Skip to main content

कविता

माझी कविता

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 04/07/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप माझ्या अहंकाराला डिवचतो. ही अस्वस्थता कोसळत जाते, तिन्ही सांजेला. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते.
Taxonomy upgrade extras

kai aahe tuzya manat........????

लेखक स्नेहश्री यांनी शुक्रवार, 04/07/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
Ajun tuzya janiva utaraychya aahet maazya manat Ajunahi kalat nahi kai aahe tuzya manat........ Kadhi tuza asaswath karanar baghan, Tar kadhi abola dharan Ajunahi kalat nahi kai aahe tuzya manat........ Kadhi baghtos samorachya daraadun Kadhi jatos maazi najar chukvun kadhi laksha nahi asa dakhvatos.... Tar kadhi mast Ragavtos Ani mhnanun Ajunahi kalat nahi kai aahe tuzya manat........ Bahuda tula hi kalal aahe ki kai aahe maazya manat.......... Maaza te haluhalu chorun baghana kadhi tuza raag raag karana kadhi tuzyashi ladat bolana Tar kadhi tula baghun harkhun jaana... Bahuda tula hi kala

पाहिले मी !

लेखक कौस्तुभ यांनी शुक्रवार, 04/07/2008 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिले मी पाचोळ्याला फांद्याना लटकून रडताना,जगताना तर कधी फुलण्या‌आधी कळी गळून पडताना ऐन बहरात फुलांचा रंग उडून जाताना अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला गंध ओवळून टाकताना पाहिले मी डेरेदार वृक्षाखाली सावली हरवून जाताना तर कुठे इवल्या रोपाखाली वारूळ उभे रहाताना वादळाशी झूंज देत इतिहास नवा रचताना तर कुणी अलवार झूळकीसरशी मुळासकट पडताना पाहिले मी देवळात दगडावर अभीषेक दुधाचा होताना तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात अन्कुर उद्याचा फुटताना खडकाळ बंजर जमीनीवर नांगर (प्र)यत्नाचा फिरताना तर कुठे नर्मदेच्या तीरावर गोट्यांचे पीक येताना पाहिले मी हिमालयाला नतमस्तक धरेसमोर होताना तर कधी इवल्या शीळेला मिज
Taxonomy upgrade extras

इज्जत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे नाही कुणाला इज्जत तिथे जाण्यात कसली लज्जत जीवनासाठी लागते अन्न श्वासासाठी लागते हवा तान्हेसाठी लागते पाणी लाजेसाठी लागते वस्त्र जिथे नाही कुणाला ह्याचे भान तिथे कसाला आला सन्मान चांगल्या वागण्याकरिता असावा सदाचार चांगल्या निर्णयाकरिता असावा सुविचार जिथे अति होतात आचारविचार त्यालाच नाही का म्हणत लाचार श्रीकृष्ण सामंत

घेतली मिठीत आम्ही---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 03/07/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
घेतली मिठीत आम्ही मेघातली त्या वीज ती ठाउक हे होते जरी की आंम्हास हो जाळेल ती जाळणे हे काम तिचे तक्रार नाही आंम्हास हो घेतली होती मिठीत कौतुक त्याचे आंम्हास हो चटका जरी बसला असा पण हौस नव्हती भागली फिरुनी पुन्हा मिठीत आंम्ही वीज होती घेतली
Taxonomy upgrade extras

उद्वेग विसरून कसं चालेल?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 03/07/2008 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणाऱ्याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? ज

(...मी खरा की तू खरा?)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 03/07/2008 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी!

सांभाळा हो! मला कुणीतरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/07/2008 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी- आनंद बक्षी) पाहूनी तुझे नयन गुलाबी मन माझे झाले शराबी सांभाळा हो! मला कुणीतरी माझेच सांभाळणे मला झाले आता अशक्यपरी असते एकच जशी प्रतिमा भिंतीवरच्या तस्वीरी आहे तशी तुझी प्रतिमा सदैव माझ्या अंतरी का झालो तुझ्यावर फिदा कळेल का एकदा विचार करूनी कळे ना मला संताप येई माझ्याच प्रीतिवरी ऐकून माझ्या मना गेलो मी पस्तावूनी माझाच मी नाही आता काय करू मी साजणी जादू तुझ्या नयनातली पाहून झालो मी तिचा दुष्मन वाटे सदैव मला रहावे जपून अनेक सुंदरी पासून शपथ तुझी सांगतो तुला वाचवी स्वपनातुनही मला अरेरे! मिळाले नयनासी नयन जरासे हास्य तुझे पाहून तसाच झालो मी घायाळ श्रीकृष्ण सामंत

श्रावण.

लेखक रामदास यांनी बुधवार, 02/07/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुणा पहाटे अचानक धसमुसळा जागवून गेला. पाकळीवर ओल्या भार . थेंबाचा. कोवळ्या सोवळ्या पोरी सरीला, उभंलावणं भरजरी उन्हाचं.