Skip to main content

कविता

बुद्धी (उद्धव मात्रावृत्त प्रयत्न)

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 15/12/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी गोंधळलेलो असता ती ठाम राहिली होती मी दिशाहीन असताना ती नाव वल्हवत होती ती लक्ष अंधार-किरणे अंगावर आदळत होती अंधार अभेद्यच असता ती मिणमिणतच हो होती जाणीवा मजला नसता भोवती तर्कदुष्ट ते फार ती तर्कशुद्ध नसती तर जीवास कायमचा घोर ती दुसरी नसोन कोणी जी असता असते शुद्धी प्रेयसी अन ही सखी हो माझीच शाबुत "बुद्धी" --ऋषिकेश टीपः १. माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी मात्रा नीट मोजल्या आहेत. जिथे जिथे चुकले आहे ते नक्की दाखवून द्या! २. मला व्रुत्त म्हणावे तितके कळले नाहि तरी जे काहि कळते त्यानुसार प्रयत्न.

जागतिक मंदी

लेखक राजा यांनी सोमवार, 15/12/2008 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
जागतीक मंदी एके काळी होता इथे माणसांचा वांधा पोटा पुरता नाही आता त्यांना काम धंदा कधी नाही झालं , हे काय झालं यंदा अशा " मंदीवर " कुणी उपाय तरी सांगा आधी पाऊस पडेना , म्हणुन वाढ्ली महागाई तिला पचवेल , आता आली मंदी बाई व्यापायांना धंदा नाही ,झाली कामाची टंचाई रोजच्या विचीत्र बात्म्यांनी डोकं चकावुन जाई मोठमोठया देशांमध्ये कामं राहिली नाही हिंडुन फिरुन लोकं पुन्हा मायदेशी येई कमी पगाराची त्यांना सवय राहिली नाही काही तरी केल्याशिवाय पोट भरणार नाही काम नाही मिळाले तर घर कसं चालेल खोली भाडं किराणा कसा बरं चुकेल खरंच काम नाही हे मनाला फकत पटेल पण काहीतरी खाल्याशिवाय पोट कसं भरेल मालकांच
Taxonomy upgrade extras

एक रुबाई किंवा चारोळी

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 14/12/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी रचलेल्या ह्या चार ओळी चारोळीमध्ये मोडतील कि रुबाईमध्ये ते माझ्या लक्षात येत नाही. पापणी लवली तरीही कळते डोळ्यामधली भाषा कळते मज ते रुप गोजिरे पदर असो वा गोषा

बापू..

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 11/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या देशी श्वासही आता दुष्कर बापू. आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? काट्यांतुनही गुलाब वेचा, तुम्ही म्हणता व्यक्ती नाही, वृत्ती ठेचा, तुम्ही म्हणता पण ते नाहीत मानव केवळ फत्तर बापू..! तुम्हास केवळ नोटेवरती स्मरती सारे. तुमची नावे घेऊन राडे करती सारे. नाही तुम्ही, नशीब हे बलवत्तर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? नव्या युगी या कसे चालतील जुने दाखले. अहिंसक आम्ही आहो दुर्बल जगा वाटले. मुजोर झाले मुजाहिदीन अन लष्कर बापू..! आहे काही तुमच्यापाशी उत्तर बापू ? अस्तित्वाचे अग्नीकुंड आहुती मागते. क्रांती आणि स्वातंत्र्यास्तव रक्त लागते. कुठवर पुरेल गांधीगिरीचे अत्तर बापू ? आहे काही तुमच
Taxonomy upgrade extras

सांगून जा ...

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 09/12/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी हसू लाजरे का फुले ओठांवरी | खळी नाजूक गं खुले गोर्‍या गाली बट लाडीक ही कशी रुळे भाळी | क्षणी तुज गाली उमटे का लाली तुझी पापणी का झुकली ही खाली | धरेवर नाही तुझी पाउले ही नजरेस नाही | विश्वाचे भान ही | अशी चालता तु वळूनी पाहसी उगा थांबूनी का पुढेच तु जासी | रती होउनी तु विहरसी वनी सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी |

आई कसे म्हणु मी...

