Skip to main content

कविता

तु

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 18/06/2008 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
!!! पहीला प्रयत्न !!! ( दि.१८/११/१९९७ रोजी लिहीलेली आयुष्यातली पहीली-वाहीली कविता ..) प्रेमाच्या धुन्दीत जेव्हा अविट होता गोडवा, रात्र होती चान्दणी , आणी मस्त होता गारवा !! फुलात राहतो गन्ध , तशीच तु मनी सदा, तुझेच चित्र काढतो, हाच आहे छन्द मना !! हसरा चन्द्रमणी भाव तुझा लाजरा, म्रूदुला कुन्तलातही , माळीलास तु मोगरा !! हसलीस तु गोड जेव्हा हा निसर्ग ही लाजला, रात्र होती चान्दणी अन मस्त होता गारवा !!
Taxonomy upgrade extras

शोध

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 17/06/2008 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले.
Taxonomy upgrade extras

शोध

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 17/06/2008 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले.
Taxonomy upgrade extras

एक तितली मातकट तपकिरी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 17/06/2008 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या. संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे. घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत, बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे. गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे यासीम ओरबाडून फ़ेकून देतो. त्या छोट्याशा जागेत आधीच, त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे जागा मिळेल तिथे पडली आहेत. रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे. उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे. तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.

या पाखरांस आता ---

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 17/06/2008 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
या पाखरांस आता आहे निघून जाणे हे शब्द सूर सरले ओठी न येई गाणे छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा रे माझिया पिलांनो हा जीव गुंतला रे डोळ्यात आज माझ्या बघ प्राण साठला रे फिरता नभांगणात परतून येथ या रे वेड्या जीवास माझ्या रे एक साद द्या रे हे वेड या मनाचे तुंम्हास रे कळावे अन् शब्द सूर ताल पुन्हा जुळून यावे
Taxonomy upgrade extras

रस्सीखेच

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 16/06/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
रस्सीखेच रस्सीखेच चालू तुझ्या माझ्यात जन्मापासून! तू बलवान अन सर्वशक्तिमान, मी अशक्त अन वेढलेली, कोंड्लेली. तरीही खेचत राहिले, दोर च दोर आणि जिंकत राहिले मी आणि मीच. आताही स्पर्धा रंगणार आहे! त्यात मात्र होणार तुझीच जित! कारण........... माझ्या हातीचा दोर मी केव्हाच सोडला आहे तुझ्याकडेच येण्यासाठी.
Taxonomy upgrade extras

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

लेखक मुक्तसुनीत यांनी सोमवार, 16/06/2008 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
दंभकुठार यांच्या मुळे एक इंग्रजी कविता वाचायला मिळाली : An Almost Made Up Poem: see you drinking at a fountain with tiny blue hands, no, your hands are not tiny they are small, and the fountain is in France where you wrote me that last letter and I answered and never heard from you again. you used to write insane poems about ANGELS AND GOD, all in upper case, and you knew famous artists and most of them were your lovers, and I wrote back, it’ all right, go ahead, enter their lives, I’ not jealous because we’ never met.
Taxonomy upgrade extras

कवितेच्या कवितेची लावणी....

लेखक शेखस्पिअर यांनी रविवार, 15/06/2008 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
रेशमाच्या रेषांनी, निळ्या निळ्या शाईनी, टाकोटाक कशिदा मी काढीला, नाक नका मुरडू माझ्या कवितेला..|| नवी कोरी कविता लाखमोलाची भरली मी नक्षी यमका-वॄत्ताची, गुंफीयले अलंकार ,अलंकार जोडीला..|| नाक नका मुरडू... लिहीत होतो कागदावर मी जोषात असा जोषात.. अवचित आली माझ्या मनात की मनात.. कुणी म्हणे प्रतिभा , कुणी कवीकल्पना..|| नाक नका मुरडू... भीड नाही ठेवली टीकाकारांची, मुरवत ना राखली सोम्या-गोम्यांची, कुणी माझ्या कवितेला छान का नं म्हणीना..|| नाक नका मुरडू...
Taxonomy upgrade extras

आमची एक अती sssssssप्रकाशित कविता..

लेखक शेखस्पिअर यांनी शनिवार, 14/06/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
काही "लोकं" (अनुस्वार विसरु नका...) जनसामान्य किंवा मागासलेल्या विचारांचे... काहीही म्हणा ..भुवया उंचावतील्..पण लक्ष न देणे... ही कविता "बॉम्बे" मधल्या गाण्याच्या चालीवर म्हणावी.. चव चांगली लागते...
Taxonomy upgrade extras

टपटप टपोरे

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 14/06/2008 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
लय- टपटप टपो~~~रे चमचम चंदे~~~रे टपटप टपोरे चमचम चंदेरे पडपड पावसारे
पोरे नाचतात
सळसळ वारा थडथड गारा सटसट मारा
पळाली घरात
सरासरा जाऊन गारागारा वेचून भराभरा चावून
फेकल्या मस्तीत
भिरभिर भिंगोर्‍या फिरफिर सार्‍या भिजभीज पोर्‍या
रमल्या खेळात
पळपळ हुंदाडले पळभर विसावले वासरू उनाडले
कानशिरल्या वार्‍यात
गडगड थंडावली झडझड मंदावली पोरेसोरे परतली
Taxonomy upgrade extras