Skip to main content

कविता

थेंब टपोरे

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 08/06/2008 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
थेंब टपोरे टपोरे खाली आसुसली माती मातीच्या गं अंगावर लक्ष रोमांच फुलती थेंब टपोरे टपोरे पानापानात वाजती फुलांच्या गं पाकळ्यात मोती टपोरे झुलती थेंब टपोरे टपोरे गंध देहात, मनात श्वास पुरता पुरेना किती साठवू उरांत थेंब टपोरे टपोरे माझी तहान भागेना तुझ्या स्मृती जागतात डोळा डोळ्यास लागेना -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

शिवस्तुती

लेखक पुष्कराज यांनी शनिवार, 07/06/2008 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
अति शितल मृदू शांत चंद्र्मा तो ललाटी जटी जया उगम पावे जन्हवी पुण्यदाती लेपुन तनू भस्मा स्वात्मनंदा विराजी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अणू रणू व्यापणारी लोचने तीन दिव्य करी धरी ड्मरू आणि त्रिशुळ भव्य अति धवल दिव्य कांति तेजसी ती प्रकाशी नमन तव करीतो शंकरा पुण्यराशी अर्धांगी आदी शक्ती वाम अंगास ज्याच्या जगत वंद्य पुत्र गणपती स्कंदराजा देखणा करी प्रपंचा शिव विरक्त योगी नमन तव करीतो शंकरा पुण्यश्लोकी अविरत जपी रामा भक्त श्रेष्ठा दयाळा शरण तव येता उद्ध्ररसी कृपाळा सहज तरूनी जाइ प्राथ्रितो जो शिवाला नमन तव करीतो शंकरा विश्वनाथा नृत्यनिपुण नटराजा मोहसी तू
Taxonomy upgrade extras

कुणीतरी...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 07/06/2008 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
कसे लागले वेड जीवाला कुठुन जुळले रेशीमधागे चांदरातीला चांदण्यांसवे कोण कुणासाठी हे जागे? कुठुन येइ असा अचानक प्राजक्ताचा गंध सभोवती कुणासाठी अन हसता हसता नकळत डोळे भरुन येती? कुणासाठी ही लागे हुरहुर कशासाठी ये भरुन हा उर कुणासाठी अन आनंदाच्या क्षणीही उठते मनात काहुर कोण आठवे फुल पाहता कोण आठवे सुर लावता भास कुणाचे होती आणिक वाटेवरुनी जाता जाता कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक कोण कुणा देणारे उत्तर तरी खरे की नाव कुणाचे आठवता मन होइ कातर...
Taxonomy upgrade extras

वीश

लेखक भारती यांनी शनिवार, 07/06/2008 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू तर माझी स्पेशल डीश द्यायच्याय तुला भरपूर वीश दिसली नाहीस एक दोन वीक बरी नव्हतीस, होतीस का सीक? स्पेशल माणसाला स्पेशल गीफ्ट आयुर्मान लाभो तुजला 'ह॑ड्रेड ए॑ड फीफ्थ'
Taxonomy upgrade extras

तू, फक्त हो म्हण

लेखक भारती यांनी शुक्रवार, 06/06/2008 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
तू, फक्त एकदाच हो म्हण आयुष्याचे तुझ्यासाठीच असतील सारे क्षण डोळ्यात उमटेल तुझ्या माझेच प्रतिबि॑ब प्रतिक्षण पण तू, फक्त एकदाच हो म्हण
Taxonomy upgrade extras

त्यांच्या कवितेतील पाऊस

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 06/06/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांच्या कवितेतील पाऊस पाऊस आला आणि पाठोपाठ उगवल्या जिकडे तिकडे पावसाच्या कविता... त्यांच्या कवितेतला पाऊस रिमझिमत होता मोत्यासारखे भासत होते टपोरे थेंब हवेत दाटला होता सुखद गारवा त्यांनी लपेटल्या काश्मिरी शाली त्यांच्या अंगणात मोर नाचले पिसारा फुलवून. पावसानं आधी आमचं छप्पर उडवलं मग आमची पार दाणादाण उडवली. माणसं, चूल, कापडं सगळंच चिंब भिजलं छातीशी हात बांधून बसून राहिलो आडोशाला उपाशी पोटानं, काकडत, कुडकुडत... ज्यांच्या डोक्यावर असते छप्पर त्यांच्या कवितेत नाचतात मोर आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला फक्त चिखल केला... -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

शनि गेला मंगळाकडे

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 06/06/2008 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
शनि गेला मंगळकडे मागायाला हात म्हणे, युतीवे आपण दोघे करू सर्वांवर मात मंगळ म्हणे शनीला, रंग माझा बदलतो आहे, पृथ्वीवरचा माणूस इकडे यायला निघतो आहे. चंद्र म्हणे, माणसाचा आता भरवसा नाही राहिला. मला अक्षता टाकून एकदा रोहिणीला पाहून हसला. राहू - केतूने ऐकला संवाद म्हणे त्यांना सावध रहा. माणसासाठी अधुन-मधून आपापली स्थाने बदलत रहा.

बालपण सदैव नटवायचं असतं

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/06/2008 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सप्रेंची शाळा ही कविता वाचली आणि तीनेक वर्षांपूर्वी जेव्हा छंदात कविता न लिहिण्याचा छंद होता तेव्हा लिहिलेली ही कविता सहजच आठवली.

अनिवासी मोलकरीण

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 06/06/2008 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त शिकले सवरलेलेच नाही, तर कित्येक अशिक्षीत, अर्धशिक्षीत कामगार देखील दूरच्या देशात नशीब काढायला जात असतात. भारतात असतांना कदाचित काही कष्टकरी कामगारांना संघटनांचे पाठबळ शोषणापासून वाचवीत असेल. पण पुष्क्ळदा बाहेर देशात अशा तळागाळातल्या कामगारांचे हित बघायला कुणीही नसते. काही लोक असे सहजपणे म्हणून जातील, "काम आणि कष्ट केल्याशिवाय का पैसा मिळतो?" हे जरी खरे असले, तरी पैसा फेकून माणसाचे यंत्र बनवता येते का?
Taxonomy upgrade extras

यौवनाची बाग

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 05/06/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या जीवनाची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या यौवनाची नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
Taxonomy upgrade extras