Skip to main content

कविता

सलाम त्या शुराना .....शहिद झालेल्या विराना

लेखक ग्रीष्म यांनी गुरुवार, 27/11/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
{मुंबईत झालेल्या कालच्या बोम्ब स्फोटात अतेरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या त्या सा-या लोंकाना अन पोलिस कर्मचा-याना ही आदरांजलि ... ) रोजच्या सारखे आई बाबा गेले कामाला पुन्हा येतील घरी परत वाटे आम्हाला .. रात्र झाली कुणाची आई आली बाबा आले पण माझे बाबा रात्री उशिरा येतील हेच वाटले रात्र झाली इतक्यात कुठून तरी आवाज आले बाबा धावत तिकडे गेले ... काही लोक ज्यांच्या हातात मोठी बन्दूक लोकांवर गोल्या झाडी शुर माझे बाबा अन त्यांचे मित्र हाती लहान क्षस्रे तरी त्यांचा पीछा न सोडी.. ह्या आधी बाबा माझे असेच शुरा सारखे लढले होते न जानो कितिक अपराधी त्यांच्या पायाशी येउन नि
Taxonomy upgrade extras

जागो मतदार प्यारे

लेखक अनिरुध्द यांनी गुरुवार, 27/11/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आल्या आल्या निवडणूका जागा हो मतदारा आश्वासनं अन् सुविधांच्या बरसतात बघ धारा अनेक व्यक्ती अनेक पक्ष जनतेकडे ना कुणाचे लक्ष सत्ता, पैसा अन् खुर्ची मिळविण्या करीती मखलाशी शिवसेनेचा शिववडापाव अन् काँग्रेसचे कांदे-पोहे भ्रमिष्ट झाली जनता आता खावे काय हा प्रश्न पडे शिवसेनेचा प्रचार मोठा ठरविण्यास तो बर्गर खोटा बरीच वर्ष दुर्लक्षित होता भाव येई एकदम आता बघुन सेनेची युक्ती काँग्रेस काढे नवीन क्लूप्ती वडापाव तर रोजचाच आहे आम्ही आणतो कांदे-पोहे मैदानात घेतली उडी करण्या आता कुरघोडी बघता यांचे माकडचाळे जनता ही झाली वेडी म्हणून म्हणतो मतदारा आता तरी हो जागा मतदानाचा हक्क बजावून दाखवून दे यांना 'जागा
Taxonomy upgrade extras

(काही कविता)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 26/11/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल रामदासांच्या 'काही कविता' वाचल्यापासून अस्वस्थ होतो, दोन समजल्या नाहीत म्हणून आणि दोन समजल्या म्हणूनही! आज त्यांच्या कवितेवरची त्यांची स्वतःची टिप्पणी आणि मुक्तरावांचे विवेचन बघून कविता समजल्याचा हर्ष झाला.

झोपले हे जग

लेखक कवटी यांनी बुधवार, 26/11/2008 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-जावेद अख्तर) झोपले हे जग , झोपले हे आकाश झोपल्या या सार्‍या इमारती, झोपलाय रस्ता!! रात्र आली तेंव्हा ज्यांची घरे होती ते घरी गेले आणि झोपले. रात्र आली तेंव्हा आमच्यासारखे आवारा परत निघाले आणि रस्त्यातच हरवले. या गल्लीत, त्या गल्लीत, या नगरात, त्या नगरात जायचे तरी कुठे ?

