Skip to main content

कविता

(नको)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 28/05/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
जयन्ता५२ ह्यांचे 'नको' वाचून आमच्या मनात नकोनकोते विचार तरळून गेले! ;) निरख मला, गिळू नको सोडा ओत! पाणी नको गात्रात शिरशिरी येता चषक असा टाळू नको घेतोस का शपथा अशा? टाळून मला पळू नको! अशक्य नाहीच, पण 'ऑन द रॉक्स' घेऊ नको चेतविले आहेस मला जिवा त्या का जाळू नको? -------------------------------- चतुरंग
Taxonomy upgrade extras

सहज

लेखक चेतन यांनी मंगळवार, 27/05/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || ~X( सहज सहज करताकरता हे काय झाले? शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T सहज चेतन
Taxonomy upgrade extras

गुलाबाचा सण

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 26/05/2008 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
Taxonomy upgrade extras

"वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता"

लेखक मुक्तसुनीत यांनी शनिवार, 24/05/2008 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे काही नवीन कवींच्या आंतरजालावर वाचत होतो. एका कवितेपाशी आलो नि वाटले , काहीही झाले तरी या माणसाच्या कविता वाचल्याच पाहिजेत. कवीचे नाव : वर्जेश सोलंकी. सुदैवाने यांचा काव्यसंग्रह हाताशी लागला. कवितासंग्रहाच्या बाबतीत असे क्वचितच घडते की पहिली कविता वाचायला सुरवात करावी नि शेवटची कधी आली ते कळूच नये. प्रस्तुत संग्रहच निव्वळ ६०-६५ पानांचा आहे म्हणून असेल; पण एका बैठकीत वाचून झाला सुद्धा. १९९० च्या दशकात भारताची व्यवस्था कूस पालटत होती. येणार्‍या नव्या युगाबरोबर नवे प्रश्नही आलेच.

शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 24/05/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक स्तोत्र ऐकण्यात आले. त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला. त्यांचेच हे स्तोत्र 'शिवमानसपूजा' ह्या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष खरोखरीच पूजा करणे जरी शक्य नसेल तरी ह्या स्तोत्राच्या पठणाने खर्‍या पूजेचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. तो भाग जरी क्षणभर सोडून दिला तरी ऐकताक्षणीच मनाचा कबजा घेणारे हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित करायचेच असा चंग बांधला. माझा संस्कृतचा अभ्यास वगैरे नाही अंदाजाने अर्थ लागू शकतो इतपतच समजते.

प॑कज चव्हाण

लेखक पंकज चव्हाण यांनी शुक्रवार, 23/05/2008 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

देवा......एवढी दया नको रे दाखवू...

लेखक सागर यांनी शुक्रवार, 23/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले. त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता.... खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.
Taxonomy upgrade extras

"थेंब"

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/05/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे || थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे || थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे || थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे || थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे || थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे || थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे || थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे || (थेंबाथेंबांत ल
Taxonomy upgrade extras

(उभी भिंत डागाळलेली मुळाशी)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 23/05/2008 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
नीलहंस यांची 'उभी भिंत डागाळलेली छताशी' ही भेदक कविता वाचून आमच्या डोळ्यांसमोर वेगळेच रंगीत चित्र उभे राहिले! ;) किती रंगल्या पानपिंका मुखाशी, खुजे देव भिंतीवरी मांडलेले उभी भिंत डागाळलेली मुळाशी, वळे ना कधी पोळ निर्ढावलेले कुठे कनवटीचीच काढून चंची लावीत तांबूल होते सुखाने कुठे चार लुंग्या वरी-सावरुनी जणू रंगवीती सडका रसाने कळकून गेली दशा फत्तराची वहाती पुटे सोबतीला रसीली दिशा कोंदल्या, सूचना फाटलेल्या आणि एक गोळी जिभेखालि गेली मुखी राहतो ओरडा फक्त आता, कधी हासती हे मलाही नव्याने तरी शोधतो, मोजतो मी तरीही - पुरावे किती ठेवले कोडग्याने चतुरंग
Taxonomy upgrade extras

पोरखेळ !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 23/05/2008 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
"Child's Play Is Serious Business" ह्या उक्तीवर आधारित… Anita Wadley ह्यांच्या "Just Playing" कवितेवरून स्वैर अनुवादित… ----------------------------------------------------------------- रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर ! शिकतो आहे मी, 'भार' आणि 'तोल' असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १ हाती माझ्या बाहुली, भातुकलीचा खेळ नजर म्हणे तुमची, "आवरायला वेळ" ! 'जपणं' नि 'सांभाळणं' शिकवतो खेळ बनू उद्या 'आई'/'बाप' आम्ही एखादवेळ....
Taxonomy upgrade extras