Skip to main content

कविता

ही केशरी संध्याकाळ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/07/2008 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-शीव शंकर वशिष्ट) ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार ते दोन दोन विहंग उडून गगनी होती धूंद लक्षावधी गगने येवूनी करिती माझ्या मनी आक्रंद सप्तरंगात मी हरवली झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार श्रीकृष्ण सामंत

पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

लेखक मनिष यांनी मंगळवार, 01/07/2008 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाब्लो नेरूदा’ हे नोबेल पारीतोषक विजेते कवी. विसाव्या शतकातील (१९०४ - १९७३) एक अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कवी. त्यांच्या कविता बर्‍याचदा अतिशय गुढ (surrealist?), इंटेन्स अशा आहेत. त्या मुळ स्पॅनिश भाषेत लिहिल्या असून त्यांचे इंग्लिश अनुवाद सहजपणे उपलब्ध आहेत. माझा हा मराठी अनुवादही अशाच एका इंग्लिश अनुवादावरुन घेतला आहे, त्या अर्थाने तो double-indirection असा आहे; तो कितपत जमला आहे, ते अवश्य सांगा...मला त्यातली वाक्यरचना फार गुंतागुंतीची झाली आहे असे वाटते, पण ती सहज, सोपी अशी नाही रुपांतरीत करता येत आहे!

मामाच्या गावाला

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 01/07/2008 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
जायचेना आपल्याला, मामाच्या गावाला आगगाडीत बसून, गंमत बघायला
गाडीच्या प्रवासात, मी जागाच रहाणार बर्थवरून सारखा, खालीवर खेळणार
मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा
इतका वेळ इथे, गाडी थांबली कशाला? उतरून खाली धक्का, मारू मी डब्याला?
पुलावरून जातांना, धडधड आवाज होती पडणार नाही ना खाली, मला वाटते भीती
Taxonomy upgrade extras

पारिजात

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 01/07/2008 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या चान्दण्याचे शाप का मग निद्रेस माझ्या नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या वेचिल्या तुझ्यचसाठी मी तारकान्च्या दीपमाळा माझ्याच आसमन्ती हाय का मग उल्केचा हा रोष
Taxonomy upgrade extras

खुषी न मिळता मिळते रुसणे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/07/2008 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-पी.के.मिश्रा) तुझ्या प्रीतित मन माझे का तडपते फुलासम असे तुझा चेहरा हृदय मात्र तुझे पाषाणा सम शोभते कळ्या न मिळता मिळती कांटे खुषी न मिळता मिळते रुसणे तोडूनी सारे संबंध मोडूनी सारी नाती होवून वेडा रमलो मी करूनी तुझ्यावर प्रीति अमृत न मिळता विष मिळे काय मी अपेक्षिले अन काय दैवे योजिले मोकळ्या तुझ्या केशभारी गेलो मी गुरफटूनी मुष्किल झाले जगणे मुष्किल झाले मरणे खुषी न मिळता मिळते रुसणे श्रीकृष्ण सामंत

(आता कशाला उड्याची बात!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 01/07/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्ण सामंत ह्यांचे काव्य 'आता कशाला उद्याची बात' वाचले मात्र आमचा मेंदू उड्या मारु लागला आणि एक काव्य टुणकन उडी मारुन बाहेर पडले!
Taxonomy upgrade extras

पोचलो का आपण?

लेखक धनंजय यांनी सोमवार, 30/06/2008 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिरजेला मध्यरात्र झाली, पाच तास लेट निघाली गोमंतक एक्स्प्रेस - आई मला झोपवलेस "उद्या सकाळी असू घरी..." उजाडले होते थोडेच तरी पहाटे डोळे किलकिले करून मी उघडले - "आई, पोचलो का आपण?" "बेळगावच आहे, बघ पण... गारवा मस्त पडला आहे. बाबांनी कुंदा आणला आहे आताच इथला ताजा ताजा जा, पटकन तोंड धू, जा..." सकाळची उन्हे झाली जून प्रवास संपत नाही अजून बाबा म्हणाले, "लोंडा जंक्शन! इथे उलटे फिरणार इंजिन..." "बाबा तुम्ही दोघे जा बघाच इंजिनाची मजा" खळ्ळकन इथून डबे सोडून तिकडे जाऊन घेतलेन जोडून. भर दुपारी घाटात गाडी थांबत सरके थोडीथोडी बोगद्यात होता अंधार दाट किती बघू पोचायची वाट? "बाबा गाडी नाहीच का पोचणार?" "ब

भुंगा

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 30/06/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण भुंगा एका दिवशी बागेमध्ये भ्रमरत होता नाजुक सुंदर फुले आगळी अन थोडिशी कोळी जाळी अल्लड सावज अवचित आले भराभरा ते जाळे विणले कोळी वदला फुला आपला स्नेह निराळा सख्य निराळे त्या वेड्याला पाहुन पटकन फुलानेच एक जाळे विणले होता कोळी हरकामी तो भराभरा तो डाव मांडला उधळुन देता परागसुमने भुंगा वेडा धावत आला भुंगा वेडा असाच होता आप्तांपासुन दुरावलेला दिसता कोमल फुल आगळे वेडा भुंगा मोहित झाला झेप घेउनी मर्म स्थळावर गुज फुलाचे ऐकत बसला फुलही वदले शोककथा ते अनाघ्रात मी सुंदर होते पण जगाची तर्‍हाच न्यारी कुस्करले अन गचाळ म्हटले कोळ्याने मज घात हा केला सभोवती हे जाळे विणले तुच आगळा माझ्यासाठी पटकन उ

दोष होता केला मी तो चुकून

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 30/06/2008 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-तस्लिम फझली) विसरू कसा तुला नसे मी तेव्हडा गैरविश्वासू तक्रार कशी करू आता असली तरी नाहीस देत भासू होतो गेलो मी समजून भेटीतून गेलो प्रीत मिळवून एक तुझ्या शिवाय दुःखातून नाही गेलो काहीही मिळवून नाजूक मनाला गेलीस तू तोडून सहज गतीने गेलीस तू खेळून दोष होता केला मी तो चुकून काय मिळवू मी दुषण तुला देवून देशिल का तुझे दुखणे मला मिळेल शांती सर्वदा त्यातून कमनशिब माझे असे समजून जाईन मी एकदाचे तुला विसरून श्रीकृष्ण सामंत