लवंगलता एक प्रयत्न

लेखक चेतन यांनी बुधवार, 26/11/2008 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवर्य धोंडोपंतांच्या लवंगलता छंदातिल रचना वाचुन खरच येड लागले. म्हणलं आपण पण एक प्रयत्न करावा (ग्रुहपाठ #:S अनुष्टभ फारच जड आहे) माझा हा एक प्रयत्न जाणकारांनी चुका किंवा बदल जरुर सुचवावेत. दर्शनाने गणेशाच्या, मन होई शांत | राहो तुझी क्रुपाद्रुष्टी, अनादि अनंत || प्रसन्न ही तुझी मुद्रा, मन आनंदते | पाणिदार डोळ्यांमध्ये, भान हरपते || आगमन होता तुझे, घरी सणवार | ढोलताशे गजरात, चैतन्य अपार || लाल फुले जास्वंदीची, माथ्यावर दुर्वा | विघ्नहर्ता गणेशा तू, बुध्दी देइ सर्वा || आरती तुझी गाईन, पूर्ण मनोभावे | सुख येथेही नांदते, तुझ्या क्रुपाभावे || फुल, केवडा अर्पुन, भ
Taxonomy upgrade extras

बळी राजा....

लेखक ग्रीष्म यांनी मंगळवार, 25/11/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
गाळुनि घाम करी रात्रनदीन काम कधी कुलव पाभर कधी सोबत नांगर खेळ जीवनाचा त्यानं असा मातीत मांडला. मागतो दान दैव त्याच्याशी भांडला. धरनी आईच्या कुशीत परितो सा-या स्रुष्टिच धन भल्या आभळा एवढ गड्याच मोकळ मन बरसती नभ पडतात धारा धरनी आईच्या कुशीला मग फूटे पाण्याचा पाझर पेरितो रान सार मग पुन्हा मुखी पांडूरंगाचा गजर फुलून येत रान त्याच जसा मोराचा पिसारा आता खुलुन आल सपान त्याच त्याच्या दुखाला थोडा इसरा फूले त्याच रान दारी सावकार उभा ७/१२ च्या उता-यावर वाढलेला पिढयान पिढयानचा तो बोजा . लड़की लेक त्याची मैना हाती घेउन गोफन उभी ती पिकात ओठी गाण्यांची लकेर पाखरांचा थवा उड
Taxonomy upgrade extras

काही कविता.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 25/11/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
टरकावलेला चतकोर तुकडा कागदाचा. हवातसा वारा आल्यावर मिजासखोर पतंग झाला. हक्काचे आकाश मागायला मोकळा. --------------- अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा. उंबर्‍यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा रक्ताळला काळानिळा. आता, घरभर लंगडी लंगडी. ------------------------- बारीक दाताच्या फणीनी आयुष्याची एकेक बट विंचरून मी विचारलंच , ठकूबाई,ठकूबाई, जाणार कुठे गं होमसीक झाल्यावर. -------------------------------- एकेक वर्षं उसवत गेलं अंगणापासून चौकापर्यंत चिंध्यांच्या चेंडूंसारखं. कृष्णा,पुरे झाल्या का भरजरी शालूच्या धांदोट्या.? -------------------------------------- (पतंग,टिक्करबिल्ला, ठकू बाहुली,चिंध्यांचा चेंडू या
Taxonomy upgrade extras

हे नाक तुंबलेले (विडंबन)

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 25/11/2008 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे. आभाळ थांबलेले..... कवि : चारुदत्त दिवाण प्रतिभा आभाळ थांबलेले, मातीही थांबलेली; तेजाचे गर्भ सभोती तेजात ओढलेले. . ध्रु. येते अशी घडी की ध्यानात रानवारा; तू भरिशी चित्र असे की तेजाचे किरण नहाले. . १. जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता; नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले. . २. तू असता असा सभोती.. मातीची तुटती नाती; श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.
Taxonomy upgrade extras

कष्ट करणार्या " तिला "

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 25/11/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
दाटले डोळ्यांत अश्रू, ते ही कां विकणार तू ? कष्टाची ना इथे ग किंमत, कां मरेमरेतो जगणार तू ? कर्तव्याची देऊन दाने, अशी किती उरणार तू ? पुण्यासाठी करुनी पुण्ये, उरता उरता विरणार तू. जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ? कठोर कर्तव्याची केवळ कांस कां धरणार तू ? ध्यास घेऊनी वसंतऋतूचा सांग कधी झुरणार तू ? मागणारे मागतच असतात, सांग किती पुरणार तू ? याचकांचे विश्व सारे, हात किती देणार तू ?