Skip to main content

प्रवास

नयन मोहणारे नैनीताल - भाग ३

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 15/05/2009 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ तिसऱ्या दिवशी मी उठलो, ते जरा उशीराच. तरी मुम्बईत उठतो त्या मानाने तर मी पहाटे उठलो, असंच म्हणायला हवं. आदल्या दिवशी स्लाईड शो जेव्हा दाखवला गेला, तेव्हा 'रोप कोर्स" ह्या प्रकाराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती देण्यात आली होती. त्याच्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे बघून जांभया देणारे आम्ही सूर्यवंशी खडबडून खूर्चीत सरळ होऊन बसलो. छायाचित्रांत बोल्डरिंग, रॅपलिंग, रिवर क्रॉसिंग (सस्पेन्शन ट्रॅव्हर्स), पॅरलल रोप, इ. ची प्रात्यक्षिके बघून आमची गाळण उडाली.

नयन मोहणारे नैनीताल - भाग २

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 14/05/2009 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या दिवशी पाच वाजता आम्ही उठलो तेव्हा आम्हाला कळलं की आपण उगाच लवकर उठलो आहोत. सगळेजण डाराडूर झोपले असताना आम्ही फुकटच एक तास लवकर उठलो. खरं तर सहा वाजता उठायचं होतं. मग आम्ही मिळालेला तास तरी का सोडावा? लगेच झोपून गेलो. तो एकदम सव्वा सहा वाजता जागे झालो. तेव्हा आम्हा सगळ्यांना आमच्यातल्याच दोघा मित्रांनी उठवलं. आदल्या रात्री आमच्यातला एकजण पत्ते खेळायच्या आधीच झोपला होता. तोच आम्ही अजुनही बिछान्यावर रेंगाळत पडलेला पाहिला. जेव्हा सगळेजण 'फ्रेश' होऊन आलो, तेव्हाही त्याने फक्त दात घासून कप़डे बदलले होते.

सहल.. अशीही..!

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 07/05/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासूनच आता यावर्षी ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डनला जायचेच जायचे असे ठरवले होते. ह्या दिवशी जायचं का त्या दिवशी.. आत्ता ती शेतं ट्युलिपनी बहरली असतील का? का अजून अवकाश आहे.. असं करता करता इथल्या ट्रॅवल एजन्सीनी २-३ तारखा काढून दिल्या. आमच्या गावापासून ऍमस्टरडॅमला एका दिवसात जाऊन येता येतं. सकाळी पहाटे निघून रात्री उशीरापर्यंत परत. या टूर मध्ये काऊकेनहोफमधलं भलंमोठ्ठ ट्युलिप गार्डन आणि शिवाय ऍमस्टरडॅम शहर असं दोन्ही होतं. पण यातली एकही टूर वीकांताला नव्हती. :( मग रजा टाकता येईल का? जमेल का?

कोयना अभयारण्य

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 02/05/2009 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही अप्रवासी. पण मुलीच्या अक्षरनंदन शाळेतल्या मैत्रिणी व त्यांचे पालक यांच्यामुळे कोयनानगर अभयारण्यात जायचा बेत ठरला. उत्साही पालकांमध्ये मित्र असल्याने गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणुन आम्ही समाविष्ट झालो. आम्ही माणसाळलो हे पाहुन त्यांनाही आनंद झाला. इकडची काडी तिकडे करावी लागणार नसल्याने आमचीही ना नव्हती. हं आता वसंतव्याखानमालेतील एका मित्राचे व्याखान नेमके त्याच वेळेला असल्याने त्याचा बळी द्यायचा आम्ही ठरविले.(त्याचा म्हणजे व्याखानाचा मित्राचा नव्हे). पुण्याहुन नियोजित ट्रॆव्हलर गाडीने आम्ही पाच कुटुंबे सोळानग पहाटे साडेपाच म्हणता म्हणता साडेसहाला निघालो. आमी किन्नर शीट पकडली.