Skip to main content

कविता

उद्धवा! अजब तुझे सरकार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/06/2008 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस उजाडूनी होतो सुरू होतात अवहेलना अन तक्रारी त्याही पेक्षा ती रात्र बरी उजळणी होते रात्रीची स्मरूनी बाचाबाची सकाळची तू तू अन मी मी ची अन खऱ्या खोट्याची उद्धवा! अजब तुझे सरकार जनार्धनाची हीच तक्रार तुझ्याच दारी न्यायमंदिरी खोटे बोलणे झाले असुनी खरे मानण्याची कसली जबरी सत्तेची ही कसली खूमखूमी श्रीकृष्ण सामंत

दाखविली मातेची व्यथा कौतुके

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/06/2008 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना घेई तुला ती माऊली पोटाशी रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी वेळी अवेळी जवळ घेवूनी पाजिते ती तुला घेवूनी पदराशी दुदु पिताना तू मात्र तिला लाथेने धुसक्या मारिशी शिकविले चालण्या जिने तुला हांक मारता दूर धावशी सोडून तिला तुला खेळण्या आणे ती खेळणी एक एक करूनी टाकशी तू मोडूनी गोड खाऊ करूनी देते तुला बशी जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी छान छान कपडे तुला तिने आणिले खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला संगीत शिकण्या दाखल केले शाळेला रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला मित्रासंगे

सुखाचा शोध

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 23/06/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
न मागता मिळणे मागुन मिळणे अन मागुनही न मिळणे मनाचा खेळ मिळाल्याची चिकित्सा पुर्तीची अपेक्षा आनंदाचा स्तर भावनांचा कल्लोळ प्राप्तीचा आनंद मागण्याची खंत नाकारल्याचे दु:ख सारीच अपेक्षा सुखाचा शोध अगम्य तो बोध दु:खाचे भय अन दु:खाचीच उपेक्षा
काळा पहाड
Taxonomy upgrade extras

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/06/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
ताई म्हणे बाळूला जावून सांगते आईला तुच मारीलेस मला ऐकून हे आई म्हणे ताईला दुसरी बाजू ऐकली पाहिजे कोकरू म्हणे लांडग्याला जावून सांगते मर्कटाला तुच खाणार मला अन करीशी नुसता बहाणा ऐकून हे मर्कट म्हणे कोकराला दुसरी बाजू ऐकली पाहिजे प्रवीण मारे प्रमोदला पोलीस सांगती कोर्टाला ऐकून हे जज्ज सांगे कोर्टाला दुसरी बाजू ऐकली पाहिजे अपराधी अन निरपराधी बाजू मांडती अपुली आईची प्रीती मर्कटाची भीती अन जज्ज्याची कार्यपद्धती वापरूनी ते ते मध्यस्थी अपुल्या निर्णयास येती शेवटी योग्य निर्णय मात्र ठरवित असते नियती श्रीकृष्ण सामंत

आठवणी

लेखक अथांग सागर यांनी रविवार, 22/06/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी जुन्या वहीची पानं चाळताना मोरपीस हातात पडतं मोरपीस गालावर फ़िरताना आठवणींशी नातं जडतं या आठवणींत बुडुन जाताना आजचं नाही उरत भान क्षण ते परत ना येतील आता तीच होती सुखाची खाण आठवणी असतात अनेकांच्या तुमच्या, माझ्या, सर्वांच्या प्रत्येकाची असते एकतरी आठवण दु:खाची अथवा सुखाची साठवण माझ्याही आहेत अशाच आठवणी पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या जीवन झाल्या त्याच आठवणी सुवर्णरुपी गतकाळाच्या ह्रुदयात या रुजुनि गेल्या काही त्यातल्या बुजुनही गेल्या मनात काहींनी घर केले पण... क्षण आता ते उडुन गेले आठवणी आठवाव्या लागत नसतात आपोआप त्या आठवत असतात पा
Taxonomy upgrade extras

