उगीच अबोला ---
उगीच अबोला उगीच भांडणे
अशीच गेली संध्याकाळ
वाळूवरती रेघा मारीत
उगीच दवडला आपुला वेळ
दोनच घटकेचे हे यौवन
त्यातही आपुले केवळ दो क्षण
सखे भांडणे हवीत थोडी
प्रेमाची पण केवळ दो क्षण
सखे नदी ती पाहतेस ना
ओढीने बघ वहात जाते
सागराच्या कुशीत शिरूनी
शांत होउनी मिसळून जाते
एकरूपता अशी पाहीजे
दोन जीवांची दोन मनांची
भेटही आपुली अशीच व्हावी
असेल जरी ती दोन क्षणांची
Taxonomy upgrade extras
मिसळपाव