Skip to main content

कविता

जुना ओसाड वाडा

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 03/01/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वाड्याच्या आठवणीची कविता तुटलेल्या दिंडीमधुनी अवचित आत मी येते चाफ्याच्या सोनफुलांचे आठवून सुगंधी नाते भिंत जरी खचलेली ती गवत पांघरुन बोले लखलखत्या आठवणींचे अवशेष मोहरून आले आठवे देवघर इथले श्रध्देच्या सांज सकाळी फिरतात आता बेताल मुंग्यांच्या काळ्या ओळी अल्लड अंगणामधला प्राजक्त फुलांचा भार शिडकाव्यामधुनी ठेवे अंगणावर अधिकार आटला अभागी आड डोळ्यात साचले पाणी ह्या लगबग काठावरती मी कितीक गाईली गाणी परतूनी निघाले जेव्हा तोडून भरजरी धागे दिंडीच्या दरवाज्यातून हे कोण खेचते मागे ?

मी आलो.

लेखक रेझर रेमॉन यांनी शुक्रवार, 02/01/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली. मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला हे ग्रह-तार्‍यांच्या देवतांनो.... हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय.

दिव्याभोवती अंधार (गीतांजली - अनुवाद)

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 29/12/2008 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधल्या मला आवडणार्‍या एका कवितेचा स्वैर अनुवाद करत आहे. कवितेचे नाव मला माहित नाही. बहुधा कवितेला स्वतंत्र नावंच नसावे.
Taxonomy upgrade extras

एक द्वाडीक कविता

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2008 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही सदरा मळवला असं पोर्‍यानी सांगावे. आम्ही साबु घेउन यावं तुम्ही उगा चेकाळावे. हे असं काय होतं बुवा ?....... तुम्ही उगा चेकाळावे त्यात साबणं नासावे. आणि करुन फेस सारा आख्खे घर पाणी पाणी अशी दुपार कशी जावी.... तुम्ही जोर बोंबलावं सारी झोप खोबरी तुम्ही लाथा झाडाव्या आम्ही उसण धरावी. कशी जीवघेणी अदा..... आम्ही लपत छपत तुमची पाठ सोलावी तुम्ही ओढत पदर आणिबाणी जाहीर करावी. कस्सा जीव कातावला...... ( संदर्भ : रामदासांची एक लाडीक कविता http://misalpav.com/node/5271 )
Taxonomy upgrade extras

पाणि

लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाणि प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! तेवढंच पुरत असतं तर , किती बरं झालं असतं! -vinya pandit.
Taxonomy upgrade extras

मी शतजन्म घेतले

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/12/2008 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी शतजन्म घेतले मिस्किल हास्यावर तुझ्या ,मी फिदा जाहले, ते बोलणे ऎकता ,कसे रे मंत्रमुघ्ध झाले तुझ्या प्रेमात साजणा ,मी वाहुन गेले तुझ्यासाठीच साजणा ,मी शतजन्म घेतले स्वप्नात रोज माझ्या ,कोण भेटुन गेले? कोण अशी वेडी ,चुट्पुट लावुन गेले.. अधरावर कोण ,प्रेमगीत लिहुन गेले? ते गुणगुण्या साठीच, मी शतजन्म घेतेलेले स्मरता आपली भेट, अंग अजुनहि शहारलेले, मीळता नजरेस नजर, श्वास माझे थांबलेले सुर बासरीचे तुझ्या,मनांत माझ्या रेंगाळलेले ते ऎकण्या साठी साजणा,मी शतजन्म घेतेलेले आठवणींचे देहात, लक्ष सागर उसळले आठवता छबि तुझी, नाजुक तनु उन्मळे कुठे शोधु तुला,मीच तुझ्यात हरवले शोधण्यास रे मी शत जन्म घेतलेले
Taxonomy upgrade extras

-*******हॅप्पी न्यु इयर*******-------

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 24/12/2008 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
-*******हॅप्पी न्यु इयर*******------- ३१ डिसेंबरची बेभान रात्र आहे आसमंतावर गुलाबी थंडीची चादर आहे सारे वातावरण आनंदाने भरले आहे. मधुर संगीत चालु आहे, हास्य विनोद होत आहेत आज प्याला काठोकाठ भरलेला आहे, फेस पण ओसांडुन वहात आहे कर प्राशन अन हो स्वार त्या वारुणीवर विसरुन जा सा~या काळज्या, अन कटकटी जुन्या वर्षाला निरोप दे ..... अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर जुन्या मित्रांची आठवण कर सा~यावर शुभेछ्यांचा वर्षाव कर नविन मित्रांचे स्वागत कर मैत्रीचें एक नविन पर्व चालु कर चषकातली सुरा प्राशन कर. अन नविन वर्षाचे जल्लोशात स्वागत कर आज ग्रुप मधे "ति" पण आली आहे, जुने गिले,शिकवे विसरुन जा. गालावर,
Taxonomy upgrade extras

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/12/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.

गोल्डफ्लेक्स

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता. गोल्डफ्लेक्स पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून शेवटी केवळ फिल्टर उरलेले असतात.... थंडगार फुक्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमलतं त्यांना पाहून. मिंटने धुराचा वास झटकून पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी... - घाटावरचे भट
Taxonomy upgrade extras

विव्हळतं तळ...

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/12/2008 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
विव्हळतं तळ... ================== . . नखातली डोक्यात.. झणझण जाते कळ...! डोळ्यातलं ओठात.. विव्हळतं तळ...! . टीप टीप वेदनेत.. कट्यारीची धार...! थेंब थेंब ओघळात.. तेजाब आर-पार...! . फसफस जाळत.. खोल खोल जाते घळ...! भसभस उफाळत.. रसरसता ये जाळ...! . . ================== स्वाती फडणीस..... २३-१२-२००८