असाच एक सुंदर दिवस
तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटलेला समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा. म्हणायचा- तरूणपणी माझा रूबाब तू बघायला हवा होतास. किंवा कदाचित माझे गोव्या- कोकणातले भाऊबंद तरी बघायला हवेस तू.
आणि असाच एक दिवस अचानकच कोकणात जाण्याचा योग आला. माझ्या आईच आजोळ वेंगूर्ल्याच, तिथेच जवळ उभ्यादांड्याला वडिलोपार्जीत घर. घर म्हणजे अगदी परीकथेच मॉडेल समोर ठेवूनच बांधलेल. समोरच सुंदर सुंदर झाड. आणि परसाच्या बाजूला समूद्र किनारा.
मिसळपाव
निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले.
अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.