लावणी - प्रणयरातीला कुठे चालला

लेखक पुष्कराज यांनी रविवार, 22/06/2008 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
रात चांदण टिपूर सांडल वार्‍याचा बी साज नवा प्रणयरातीला कुठ चालला शृंगाराला सोडून या नथनी पैंजण दूर ठेवल कशास त्यांची भीड उगा प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका हाती माझ्या हात सख्याचा अन् फुललेली रात हवी नभांगणातील लाख चांदणी प्रीत बघुनी जळल मनी प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी
Taxonomy upgrade extras

म्हणून म्हणतो नका घालूं वाद

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 22/06/2008 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार शक्य कसे झाले असते ज्ञानेश्वराना सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीणे अन शिवरायाना तोरणा जिंकणे संपादूनी ज्ञान पस्तीस वर्षावरी करूनी अमेरिकेची वारी अचंबीत केली जनता सारी देवूनी भाषणे आध्यात्मावरी झाला ऐकून पाश्चिमात्यां आनंद कोण असती ते शिवाय विवेकानंद जसे वाढे एखाद्दयाचे वय होई कदाचीत अक्कलेचा क्षय लहान मोठा न कळे त्याला अपमानीत करूनी ज्याला त्याला शहाणा म्हणोनी मिरवीतो स्वतःला म्हणून म्हणतो नका घालूं वाद असो समोर लहान अथवा थोर जो तो वागे अपुल्या अक्कलेनुसार शहाण्यानी करावा ह्यावर नीट विचार श्रीकृष्ण सामंत

करिन मी तुजवर प्रीति

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 21/06/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
छोट्या छोट्या रात्री होत जातात लांब लांब धावत पळत जाणाऱ्या झोपेला सांगू कसे मी जरा थांब थांब मनात माझ्या बेचैनी प्रतिक्षा माझ्या नयनी होईल जेव्हा अशी स्थिती करिन मी तुजवर प्रीति भोळा खूळा अशी माझी महती नको विचारू मज इच्छा कोणती घट्ट धरूनी मी तुला मिठ्ठीत वाटे मला मी वसतो स्वर्गात फुलासम खुलुनी मन देई सुगंध स्पर्षूनी तुझ्या कायेला होई ते धुंद निष्काम होवूनी सोडिल ते दोस्ति होईल जेव्हा अशी स्थिती करिन मी तुजवर प्रीति झेप घेई मन आकाशी पक्षि होवूनी स्वप्नी शोधे मंझिल घिरट्या घेवूनी स्वप्ने स्वप्नेच असली जरी होतात ती खरी कधितरी डोळे राहूनी उघडे पाहू लागती स्वप्ने करिती प्रतिक्षा होईल का कुणी

गुलाबी थंडी

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 21/06/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही पहाटेच्या थंडीत ऊठुन व्यायाम करावासा वाटतो अंथरुणाची ओढ आता पुर्वीसारखी वाटत नाही हल्ली थंडी काही तितकीशी गुलाबी वाटत नाही हल्ली मंडईतही पुर्वीसारखे नजरेला गजरे दिसत नाही कारण गजरे विकणारी बाई आता गजरे विकत नाही देवांच्या तसबिरी विकण्याचा नवा धंदा ती करते आणि या धंद्यात पैसा जास्त सुटतो असं काहीसं म्हणते म्हणलं जाऊदे, नाहीतरी आपल्याला गजर्‍याची तितकी काही गरज राहिलेली नाहीये आणि थंडीही आता पुर्वीसारखी गुलाबी राहिलेली नाहीये रात्रीच्या आकाशात आजकाल नुसते ढगच दिसतात सगळ्या चांदण्या कुठे गेल्या काहीच कळत नाही चंद्रही आता पहिल्यासारखा लोभस वगैरे वाटत नाह
Taxonomy upgrade extras

पारिजातक

लेखक namdev narkar यांनी शनिवार, 21/06/2008 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पारिजातकाच्या तळी शुभ्र सडा फुला॑चा वेचन्यास ति शुभ्र सुमने जमला मेळा मुला॑चा सुप्रभाति सुसमयि रिमझिम रिमझिम मेघ बरसतो पक्षी करीती मधुर किलबिल आसम॑ती सुग॑ध दरवळतो