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आई कसे म्हणु मी Mummy येई मुखी English याच्या जगात मराठी मन माञ दु:खी बाबांचे झाले Daddy ताईची झाली Sister English च्या जगात नवरे झालेत Mister जग झाले सारे Fast-food जे चांगले ते झाले Good मिञ सर्व झालेत Friend शनिवार झाला Weekend राञ झाली आता Night मारामारी म्हणजे Fight जे बरोबर असेल ते Right आज पैशाचे झाले दोन प्रकार एक Black तर दुसरा White English च्या या जगाचे काहीच खरे नाही कालपर्यंत होते जे उद्या काहीच दिसणार नाही जुन्या सर्व गोष्टींचा नव्यापीढीसाठी झाला इतिहास इंग्रजी शिकावी प्रत्येकानं हाच आधुनिकीकरणाच्या ध्यास
-राहुल अरुणकिशन रणसुभे शास्त्रीनग
Taxonomy upgrade extras

प्राणिपात कोटि कोट

लेखक सतिश यांनी सोमवार, 08/12/2008 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि शन एक खालि झुकले हे उन्च उन्च ईमले पायातली तयानच्य मज्बुत वीट हलली तुम्च्याच दर्शनचि तीज आस होति दादा करुनि ह्रुदय समर्पित हलकेच ती निमालि वय थोरेले परन्तु वारधक्य नाहि आले सेवेत देह झिझला जीवन सुवर्ण झाले अव्घया नभास भेदुनि वैकूनट लीन झाली प्राणिपात कोटि कोटि त्या थोर माउलिला कवि सुरेश्चन्द्र जोशि दोम्बिवलि २२/११/२००८

पुढार्‍यांचे देशभक्ती गीत

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 07/12/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
या मातेचे कुपुत्र आम्ही आम्हास कसली लाज बटीक बनवली आम्ही तिजला भागविण्या अमुचीच खाज गरीबांच्या या टाळु वरचे आम्ही खातो लोणी नित्य नवी आम्हा लागते रम आणि रमणी कोण कुठले भगतसिंग..? अन कोण कुठले राजगुरु.. आम्ही वंदितो भाई ठाकुर अमर, अरुण, साटम गुरु.. उच्च नीच नाही कोणी सगळेच आम्ही महान एकजुटीने आम्ही ठेवला अमुचा भारत गहाण.....!!!
Taxonomy upgrade extras

(भणंग २)

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 06/12/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;) उषःपान झाले सकाळी सकाळी तुला 'छान' झाले सकाळी सकाळी चवीला बिडी मस्त ओठात घेता 'धुरापान' झाले सकाळी सकाळी 'तिथे' पोचता पाहिले एकमेका कसे ध्यान झाले सकाळी सकाळी जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे गतीमान झाले सकाळी सकाळी इसबगोल सर्वास उ:शाप झाला बक:ध्यान झाले सकाळी सकाळी म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला समाधान झाले सकाळी सकाळी चतुरंग

खेळ खुर्चिचा

लेखक मनोज यांनी शनिवार, 06/12/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ जुना खुर्चिचा हा पुन्हा नव्याने चालला जे गेले बळी त्यांचा खेद कुणा वाटला? कोण आले? कोण गेले? मारीले कुणी ? कोण मेले? सत्तेचे भुकेले बघ पुन्हा प्रवासा निघाले आतंकाचे कुंड जळते अन मुक्यांच्या आहूती कोणी रक्षावे कुणाला? षंढ सारे भोवती विध्वंसाचे पर्व मोठे आघात त्यांचे विषारी हात व्यस्थ रक्षकांचे खुर्चीचे सारे पुजारी हे नित्याचेचा आता सवय याची लाउन घे मेले त्यात तु नव्हता धन्यता मानुन घे
Taxonomy upgrade extras