निरगाठींचे चरे मात्र देहामनावर उरले... -नी http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras

माय मराठी

लेखक veebee009 यांनी गुरुवार, 13/11/2008 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
इथेच तर अड़ते ना गाडे... पुन्हा एकदा पाहिले ५५ पाढे... विकास नक्कीच पाहिजे झाला... पण त्यात ही हवा नम्बर पहिला... बाकीच्यांचे नंतर बघू... आधी आपल्याच जातीच्या मागे लागू.. समाज म्हणजे आपली जात... जीने केलीय "समाजावर च " मात... प्रत्येकाने असाच विचार करावा, आपला वेगला गट असावा... "आमच्या" भाकरीत "त्यांचा" थोदासाही वाटा नसावा... अरे बंद करा रे गटबाजी ही समाजाची आता जान हवी.. करा प्रतिद्न्या काम करेन मी.. माय मराठी समृद्ध व्हावी..
Taxonomy upgrade extras

स्फोटात फाटलेले डबे

लेखक ग्रीष्म यांनी बुधवार, 12/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्फोटात फाटलेले डबे बदलले जातील उद्या कदाचित..... रक्ताचे ते थेंब... मासांचे ते तुकडे .... अन घाबरलेले ते रुळ बदलले जटिल उद्या कदाचित ... मानसं कोम्बुनं घेतील स्वताला पुन्हा त्याच डब्यात उद्या कदाचित ... दारावर सुरु असेल मारामारी आत चिंता चौथ्या सिट साठी ...उद्या कदाचित पुन्हा दादर महिम जोगेश्वरी बोरीवली अन मिरारोड़सगळी स्टेशन पुन्हा उभी असतील रांगेत उद्या कदाचित ....
Taxonomy upgrade extras

पाण्याच्या थेंबासाठी

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 12/11/2008 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी वाया घालवू नका असे मुलांवर ओरडतांना आठवत असते मी..माझ्यातल्या एका मुलीला.. आज नळ आला नाही .. .. दोन हातात बादल्या धरून मोठ्या बंगल्याला वळसा घालून शेजार्‍याच्या मालकीच्या विहिरीवर पाण्यासाठी जाणार्‍या.. लहान भाऊ तेव्हा अनेक प्रश्न विचारून भंडावत असे मला.. तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव आतल्या आत ओढायची.. ओढलेला चेहरा हासरा ठेवण्याच्या प्रयत्नात फ्रॉकवर सांडलेल्या पाण्याचे भान यायच ...जेव्हा मीच बघायचे माझ्याकडे तिर्‍हाइताच्या नजरेने.. विहिरीच्या दगडी काठाला आपटत आ
Taxonomy upgrade extras

तरी हरकत नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 11/11/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कविता कुणिही गात नाही कुणिही वाचत नाही वाचली तरी ऐकत नाही परंतु कविता लिहील्याविना मला र्‍हावत नाही लिहूया कविता म्हणून लिहीली जात नाही विचारांच्या वेलीची शब्दरुपी फुलं जेव्हा मनाच्या पाण्यात एकत्र तरंगतात तेव्हा कविता लिहील्या वाचून र्‍हावत नाही दुःखा मागून आनंद डोकावतो यातना मागून निर्मीती होते कवितेचे असंच आहे अशावेळी कविता लिहील्या वाचून र्‍हावत नाही अन तुम्ही गायिलीत नाही वाचलीत नाही आणि वाचून ऐकलीत ही नाही तरी हरकत नाही कविता लिहील्या शिवाय मला र्‍हावत नाही श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

देवद्वारी (देवद्वार छंद)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 11/11/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, धोंडोपंतांनी देवद्वार छंद सोप्या रितिने शिकवल्यावर आमच्या काव्य प्रतिभेला नवे धुमारे फुटले. (काही लोक म्हणाले उधाण आले.) आमच्या प्रतिभेचा वारू चौखूर उधळला. त्याच्या टापा प्रतिसादांतून आणि खरडवह्यातून उमटल्या. बसलो गाडित काव्याच्या मजेत शब्द खटक्यात देवद्वारी सुमार विचार दिसती सुंदर शद्बा चढे जोर देवद्वारी रचतो वेगात काव्याच्या धुंदित शब्द अचंबित देवद्वारी काव्य ते कसले चोपूनी बसले शब्द ते हसले देवद्वारी -- लिखाळ.
Taxonomy upgrade extras

प्रभात राग रंगती...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 11/11/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या पहाटे 'ललत' षड्ज मध्यमी मूर्च्छना चालली 'भटियारा'ची प्रभातरंगी अर्चना डमडम डमरूची आली 'भैरवा'ची स्वारी तीव्र मध्यम वाढवी 'रामकली'ची खुमारी कारुण्यमय 'तोडी'ची 'आसावरी'शी संगती 'अहिरभैरवा' संगे प्रभात राग रंगती..! -- तात्या अभ्यंकर.
Taxonomy upgrade extras